सेनाधीश परमेश्वर म्हणतो, मजकडे वळा म्हणजे मी तुम्हांकडे वळेन, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. (जखऱ्या १:३)
कधीकधी आपण ही इच्छा करतो की परमेश्वराने आपल्याला असे करावे की, आपल्या स्वतःच्या निवडीनुसार देण्यासाठी लोभ दाखविण्यापेक्षा आपल्याला त्यास परत देण्यास लावावे.
एक वयस्कर जोडपे त्यांच्या कार मध्ये समोरील सीट वर बसून चालवीत होते. जेव्हा ते चालवीत होते, त्यांनी हे पाहिले की इतर अनेक कार मध्ये जोडपे हे समोर बसलेले आहेत, स्त्री पतीच्या अगदी बाजूला बसलेली आहे जेव्हा तो कार चालवीत आहे. तिने तिच्या पतीला विचारले, "असे का की आपण आता तितके जवळ बसत नाहीत?" त्याने सरळ उत्तर दिले, "हा तो मी नाही की बाजूला झालो आहे." त्याचप्रकारे, जर आपल्याला वाटते की आपण देवापासून दूर गेलो आहोत, तो बाजूला गेलेला नाही, आपण दूर गेलो आहोत.
तेव्हा मेंदीच्या झुडुपांत उभे असलेल्या पुरुषाने उत्तर दिले की, पृथ्वीवर फेरी करण्यासाठी परमेश्वराने ज्यांस पाठविले ते हे. (जखऱ्या १:१०)
मेंदीच्या झुडुपांत उभे असलेलापुरुष, हा देवाचा दूत होता. (जखऱ्या १:११) आणि यात काही शंका नाही की बेथलेहेम मध्ये त्याची देहधारणा होण्यापूर्वीच्या येशूचे ते दर्शन होते.
मग त्याने मला उत्तर दिले, ज्यामुळे यहूदा, इस्राएल व यरुशलेम ही परागंदा झाली आहेत ती ही शृंगे." (जखऱ्या १:१९)
पवित्र शास्त्रात "शिंग" हे सामर्थ्याचे चिन्ह आहे. (मग ते वेदी वर, प्राण्यात किंवा प्रतीकात्मक वापरलेले असो.)
त्यामुळे, दृष्टांतात चार शिंगे ही चार राज्ये आहेत. ह्या राज्यांनी यहूदा, इस्राएल व यरुशलेम ला विखरावयाचे (शिक्षा) आहे.
विधर्मी राज्यांनी विखरणे केले आहे.
यहूदा, इस्राएल व यरुशलेम (शहर). यहूदा, दक्षिणीय राज्याला मिसर व बाबेल ह्या परराष्ट्रांनी विखरले. इस्राएल, उत्तरीय राज्य, विखरणारे विधर्मी राष्ट्रे ही अश्शूर व सिरीया ही होती.