लेखक
शलमोन, जो दावीद: इस्राएल चा राजा याचा पुत्र त्याची नीतिसूत्रे (सत्यजे गूढरित्या व्यक्त केले, म्हणी, दाखले)
मुख्य शब्द: दररोजची कार्ये, तुमच्या दिवसाला सुरुवात कशी करावी?
परमेश्वरासह सुरु करा.....(नीतिसूत्रे १:७)
तुमचा दिवस परमेश्वराबरोबर संपवा इब्री १२: २
आपल्या विश्वासाचा उत्पादक आणि पूर्ण करणारा
वचने २-६ मध्ये पुस्तकाचा उद्देश हा उल्लेखीला आहे
ज्ञान व शिक्षण ही संपादण्यात यावी; बोधमय वचनांचे परीक्षण करण्यात यावे;
सुज्ञतेच्या व्यवहाराचे शिक्षण, धर्म नीति व सात्विकपण ही प्राप्त करून घेण्यात यावी
भोळ्यांस चातुर्य, तरुणाला ज्ञान व चाणाक्षपण प्राप्त करून दयावे;
ज्ञानी पुरुषाने ऐकावे, त्याचेज्ञान वाढावे; बुद्धीमानाने सुविचार प्राप्त करून घ्यावा; [म्हणजे त्याने त्याचे जीवन योग्यरित्या चालवावे]
बोधवचने व दृष्टांत, ज्ञानी लोकांच्या उक्ती वगूढवचने समजावी; यासाठी ही आहेत.
परमेश्वराचे भय हे ज्ञानाचा प्रारंभ होय, पण मूर्ख लोक ज्ञान व शिक्षण तुच्छ मानितात.
तुम्ही मुर्खाला कसे ओळखाल?
मूर्ख लोक ज्ञान व शिक्षण तुच्छ मानितात, (वचन ७)
प्रत्येक वेळी आपण दुर्लक्ष करीत आहात
१. कुशल ज्ञान
२. ईश्वरीय ज्ञान
३. शिक्षण
४. सात्विकपण
तुम्ही मूर्खपणा आणि अपरिपक्वतेमध्ये कार्य करीत आहात
माझा वाग्दंड ऐकून वळा (पश्चाताप); पाहा, मी आपल्या आत्म्याचा वर्षाव तुम्हांवर करीन, मी आपली वचने तुम्हांस कळवीन.
पवित्र आत्मा प्राप्त करण्यात पश्चाताप ही मुख्य गोष्ट आहे.
लक्ष देणे.....ऐकणारे कान असणे ही देवाच्या वचनाकडून प्रकटीकरण प्राप्त करण्याची किल्ली आहे.
अधिक दबाव, तुम्हाला काहीतरी चूक करावयास लावेल, सरळ नाही म्हणा' (नीतिसूत्रे १:१०)
नाही म्हणण्याचे सामर्थ्य
अति दबाव हाताळणे
माझ्या मुला, त्यांच्या मार्गाने जाऊ नको. (नीतिसूत्रे १: १५)
केवळ नाही म्हणू नका, त्यांच्यापासूनदूर राहा.
आपल्या प्रत्येकाला आपल्या मार्गाचे फळ खावयाचेअसते. हे फळ कडू किंवा गोड असेन जे तुमच्यावर अवलंबून असेल.
"त्या समयी ते मला हाक मारितील, पण मी उत्तर देणार नाही; ते मला आसक्तीने शोधितील, पण मी त्यांस सापडणार नाही." (नीतिसूत्रे १: २८)
एक जो देवाचा वाग्दंड मानीत नाही (नीतिसूत्रे १: २५), त्यांच्या....
१. प्रार्थना ह्या उत्तरीत होणार नाहीत
२. त्यांचे परमेश्वराला शोधणे हे सुद्धा निष्फळ होईल
कारण त्यांनी ज्ञानाचा तिटकारा केला, आणि परमेश्वराचे भय मान्य केले नाही; त्यांनी माझ्या बोधाचा अव्हेर केला, त्यांनी माझा वाग्दंड तुच्छ लेखिला. (नीतिसूत्रे १: २९-३०)
परमेश्वराचा वाग्दंड त्यांस उपलब्ध नसेल जे देवाच्या मार्गाचा द्वेष आणि नकार करतात.
पण जो माझे ऐकतो तो सुरक्षित राहतो, आणि अरिष्टाची भीति नसल्यामुळे स्वस्थ असतो. (नीतिसूत्रे १: ३३)
एक जो नेहमीच माझे ऐकतो...
१. शांति
तो स्वर्गातील स्थानात शांतीने राहील.
२. भया पासून मुक्ती
भय मुक्त, आत्मविश्वासी, धाडसी
३. सांभाळ आणि सुरक्षा
तुम्ही भयमुक्त विश्राम कराल आणि जीवनाच्या वादळापासून आश्रय प्राप्त कराल.