करिंथ येथील देवाच्या मंडळीस, म्हणजे ख्रिस्त येशूमध्ये पवित्र केलेल्या व पवित्र जन होण्यास बोलाविलेल्या लोकांस, आणि आपला प्रभु येशू ख्रिस्त म्हणजे त्यांचा व आपलाही प्रभु, ह्याचे नांव सर्व ठिकाणी घेणाऱ्या सर्वांस, देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित होण्याकरिता बोलाविलेला पौल व आपला बंधु सोस्थनेस ह्यांच्याकडून: (१ करिंथ १:१-२)
करिंथ येथील देवाच्या मंडळीस,
शब्द चर्च हा ग्रीक भाषेमध्ये म्हणजे, "बोलाविलेले लोक". प्रत्येक चर्च ला दोन पत्ते आहेत: एक भौगोलिक पत्ता ("करिंथ येथे") आणि आध्यात्मिक पत्ता ("ख्रिस्त येशू मध्ये").
ख्रिस्त येशूमध्ये पवित्र केलेल्या व पवित्र जन होण्यास बोलाविलेले
चर्च हे संतांद्वारे बनविलेले आहे, ते म्हणजे, 'लोक ज्यांस "पवित्र केले आहे" किंवा देवा द्वारे "वेगळे केले गेले आहे." एक संत हा मृत व्यक्ति नाही ज्याचा लोकांद्वारे त्याच्या/तिच्या पवित्र जीवन जगण्याच्या कारणामुळे आदर केला जातो. नाही, पौलाने जिवंत संतांना लिहिले आहे, लोक जे, येशू ख्रिस्ता मधील विश्वासा द्वारे, देवाच्या विशेष कार्याकरिता वेगळे केले गेले आहेत.
दुसऱ्या शब्दात, प्रत्येक खरा ख्रिस्ती हा संत आहे कारण तो किंवा ती हे देवा द्वारे देवा साठी वेगळे केले गेले आहेत.
मला एका सकाळी वाट्सप संदेश मिळाला. मी तो संदेश येथे सांगत आहे:
"प्रिय पास्टर, मला माझ्या जुन्या जीवनाकडे जावेसे वाटते कारण माझ्यासाठी काहीही चांगले होत नाही. कृपा करून मला सल्ला दया."
मागील दिवसांत (जसे ते म्हणतात), आणि बायबल नुसार सुद्धा, जेव्हा एक पुरुष व स्त्री त्यांचे प्रेम एकदुसऱ्या प्रती व्यक्त करतात, ते एक-दुसऱ्यासाठी वेगळे केले जातात; आणि विवाहा बाहेर कोणताही संबंध यांस आजही वाईट असे मानले जाते.
त्याचप्रमाणे, एक ख्रिस्ती हा पूर्णपणे येशू ख्रिस्ताचा आहे; तो केवळ त्याच्या साठी वेगळा केला गेला आहे. येथे मागे वळणे नाही.
येथे एका जनरल ची गोष्ट आहे जो त्याच्या सर्वात मोठया शत्रूचा सामना करणार होता. एक जो त्याच्या सेनेपेक्षा विशाल असा होता. "त्याने त्याच्या सैनिकांना बोट मध्ये नेले, शत्रूच्या राष्ट्रात गेले, सैनिक व साधने बोट मधून काढली, आणि मग ज्या बोट द्वारे ते तेथे आले होते त्या बोट ला जाळण्याचा आदेश दिला.
त्याच्या लोकांना पहिले युद्ध होण्याअगोदर बोध केला, तो म्हणाला, "तुम्ही पाहता आपली बोट ही पूर्ण जळून गेली आहे. त्याचा अर्थ आपण जिंकल्या शिवाय ह्या किनाऱ्यावरून जिवंत जाऊ शकणार नाही. आपल्याकडे आता इतर कोणताही पर्याय नाही-आपण जिंकावे-किंवा आपला नाश व्हावा!"
सुवार्ता ही आहे की ख्रिस्ता मध्ये आपल्याला अगोदरच विजय आहे. आपल्याला केवळ पुढे जायचे आहे.
त्या सर्वांसोबत जे प्रत्येक ठिकाणी आहेत त्यांनी येशू ख्रिस्त जो आपला प्रभु याच्या नावाने हाक मारावी, त्यांचा आणि आपला असा दोन्हीही:
जसे एक ख्रिस्ती पूर्णपणे येशू ख्रिस्ताचा आहे; तो जागतिक संगती ज्यास चर्च म्हणतात त्याचा सुद्धा हिस्सा आहे. "सर्वांसोबत" ह्या वाक्प्रचार कडे लक्ष दया.
जेव्हा एक ख्रिस्ती हा अविश्वासू आहे तो केवळ परमेश्वरा विरुद्ध पाप करीत नाही परंतु तो त्याच्या सहकारी ख्रिस्ती विरुद्ध सुद्धा पाप करतो.
देवा आपला पिता व प्रभु येशू ख्रिस्त ह्यांच्यापासून तुम्हांला कृपा व शांति असो. ख्रिस्त येशूमध्ये तुम्हांवर झालेल्या देवाच्या अनुग्रहामुळे मी तुम्हांविषयी देवाची उपकारस्तुति सर्वदा करितो; तो अनुग्रह हा की, जसजशी ख्रिस्ताविषयीची साक्ष तुम्हांमध्ये दृढमूल झाली तसतसे तुम्ही त्याच्या ठायी प्रत्येक बाबतीत सर्व बोलण्यात व सर्व ज्ञानात संपन्न झाला; असे की, आपला प्रभु येशू ख्रिस्त ह्याच्या प्रगट होण्याची वाट पाहणारे जे तुम्ही ते कोणत्याही कृपादानात उणे पडला नाही. (१ करिंथ १:३-७)
ग्रीक शब्द जो भाषांतरित केला आहे, "दृढमूल" जो आपल्याला आपला इंग्रजी शब्द प्लुटोक्रैट हे देतो, ते म्हणजे, 'एक संपन्न व्यक्ति". करिंथ येथील लोक हे आध्यात्मिक दानात भरपूर होते (२ करिंथ ८:७), परंतु ही दाने आध्यात्मिक पद्धतीने वापरीत नव्हते.
Chapters