यहूदाचा राजा आमोन याचा पुत्र योशीया याच्या कारकिर्दीत सफन्या बिन कूशी बिन गदल्या बिन अमऱ्या बिन हिज्कीया याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते हे:
सफन्या हा एक असामान्य संदेष्टा होता, त्यातच तो राजघराण्यातील होता,जो भक्तिमान राजा योशीया च्या वंशातून होता.
जे परमेश्वरापासून पराड्मुख झाले आहेत,
ज्यांनी परमेश्वराचे चरण धरिले नाहीतव त्याचा शोध केला नाही, त्यांस मी नष्ट करीन. (सफन्या १:६)
हे वचन आध्यात्मिकतेकडे दुर्लक्ष करण्याची उत्कृष्ट व्याख्या आपल्याला देते. यहूदाच्या लोकांनी परमेश्वराकडे दुर्लक्ष केले होते आणि त्याची उपासना करण्यापासून दूर गेले आणि मूर्तीपूजेकडे वळले होते.
आज सुद्धा, येथे अनेक आहेत जे स्वतःला विश्वासणारे म्हणतात. तथापि, तेप्रती दिवशी बायबल वाचणे, प्रार्थना करणे, आणि मनन करणेकी वचन त्यांस काय सांगत आहे याची त्यांना गरज वाटत नाही. तुम्ही त्या जाळ्यात अडकला आहात काय?
जरी येशू पित्याबरोबर एक होता आणि स्वतः देवाचा पुत्र होता, तरीसुद्धा, येथे पृथ्वीवर असताना, त्याने प्रार्थनेस त्याच्या जीवनाची प्राथमिकता असे केले होते. तो भल्या पहाटे उठत असे आणि एका शांत ठिकाणी जाऊन प्रार्थना करीत असे. (मार्क १:३५)
इतिहासकार आर्नोल्ड टोन्बी ने त्याच्या अभ्यासातहे पाहिले होते की वीस मधील एकोणीस संस्कृती ह्या बाहेरील आक्रमणा पेक्षा स्वतःकडेच दुर्लक्ष केल्यामुळे नामशेष झाल्या होत्या.
आपण दुर्लक्षच्या दिवसांत राहात आहोत आणि ते आपल्या अस्तित्वासाठी विनाशकारी होईल जर आपण देवाला आपणांस क्षमा करण्यास मागितले नाही आणि त्या पवित्र शास्त्राच्या सिद्धांतांकडे वळत नाहीतजी देवाची इच्छा आहे ज्याद्वारे आपण जगावे.
त्या समयी असे होईल की मी दिवट्या घेऊन यरुशलेमेची तपासणी करीन; व जे खाली गाळ असलेल्या द्राक्षारसासारखे मंदावले आहेत आणि आपल्या मनांत म्हणतातकी परमेश्वर बरे करींत नाही व वाईटही करीत नाही, त्यांचा मी समाचार घेईन. (सफन्या १:१२)
देवाच्या न्यायाच्या विरोधात कोणीही लपू शकणार नाही. तो येत आहे, आणि जरी "चमकणारा प्रकाश" हा काढला तरी परमेश्वर त्यास शोधून काढेल.
आपल्या मनांत म्हणतातकी परमेश्वर बरे करींत नाही व वाईटही करीत नाही,
त्यांचा मी समाचार घेईन. (सफन्या १:१२)
हे सैतानाचे खोटेपण आहे: "परमेश्वर बरे करींत नाही व वाईटही करीत नाही."
"चिंता करू नका. परमेश्वराला त्याची काही पर्वा नाही. पाहा, आपण अशा परिस्थितीत इतकीवर्षांपासून जगत आहोत आणि काहीही वाईट झालेले नाही." आत्मसंतुष्टता हानिकारक दिसते परंतु ते भयानक आहे. भूतकाळातील साम्राज्ये ही आत्मसंतुष्टतेमुळे नष्ट झाली आहेत, युद्ध आणि योजना ह्या आत्मसंतुष्टतेमुळेगमाविल्या गेल्या आहेत.
आज धर्मा कडे पाहण्याचा दृष्टीकोन
लोक सर्व धर्मांना समान आहेत असे पाहतात
तत्वज्ञानी सर्व धर्मांना ते समानपणे चुकीचे आहेत असे पाहतात
राजकीय नेते सर्व धर्मांना समानपणे उपयोगी आहेत असे पाहतात
Chapters