प्रारंभी शब्द होता, आणि शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. (योहान १:१)
वचन पिता व पुत्रा (पुत्र येथे वचन असे समजले जाते) विषयी बोलते जे समानपणे देव आहे, तरीही त्यांच्या व्यक्तिमत्वा मध्ये भिन्न आहे. पिता हा पुत्र नाही, आणि पुत्र हा पिता नाही. तरीही ते समानपणे देव आहे.
परमेश्वराबरोबर तो प्रारंभी होता. (योहान १:२)
हे पुन्हा ह्या मुद्द्याला सांगते की पिता हा पुत्रा पासून वेगळा आहे, आणि पुत्र हा पित्यापासून वेगळा आहे. ते समानपणे देव आहेत, तरीही ते वेगळे व्यक्ति आहेत.
सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि जे काही झाले ते त्याच्यावाचून झाले नाही. (योहान १:३)
जे काही निर्माण केले गेले आहे ते त्या शब्दाने निर्माण केले आहे. त्यामुळे तो स्वतः अनिर्मित सत्व आहे.
प्रेषित पौलाने कलस्सै १: १६ मध्ये लिहिले.
कारण आकाशांत व पृथ्वीवर असलेले, दृश्य व अदृश्य असलेले, राजे, अधिपती, सत्ताधीश किंवा अधिकारी असलेले, जे काही आहे ते सर्व त्याच्यामध्ये निर्माण झाले; सर्व काही त्याच्याद्वारे व त्याच्यासाठी निर्माण झाले आहे.
तो प्रकाश अंधकारात प्रकाशतो; तरीअंधाराने त्याला ग्रासले [त्यावर प्रभुत्व मिळविले नाही]नाही. (योहान १:५)
यात पर्वा नाही की किती गाढ अंधकार आहे
यात पर्वा नाही किती अंधुक प्रकाश आहे
प्रकाश अंधकारा विरोधात अपयशी ठरू शकत नाही
अंधकारप्रकाशावर कधीहीप्रभुत्व मिळवू शकत नाही.
येथे एक मनुष्य होता ज्याचे नाव योहान, जो देवापासून पाठविलेला होता. (योहान १:६)
१. योहान मनुष्य होता
२. तो देवापासून पाठविलेला होता.
तोत्याचे स्वतःचे त्याकडे तो आला तरी त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही. (योहान १:११)
त्यांनी त्याच्या जन्माच्या वेळी त्याचा अस्वीकार केला. ख्रिस्मस ऐवजी ते जाणूनबुजून एक्समस लिहितात. हैपी ख्रिस्मस म्हणण्या ऐवजी ते 'हैपी हॉलिडे' म्हणतात. ते हेतुपरस्पर त्याचा अस्वीकार करतात. ते शाळे मध्ये त्याचा अस्वीकार करतात जेथे आता प्रार्थना करण्यास सुद्धा प्रतिबंध आहे.
परंतुजितक्यांनीत्याचा स्वीकार केला तितक्यांना म्हणजे त्याच्या नांवावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. (योहान१:१२)
लक्षात घ्या, पवित्र शास्त्र सांगते, "जितक्यांनीत्याचा स्वीकार केला, ज्यांनी त्याच्या नांवावर विश्वास ठेवला, त्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला."
याचा अर्थ स्पष्ट आहे की ते ज्यांनी त्याचा अस्वीकार केला ते देवाची मुले नाहीत. होय! देवाने सर्वांना निर्माण केले. योहान ८:४२ मध्ये येशू ह्याविषयी स्पष्टपणे फरक करतो.
येशूने त्यांना म्हटले, "देव जर तुमचा पिता असता तर तुम्ही माझ्यावर प्रीति केली असती; कारण मी देवापासून निघालो व आलो आहे; मी आपण होऊन आलो नाही; तर त्यानेच मला पाठविले."
परमेश्वर प्रत्येकाचा पिता नाही. आणि ही परीक्षा की कोण तुमचा पिता आहे, हे मग तुम्ही त्याच्या पुत्राला प्रीति करता किंवा नाही हे आहे.
शब्द देही झाला, आणि त्याने आम्हांमध्ये वस्ती केली, आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले. ते पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचे गौरव असावे असे अनुग्रह व सत्य ह्यांनी परिपूर्ण होते. (योहान १:१४)
येशू हा पृथ्वीवर आत्मा असा नव्हता ना ही त्याचे शरीर हे केवळ भ्रमअसे होते. तो शरीरा मध्ये मनुष्य म्हणून देहधारित झाला आणि सर्व मानवी स्वभावाच्या अशक्तपणाच्या अधीन होता.
"शब्द देह" कसा झाला?
कुमारी कडून जन्म घेण्याच्या चमत्कारामुळे (यशया ७:१४; मत्तय १:१८-२५).
कारण नियमशास्त्र मोशेच्या द्वारे देण्यात आले होते; कृपा व सत्य ही येशू ख्रिस्ताच्या द्वारे आली. (योहान १:१७)
प्रामाणिक कृपा ही नेहमीच 'सत्या' शी सलग्न असते. (योहान १:१४)
त्याने म्हटले: "यशया संद्ष्ट्याने सांगितल्याप्रमाणे, 'परमेश्वराचा मार्ग नीट करा, असे अरण्यात ओरडणाऱ्याची वाणी' मी आहे." (योहान १: २३)
लक्षात घ्या, योहानाने म्हटले, तो वाणी होता, तो पडसाद नव्हता.
दु:खद आहे की आज अनेक हे केवळ पडसाद आहेत, जे वाणी असे असावयास पाहिजे होते.
त्याने त्यांना म्हटले, "या आणि पाहा." मग त्यांनी जाऊन तो कोठे राहत आहे ते पाहिले व त्या दिवशी ते त्याच्या येथे राहिले. तेव्हा सुमारे दहावा तास होता. (योहान १:३९)
दहावा तास-दुपारी जवळजवळ 4 वाजले होते.
आणि त्याने त्यास येशूकडे आणले (योहान १:४२)
आतापर्यंत तुम्ही कोणाला येशूकडे आणले आहे?
आणि नथनेल त्यास म्हणाला, "नासरेथातून काहीतरी उत्तम निघू शकते काय?" (योहान १:४६)
नथनेल ने अशा प्रकारे का बोलले?
जुन्या करारात नासरेथ कधीही उल्लेख केलेले नाही. ते इतके अस्पष्ट दिसत होते, त्यामुळेच प्रत्येक शुभवर्तमानकारास हे स्पष्ट करावे लागले की नासरेथ हे काय होते-गालील मधील एक नगर- जेव्हा त्यांनी त्याचा प्रथम उल्लेख केला. (मत्तय २:२३; मार्क १:९; लूक १:२६)
नथनेल च्या प्रश्नाला उत्तर हे जोर देऊन 'होय' असे होते. आणि केवळ चांगले असे नाही तर उत्तम. हे ह्या कारणासाठी कीआपण ज्या ठिकाणाहून फारच कमी अपेक्षा ठेवतो तेथून आपल्या प्रभूला उत्तम ते निर्माण करावयास पाहिजे असते.
योहान १:४७-५०
येशूने भविष्यात्मक नथनेल च्या अंत:करणाच्या अवस्थे विषयीम्हटले आणि तसेच जेव्हा फिलीप्प ने त्यास येशूकडे ये म्हणण्या अगोदर त्याचे ठिकाण त्यास सांगितले. ज्ञानाचे हे वचन ऐकून नथनेल आश्चर्यात पडला, आणि त्याने त्यास त्याच्या पुढील जीवनात येशूच्या मागे चालण्यास लाविले.
Chapters