अशा प्रकारे परमेश्वर इस्राएलाच्या घराण्यास म्हणतो: मला शरण या [माझ्याबद्दल व माझ्यासाठी धावा करा आणि अन्नाची जशी गरज करता तशी माझी गरज बाळगा]म्हणजे वाचाल. (आमोस ५:४ ऐम्पलीफाईड)
आपल्याला परमेश्वराचा धावा तसा केला पाहिजे जशी आपल्याला अन्नाची गरज असते. दुसऱ्या शब्दात, अन्ना च्या आपल्या इच्छेपेक्षा देवाचा धावा करणे हे अधिक असले पाहिजे. मी विश्वास ठेवतो हे उपास व प्रार्थने बद्दल बोलते.
तो निबिड अंधकाराचीप्रभात करितो. (आमोस ५:८)
मृत्युपासून उठविण्यासाठी हा संदर्भ असू शकतो काय?
एखादा मनुष्य सिंहापासून पळतो तो त्याला अस्वल गाठीते, तो घरात येऊन भिंतीला हात टेकतो तो त्याला सर्प दंश करितो, तसा हा प्रकार आहे. (आमोस ५:१९)
आपले आजचे आधुनिक व्यक्त करणे हे, 'तळण्याच्या पात्रामधून आगीत',असे असू शकते.
विलाप करणारे चतुर आक्रंदन करण्यास: (आमोस ५:१६)
अशा प्रकारचे आक्रंदन करणारे उपस्थित होते जेव्हा याईर ची मुलगी मरण पावली होती. तेव्हा प्रभु येशूने म्हटले, "तीझोपली आहे" तेव्हा ते हसले. एक जो खरेच विलाप करीत आहे तो अचानक हसू शकत नाही. हे दाखविते की विलाप करण्यास त्यांना पैसे दिले होते.
तुम्ही मला होम व अन्नार्पणे अर्पिली तरी त्यांत मला काही संतोष नाही; तुमच्या पुष्ट पशूंच्या शांत्यर्पणांकडे मी ढुंकून पाहणार नाही. तुमच्या गाण्याचा गोंगाट मजपासून दूर न्या, तुमच्या वाणीने वादन मी ऐकणार नाही. न्याय पाण्याप्रमाणे व धार्मिकता प्रचंड लोंढ्याप्रमाणे वाहो. (आमोस ५:२२-२४)
असे केव्हा झाले आहे जेव्हा आपली अर्पणे व उपासना परमेश्वरास ग्रहणीय झाली नाही?
जेव्हा आपण न्याय व धार्मिकतेकडे दुर्लक्ष करतो, हे मग तेव्हाच आपली अर्पणे व उपासनेचा परमेश्वरासमोर काहीही अर्थ नसतो.
तुमच्या गाण्याचा गोंगाट मजपासून दूर न्या,
तुमच्या वाणीने वादन मी ऐकणार नाही. (आमोस ५:२३)
आपली उपासना केव्हा त्याच्या कानात केवळ गोंगाट अशी होते? दुसऱ्या शब्दात, देवालागौरव,आदर, वस्तुति देण्याचा आपला प्रयत्न हा केव्हा त्यासत्रासदायक असा वाटू लागतो?
जेव्हा आपण प्रीति शिवाय उपासना करतो.
"मी माणसांच्या व देवदूतांच्या भाषांमध्ये बोलत असलो, पण माझ्या ठायी प्रीति नसली, तर मी वाजणारी थाळी किंवा झणझणणारी झांज असा आहे." (१ करिंथ १३:१)
आपण जेव्हा आपले हृदय त्यात नाही असे उपासना करतो
"प्रभु म्हणाला आहे की हे लोक माझ्या समीप येऊन आपल्या तोंडच्या शब्दांनी माझा सन्मान करितात, तरी मजपासून आपले अंत:करण दूर राखितात, आणि हे माझे भय बाळगीतात ते केवळ मनुष्यांनी पढविलेल्या आज्ञेप्रमाणे बाळगीतात." (यशया २९:१३)
तुम्ही आपल्या राजाचा [सक्कुथ व कैवान–शनी ग्रहाच्या दैवतांची नांवे]मंडप, आपल्या मूर्तीचा देव्हारा व तुम्ही केलेला [आणि तुम्ही तसे पुन्हा कराल]आपल्या देवाचा तारा ही तुम्ही वाहून न्याल [नाही] परंतु [नियुक्त केलेली अर्पणे मला आणण्याऐवजी]. (आमोस ५:२६ ऐम्पलीफाईड)
आपल्या तारादेवाच्या प्रतिमा
इस्राएली लोक पतित देवदूतांची [ नेहमी त्यांना अनोळखी असे संबोधत असे] ज्यास देव असे भासवीत असे त्याची उपासना करीत होते. ते वास्तवात भुते होते.
[आणि तुम्ही तसे पुन्हा कराल]
हे भविष्यात्मकवचन आहे. इस्राएल हे पुन्हा तारा देवाची उपासना करतील जे प्रत्यक्षात अभासात भुते आहेत. तंत्रज्ञान व विज्ञानाच्या प्रगती साठी ते असे करतील. अनोळखी लोक [जे प्रत्यक्षात अभासात भुते आहेत] इस्राएल बरोबर काम करतील.