इफिस येथील पवित्र जन व ख्रिस्त येशूच्या ठायी विश्वास ठेवणारे ह्यांस देवाच्या इच्छेनुसार झालेला ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल ह्याच्याकडून. (इफिस १:१)
लक्षात घ्या, पौलाने याचा उल्लेख केला की तो प्रेषित "देवाच्या इच्छेनुसार" आहे. इफिस हे आशिया मधील रोमन प्रांताचे मुख्य नगर होते, जे आत्ता तुर्कस्थान असे ओळखले जाते. ते डायना चे मंदिर, त्यास अर्तमी असे सुद्धा ओळखले जाते तेथील भाग होता.
देवा आपला पिता व प्रभु येशू ख्रिस्त ह्यांच्यापासून तुम्हांला कृपा व शांति असो. (इफिस १:२)
प्रेषित पेत्राने हे प्रगट केले की कृपा व शांति ही देवाच्या ज्ञाना द्वारे बहुगुणीत करता येऊ शकते. (२ पेत्र १:२)
आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे. (इफिस १:३)
"ख्रिस्ता मध्ये" आपण सर्व आध्यात्मिक आशीर्वादाने धन्यवादीत आहोत. ह्या गोष्टी आता आध्यात्मिक सत्यता आहेत. जेव्हा आपण भरंवसा ठेवतो व विश्वासामध्ये कार्य करतो, ही आध्यात्मिक दाने शारीरिक प्रत्यक्षता होतात.
त्याप्रमाणे आपण त्याच्या समक्षतेत पवित्र व निर्दोष असावे, म्हणून त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या ठायी निवडून घेतले. (इफिस १:४)
जगाची स्थापना होण्यापूर्वी आपल्याला ख्रिस्ता मध्ये निवडून घेतले आहे. आपण पवित्र व निर्दोष आहोत कारण परमेश्वर आपल्याला ख्रिस्ता द्वारे पाहतो.
जर तुम्ही व मी लाल काचेतून पाहिले, तर सर्व काही लाल असे दिसेल.
त्याप्रमाणे, परमेश्वर आपल्याकडे ख्रिस्ता द्वारे पाहतो, आणि आपल्या जीवनातील सर्व काही येशूच्या रक्ता द्वारे आच्छादिले जाते. आपण त्याच्यासमोर पवित्र व निर्दोष असे आहोत कारण त्याच्या पुत्रा द्वारे त्याची प्रीति ही व्यक्त केली गेली आहे.
त्याने आपल्या मनाच्या सत्संकल्पाप्रमाणे आपल्याला येशू ख्रिस्ताच्या द्वारे स्वतःचे दत्तक होण्याकरिता प्रेमाने पूर्वीच नेमिले होते. (इफिस १:५)
दत्तक घेण्याद्वारे, जुने संबंध हे तोडले गेले; आणि नवीन पिता हा सर्व कायद्यात्मक हक्का सह लेकराचा पूर्ण मालक झाला आहे. रोम मध्ये, एका गुलामाला दत्तक होण्याद्वारे रोमन नागरिक होण्याचा पूर्ण हक्क मिळू शकत होता. दत्तक घेण्याद्वारे, ख्रिस्ती लोकांचे त्यांच्या जुन्या स्वामी कडून सर्व संबंध काढून घेतले गेले आहे आणि आता ते त्यांच्या स्वर्गातील पित्याची संपत्ति, ख्रिस्ताबरोबर वारीस व सह-वारीस असे झाले आहेत.
त्याच्या कृपेच्या गौरवाची स्तुति व्हावी म्हणून हे झाले. ही कृपा त्याने आपल्यावर त्या प्रियकराच्या ठायी विपुलतेने केली आहे. (इफिस १:६)
याची पर्वा नाही की कोठून अस्वीकार येतो, तो आपण आपल्या स्वतःला व इतरांप्रती आपल्या महत्वाला कसे पाहतो त्यामध्ये मोठे नुकसान करू शकतो.
आपण नेहमी हे आचरण आपल्या परमेश्वराबरोबरच्या संबंधात घेऊन चालतो. जर परमेश्वर माझ्या सर्व चुका पाहतो व इतर कोणाही पेक्षा तो माझ्या अशक्तपणाला अधिक जाणून आहे, तर मग मी त्याच्यापासून काहीही चांगल्याची अपेक्षा का करावी?
सुवार्ता ही आहे की "त्याने आपल्याला स्वीकारयोग्य असे केले" आहे. शब्द "स्वीकारलेले" आहे याचा ग्रीक भाषे मध्ये अर्थ "ते आकर्षक, मोहक, प्रेमळ, मान्य, असे करावे की कृपे द्वारे घेरावे व आशीर्वाद सह आदर करावा.
त्याच्या कृपेच्या समृद्धीप्रमाणे त्या प्रियकराच्या ठायी त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून मिळविलेली मुक्ति म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा आपल्याला मिळाली आहे. (इफिस १:७)
आपल्या तारणासाठी जी किंमत भरली गेली; ते प्रत्यक्ष येशूचे जीवन, येशूचे रक्त होते (कलस्सै १:१४). देवाच्या कृपेच्या केवळ समृद्धीद्वारे आपल्याला आपल्या पापांची क्षमा प्राप्त झाली आहे. क्षमा पाप्त करण्यासाठी असे काहीही नाही जे आपण करू शकतो, केवळ आपल्या स्वतःला नम्र करावे व ख्रिस्ता मधील विश्वासा द्वारे एक बक्षीस असे ते प्राप्त करावे.
ख्रिस्ताच्या ठायी पूर्वी केलेल्या योजनेप्रमाणे त्याने स्वतःच्या इच्छेनुरूप स्वसंकल्पाचे रहस्य आपल्याला कळविले. (इफिस १:९)
"रहस्य' येथे याचा अर्थ, "काहीतरी जे मनुष्याला दैवी प्रकटीकरणा शिवाय ठाऊक होऊ शकले नसते, परंतु जे, एकदा लपलेले होते, ते आता ख्रिस्ता मध्ये प्रगट केले गेले आहे.
ती योजना अशी की, कालखंडाच्या पूर्णतेची व्यवस्था लावतांना स्वर्गात व पृथ्वीवर जे आहे ते सर्व ख्रिस्तामध्ये एकत्र करावे. (इफिस १:१०)
देवाचा संकल्प हा केवळ वेळेचा हिस्सा आहे त्यादरम्यान परमेश्वर मनुष्याबरोबर एका निश्चित मार्गाद्वारे व्यवहार करतो. पवित्र शास्त्रात प्रभुत्व करणारे देवाचे दोन संकल्प हे नियमशास्त्राचा संकल्प व कृपेचा संकल्प हे आहे; किंवा कोणीतरी असे म्हणेन, "चर्च युग", ज्यामध्ये आपण जगत आहोत.
आपल्याला मनाच्या संकल्पाप्रमाणे जो अवघे चालवितो त्याच्या योजनेप्रमाणे आम्ही पूर्वी नेमलेले असून ख्रिस्ताच्या ठायी वतनदार झालो आहो. (इफिस १:११)
हा वारसा हे एक आशीर्वाद आहे ज्याचा उल्लेख पौलाने पूर्वी इफिस १:३ मध्ये केला आहे. हा वारसा आता आपला आहे. त्यामध्ये ते सर्व काही आहे जे ख्रिस्ताचे आहे कारण आपण त्याच्यासह एकत्र वारीस आहोत. (रोम ८:१७)
तुम्हीही सत्याचे वचन म्हणजे तुमच्या तारणाविषयीची सुवार्ता ऐकून घेतल्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याने देऊ केलेल्या पवित्र आत्म्याचा तुम्हांवर त्याच्याठायी शिक्का मारण्यात आला आहे. (इफिस १:१३)
शब्द "शुभवर्तमान" याचा अक्षरशः अर्थ हा "सुवार्ता" आहे. आपल्याला केवळ एवढेच करावयाचे आहे की त्यावर विश्वास ठेवावा व ते प्राप्त करावे.
तारणाच्या वेळी, आपण प्रत्येक जन एक नवीन आत्मा प्राप्त करतो (२ करिंथ ५:१७). तथापि, आत्म्याचे मुद्रीकरण होण्याअगोदर, दोन गोष्टी ह्या झाल्या पाहिजेत.
१. शुभवर्तमान हे ऐकले गेले पाहिजे
२. त्यांनी विश्वास ठेवला पाहिजे आणि शुभवर्तमानाच्या संदेशावर भरवंसा ठेवला पाहिजे.
देवाच्या गौरवाची स्तुति व्हावी म्हणून त्याच्या स्वकीय जनांच्या, खंडणी भरून मिळविलेल्या मुक्तीसाठी हा पवित्र आत्मा आपल्या वतनाचा विसार आहे. (इफिस १:१४)
प्रेषित पौल हे म्हणत आहे आपण हे शरीर गौरवात जोपर्यंत आणले गेले आहे हे पाहत नाहीत, तोपर्यंत पवित्र आत्म्याचे निवास करण्याची उपस्थिती ही आपली शास्वती आहे की आपले राहिलेले तारण हे सुरक्षित आहे व येत आहे.
म्हणून तुमच्या ठायी असलेला प्रभु येशू वरचा विश्वास आणि सर्व पवित्र जनांसंबंधाने तुम्ही व्यक्त केलेली प्रीति ह्यांविषयी ऐकून. (इफिस १:१५)
इफिस येथील लोकांसंबंधी, प्रेषित पौलाने दोन गोष्टी ऐकल्या:
१. त्यांचा विश्वास
२. सर्व संतांसाठी त्यांची प्रीति
मीही तुम्हांसाठी आभार मानण्यात खंड पडू देत नसतो; मी आपल्या प्रार्थनांमध्ये तुमची आठवण करून असे मागतो. (इफिस १:१६)
परमेश्वराला धन्यवाद देणे ही प्रार्थना आहे, आणि प्रार्थनेचा तो महत्वाचा भाग आहे.
त्याचे उपकारस्मरण करीत त्याच्या द्वारात
स्तवन करीत त्याच्या अंगणात प्रवेश करा;
त्याचे उपकारस्मरण करा;
त्याच्या नांवाचा धन्यवाद करा. (स्तोत्र १००:४)
कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. (फिलिप्पै ४:६)
मत्तय ६:९-१३ मधील प्रार्थनेवर येशूच्या शिकवणीनुसार, आपल्याला आपल्या प्रार्थनेची सुरुवात व शेवट धन्यवाद व स्तुति ने केला पाहिजे.
आपला प्रभु येशू ख्रिस्त ह्याचा देव जो वैभवशाली पिता, ह्याने तुम्हांला आपल्या ओळखीसंबंधीच्या ज्ञानाचा व प्रकटीकरणाचा आत्मा दयावा. (इफिस १:१७)
प्रतिदिवशी आपल्या प्रत्येकाला महत्वाचे निर्णय करावे लागतात. आपल्याला परमेश्वराकडून मार्गदर्शनाची गरज आहे की हे महत्वाचे निर्णय घ्यावेत. जर हे असे आहे, तर इफिस १:१७ मधील इफिस येथील चर्च साठी प्रेषित पौलाची प्रार्थना ही तुमच्या स्वतःच्या जीवनास लागू करण्यासाठी महत्वाचे वचन आहे.
ह्या वचनात शब्द "ज्ञान" हे ग्रीक शब्द सोफिया पासून आहे, जे समज किंवा ज्ञान चे वर्णन करण्यास वापरले जाते जे स्वाभाविकपणे प्राप्त केलेले नाही.
शब्द प्रकटीकरण हे शब्द ऐपोकालीप्स पासून आहे. हे कशाचा तरी संदर्भ देते जे खूप कालावधीपासून लपलेले किंवा पडद्यामागे आहे आणि मग अचानक, जवळजवळ क्षणात, ते मन किंवा नेत्रांस स्पष्ट किंवा दृश्य असे होते.
म्हणजे त्यामुळे तुमचे अंत:चक्षु प्रकाशित होऊन त्याच्या पाचारणामुळे निर्माण होणारी आशा कोणती, पवित्र जनांमध्ये त्याने दिलेल्या वतनाच्या वैभवाची समृद्धि केवढी. (इफिस १:१८)
"तुमच्या अंत:चक्षु ची समज" हा वाक्प्रचार हे रूपक आहे हे त्या संदर्भाला सांगते की तुमच्या मना द्वारे प्रयत्न करावे. जसे आपण आपल्या शारीरिक नेत्रां शिवाय पाहू शकत नाही जर आपण त्यांस बंद ठेवले आहे, म्हणून आपल्यापैकी कोणीही आपल्या समज द्वारे पाहू शकत नाही जर आपली मने ही बंद आहेत.
आणि जे आपण विश्वास ठेवणारे त्या आपणांविषयांच्या त्याच्या सामर्थ्याचे अपार महत्त्व ते काय हे तुम्ही त्याच्या बलशाली पराक्रमाच्या कृतीवरून ओळखून घ्यावे. (इफिस १:१९)
पौलाला पाहिजे की आपण केवळ देवाचे सामर्थ्य हेच ओळखू नये परंतु तसेच देवाच्या सामर्थ्याची महानता आणि सर्व सत्ता, अधिकार, सामर्थ्य, धनीपणा, सांप्रत आणि भावी युगातील कोणतेही नांव घ्या, त्या सर्वांहून त्याला उंच करून स्वर्गात आपल्या उजवीकडे बसविले. (इफिस १:२१)
नवीन करारात विश्वासणाऱ्याच्या अधिकारावर हा महान अध्याय आहे. ह्या अध्यायात, आपण पाहतो की आपण ख्रिस्ताच्या सिंहासनामध्ये भागीदार होत आहोत, की अधिकार मध्ये हिस्सेदार होत आहोत की जे सिंहासन सादर करते, आणि दैवी सामर्थ्य व वर्चस्व कार्यान्वित करावे.
त्याने सर्व काही त्याच्या पायांखाली ठेवले; आणि त्याने सर्वांवर मस्तक असे व्हावे म्हणून त्यास मंडळीला दिले. (इफिस १:२२)
जेव्हा काहीही व्यक्तीच्या पायाखाली ठेवले जाते, तेव्हा त्या व्यक्तीच्या शरीराचा प्रत्येक भाग हा त्यावर असतो. याचा अर्थ हा की पुनरूत्थानाचे सामर्थ्य हे केवळ ख्रिस्त, जो आपले मस्तक आहे, त्यासाठी सत्यता असे नाही, परंतु ख्रिस्ताच्या शरीराच्या प्रत्येक अवयवासाठी आहे.
हीच त्याचे शरीर. जो सर्वांनी सर्व काही भरतो त्याने ती भरलेली आहे. (इफिस १:२३)
येशू ख्रिस्ताने याची निवड केली की त्याचे चर्च, त्याचे शरीर शिवाय तो अपूर्ण आहे जे त्याच्या स्वतःने भरलेले आहे. (लिविंग बायबल)