आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताचा देव व पिता, जो करुणाकर पिता व सर्व सांत्वनदाता देव, तो धन्यवादीत असो. तो आमच्यावरील सर्व संकटात आमचे सांत्वन करितो, असेकीज्या सांत्वनाने आम्हांला स्वतः देवाकडून सांत्वन मिळते त्या सांत्वनाने आम्ही, जे कोणी कोणत्याही संकटात आहेत त्यांचे सांत्वन करावयास समर्थ व्हावे. (२ करिंथ १:३-४)
पवित्र शास्त्र देवाला, 'सर्व सांत्वनदाता देव' म्हणते. देव स्वतःच आपला खरा सांत्वनदाता आहे. ही वचने आपल्याला आपल्यासांत्वना विषयी देवाचा उद्देश सांगतात म्हणजे आपण ज्यांस गरज आहे त्यांचे सांत्वन करावे. जर आपले सांत्वन झालेले नाही, तर मग आपल्या स्वतः मध्ये ज्याची उणीव आहे ते आपण दुसऱ्याला कसे देऊ शकतो.
उत्तम सांत्वनदाते कोण आहेत?
ते जे त्या प्रसंगांमधून गेले आहेत तेच दुसऱ्यांना उत्तमरीत्या सांत्वन करण्यास समर्थ आहेत. आपला त्रास सहन करण्यास कठीण असू शकतो, परंतु ते आपल्याला धडा शिकवितात, जे मग, आपल्याला दुसऱ्यांना मदत करण्यास तयार व समर्थ करतात. केवळ देवाचा आत्मा हा भग्न हृदयास स्थिर करू शकतो, परंतु आपण त्या स्वस्थ होण्याच्या प्रक्रियेचा हिस्सा होऊ शकतो.
त्याने आम्हांला एवढया मोठया प्राणसंकटातून सोडविले, तो आता सोडवीत आहे, आणि तो आम्हांला ह्यापुढेही सोडवील, अशी त्याच्याविषयी आमची आशा आहे.तुम्हीही आम्हांसाठी प्रार्थना करून आम्हांला साहाय्य करावे; असेकी जे कृपादान पुष्कळ जणांच्या योगे आम्हांला मिळाले त्याबद्दल आमच्या वतीने पुष्कळ जणांनी उपकारस्तुति करावी. (२ करिंथ १:१०-११)
तो अजूनही आम्हाला सोडवील, तुम्ही सुद्धा आमच्यासाठी प्रार्थनेमध्ये एकत्र साहाय्य करीत आहात. कारणयावरून आपण पाहू शकतो की सुटकेच्या प्रक्रीयेमध्ये प्रार्थना साहाय्य करते. अनेकलोकांच्या प्रार्थना सुटकेची प्रक्रिया जलद करण्यास साहाय्य करतात. मध्यस्थीही सुटकेच्या प्रक्रीयेमध्ये मुख्य बाब आहे.
देवाची वचने कितीही असोत, त्याच्या ठायी होय हे आहे; म्हणून आम्ही देवाच्या गौरवाला त्याच्याद्वारे आमेन म्हणतो. (२ करिंथ १:२०)
त्याचा अर्थ हा आहे कायकी, आपण जे काही मागणार त्या सर्वांस परमेश्वर "होय" म्हणतो?
प्रेषित पौलाचे वचन योग्यरीत्या भाषांतरीत करण्यात आपण काळजी घेतली पाहिजे.
२ करिंथ १:२० हे बोलत नाही, "जे सर्व काही तुम्ही मागता ते, परमेश्वरा मध्ये होय व आमेन असे आहे."
त्याऐवजी, तो म्हणतो, "देवाची सर्व आश्वासने त्याच्यामध्ये होय आहे, आणि त्याच्यामध्ये आमेन आहेत."
तुमच्या जीवनात "नाही" ने तुम्ही निराश झाला आहात काय?
मग ही वेळ आहे कीआपल्याप्रेमळ देवाच्या आश्वासनाची तुमच्या स्वतःला आठवण दयावी.