थियफिल, महाराज, पूर्वीचा वृत्तांत जो मी केला, ते जे सर्व येशूनेकरण्यास व शिकविण्यास सुरुवात केली.(प्रेषित १:१)
पूर्वीचा वृत्तांत हा लूका चे शुभवर्तमान आहे. एका समयी लूक चे शुभवर्तमान व प्रेषितांचे पुस्तक हे दोन संच असे एक पुस्तक म्हणून एकत्र जोडले गेले होते.
वाक्य"करणे व शिकविणे" याकडे लक्ष दया.
येशूने प्रथम स्वतः आचरण केले आणि मग प्रचार केला. हा एक सामर्थ्यशाली सिद्धांत आहे. जे तुम्ही आचरणात आणता तेच केवळ तुम्ही शिकविता आणि प्रचार करता.
असे सांगितल्यावर त्यांच्या डोळ्यादेखत तो वर घेतला गेला; आणि मेघाने त्याला त्यांच्या दृष्टिआड केले. (प्रेषित १:९)
मेघ ज्याने त्यास घेतले तो गौरवाचा मेघ (ज्यास शेकीना असे म्हणतात)होता असे सूचित केले जाते आणि जुना व नवीन करार मध्ये तो परमेश्वराच्या उपस्थितीशीसंबंधित होता.
जेव्हा ते आकाशाकडे निरखून पाहात होते, तेव्हा पाहा, शुभ्र वस्त्रे [परिधान] केलेले दोन पुरुष त्यांच्याजवळ उभे राहिले,
ते म्हणाले, आहो गालीलकरांनो, तुम्ही आकाशाकडे का पहात उभे राहिला? हा जो येशू तुम्हापासून वर आकाशात घेतला गेला आहे तोच, तुम्ही त्याला जसे आकाशांत जाताना पाहिले, [तसाच] येईल. (प्रेषित १:१०-११)
पुरुष जे शुभ्र वस्त्रे परिधान केलेले होते ते जास्तकरून देवदूत होते आणित्यांनी भविष्यात्मक आपल्या प्रभु येशूच्या दुसऱ्या येण्याविषयी म्हटले.लक्षात घ्या त्यांनी काय म्हटले, "तुम्ही त्याला जसे आकाशांत जाताना पाहिले, [तसाच] येईल."
तो शारीरिक असा गेला आणि तशा प्रकारेचयेईल.
Chapters