डोळे पाहण्याने समाधानी होत नाहीत, ना ही कान ऐकण्याने. (उपदेशक १:८)
मानवी इच्छा ह्या कधीही समाधानी होत नाहीत. आपल्याला नेहमीच काहीतरी नवीन पाहावे आणि काहीतरी नवीन ऐकावे असे वाटते. मला वैयक्तिक वाटते, की ह्यामुळेच बातम्या आणि निंदात्मक मासिके ही आज इतकी प्रसिद्ध आहेत.
तसेच लोक त्यांच्या वाटसअप वर सतत सामाजिक बातम्या तपासत असतात. वारश्याने मिळालेली भूक की नेहमी काहीतरी पाहावे आणि ऐकावे यासाठी सतत लक्ष ठेवून असते. हे अशांतपणाचे चिन्ह आहे.
एकदा होऊन गेले तेच होणार;
करण्यात आले तेच करण्यात येणार;
भुतलावर नवे म्हणून काहीच नाही.(उपदेशक १:९)
येथे जगात कदाचित काहीही नवीन नसणार; परंतु धन्यवाद होवो कीयेशूच्या मागे चालणारे- ते ज्यांचा देवाच्या आत्म्याने नवीन जन्म झाला आहे-ते ह्या जगात त्याच अर्थाने जगत नाहीत. त्यांची जीवने नवीन गोष्ठींनी भरलेली असतात.
एक नवीन नाव (यशया ६२: २; प्रकटीकरण २:१७)
एक नवीन समाज (उपदेशक २:१४)
दूतांकडून एक नवीन साहाय्य (स्तोत्रसंहिता ९१: ११)
एक नवीन आदेश (योहान १३:३४)
एक नवीन करार (यिर्मया ३१:३३; मत्तय २६:२८)
स्वर्गाकडे एक नवीन आणि जीवित मार्ग (इब्री १०:२०)
एक नवीन शुद्धता (१ करिंथ ५:७)
एक नवीन स्वभाव (इफिस ४:२४)
येशू ख्रिस्ता मध्ये एक नवीन सृष्टि (२ करिंथ ५: १७)
सर्व गोष्टी ह्या नवीन झाल्या आहेत! (२ करिंथ ५:१७; प्रकटीकरण २१:५)
मी, उपदेशक, यरुशलेमात इस्राएलाचा राजा होतो. ह्या भूतलावर जे काही व्यापारचाललेले असतात त्याचा नीट शोध करून ज्ञानाच्या योगाने त्यांचे रहस्य पाहण्याकडे मी आपले चित्त लाविले. देवाने मनुष्याच्या मागे बिकट कष्ट लावून दिले आहेत. (उपदेशक १:१२-१३)
शलमोन ने ज्ञानाचा सतत मागोवा घेतला. उपदेशक १: १३ मध्ये तो म्हणतो,ह्या भूतलावर जे काही व्यापारचाललेले असतात त्याचा नीट शोध करून ज्ञानाच्या योगाने त्यांचे रहस्य पाहण्याकडे मी आपले चित्त लाविले.
याकोब १:५ म्हणते, आपण नेहमी ज्ञान हे देवाकडून मागितले पाहिजे.
"जर तुम्हांपैकी कोणी ज्ञानाने उणा असेल तर त्याने ते देवाजवळ मागावे म्हणजे ते त्याला मिळेल; कारण तो कोणास दोष न लावता सर्वांस उदारपणे देणग्या देतो."