सेनाधीश परमेश्वर म्हणतो, हे लोक म्हणतात की वेळ अजून आली नाही, परमेश्वराचे मंदिर बांधण्याची वेळ अजून आली नाही. (हाग्गय १:२)
लोक म्हणत आहेत, "परमेश्वराचे मंदिर बांधण्याची वेळ अजून आली नाही." हा केवळ बहाणा होता की मंदिर पुन्हा बांधू नये.
लक्षात घ्या, परमेश्वर त्यांना लोक म्हणत आहे, "माझे लोक" नाही.
परमेश्वराने अशा प्रकारे बोलले आहे कारण त्याने त्यांचे पोकळ बहाणे आणि मिश्र प्राथमिकता पाहिल्या आहेत आणि याकडे लक्ष लावले आहे की ते त्याच्या लोकांप्रमाणे जगत नाहीत.
मी विश्वास ठेवतो की जेव्हा तुम्ही एक आळशी जीवन जगता; तुम्हाला वाटेल त्यावेळेला उठता, कोणत्याही वेळेला झोपता, तुमच्या वेळेला खेळ खेळत फुकट घालविता आणि निरंतर टीवी पाहत राहता; परमेश्वर अशा लोकांचा संदर्भ "हे लोक" असे देत आहे, "माझे लोक" असे नाही.
तेव्हा परमेश्वराचे वचन हाग्गय संदेष्ट्याच्याद्वारे प्राप्त झाले ते असे: इकडे मंदिर ओसाड पडले असून तुम्ही स्वतः आपल्या तक्तपोशीच्या घरांत राहावे असा समय आहे काय? (हाग्गय १:३-४)
त्यांचे पाप हे नाही की ते त्यांचे स्वतःचे घर बांधीत आहेत. त्यांचे पाप हे मिश्र प्राथमिकता होते. परमेश्वराचे मंदिर बांधण्याऐवजी त्यांनी स्वतःचे घर बांधण्यास प्राथमिकता दिली होती.
देवाचे राज्य मिळविण्यासाठी प्रथम झटा, म्हणजे ह्या सर्व गोष्टी तुम्हाला प्राप्त होतील. (मत्तय ६: ३३)
शलमोन ने त्याचे स्वतःचे घर बांधण्याअगोदर परमेश्वराचे मंदिर बांधिले.
परमेश्वराचे वचन हे तुमच्या बहाण्यास नेहमीच उघडे करील.
संदेष्टाहाग्गय हा घड्याळ्याच्या इशारा प्रमाणे होता-न आवडणारा परंतु आवश्यक.
खरी पवित्र शास्त्राची संपन्नता ही नेहमीच मंदिराबरोबर जुळलेली आहे. प्रेषित पौलाने पवित्र आत्म्याच्या मंदिराचे प्रकटीकरण प्राप्त केले. जसे तुमचा जीव संपन्न होतो ३ योहान २.
तुम्हीकधी स्वप्न पाहिले आहे काय जेव्हा तुम्ही विना चप्पल चालत आहात किंवा फाटलेले कपडे व बूट घालून चालत आहात? मग असे स्वप्न हे दर्शविते की तुम्ही गरिबीच्या आत्म्या द्वारे आध्यात्मिक आक्रमणात आहात. त्या स्वप्ना बद्दल काय जेव्हा तुम्ही स्वतःला किंवा इतरांना भीक मागत असताना पाहिले आहे, तर मग असे स्वप्न दर्शवीत आहे की गरिबीचा आत्मा व्यक्तीला रोखत आहे की त्या गरिबीतून बाहेर यावे आणि त्यास अशा नोकरी विना परिस्थतीत सतत ठेवावे.
पिशवीला छिद्र पडलेले आहे असे स्वप्न
याचा अर्थ दारिद्रतेचा आत्मा आणि अभाव हा तुमच्याविरोधात कार्य करीत आहे.
उंदराला तुमच्या घरात इतरत्र पळत आहे हे पाहणे
तुमची संपत्ति हरवलेली आहे
तुमचीपिशवी किंवा पर्स ज्यात पैसे होते ती चोरली आहे
प्राथमिकता चुकल्याचे परिणाम (हाग्गय १:६)
१. तुम्ही अधिक पेरले, परंतु कमी कापणी केली-आर्थिक संकटे कारण देवाचाआशीर्वाद त्यांच्या आर्थिकतेवर नव्हता.
२. तुम्हीं खाता, परंतु पुरेसे नाही, तुम्ही पिता, परंतु पिण्याने तुमची तहान जात नाही, तुम्ही स्वतःला वस्त्राने पांघरता परंतु कोणीही ऊब प्राप्त करू शकत नाही-ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्यात आपल्याला समाधान नाही.
३. आणि तो जो वेतन कमावितो, तो कमावितो की छिद्र असलेल्या पिशवीत टाकावे-दरीद्रतेचे चक्र
अनेक वेळेला, आपण देवाच्या दयेला मानतो. ह्यामुळेच, कधीकधी, परमेश्वर संकटाला (लक्षात घ्या, मी असे म्हटले नाही, की देवाने संकट पाठविले आहे.) आपल्या मार्गात येऊ देतो कीत्याने आपले लक्ष वेधून घ्यावे.
मी देशावर अवर्षण बोलाविले आहे; पर्वतावर, पिकांवर, द्राक्षारसांवर, तेलावर, भूमीच्या उपजावर, माणसांवर, पशुंवर व तुमच्याहातच्या सर्व कमाईवर अवर्षण बोलाविले आहे. (हाग्गय १:११)
लक्षात घ्या दुष्काळ हा त्यांच्या हातच्या परिश्रमावर सुद्धा होता.