तेव्हा अदोनी-बेजेक म्हणाला, हातापायाचे आंगठे कापून टाकलेले सत्तर राजे माझ्या मेजाखाली तुकडे वेचीत असत; माझ्या करणीचे फळ देवाने मला दिले आहे. मग ते त्याला यरुशलेमेस घेऊन आले; तेथे तो मृत्यू पावला. (शास्ते १: ७)
अदोनी-बेजेक, या नावाचा अर्थ म्हणजे"बेजेकचा परमेश्वर"
अदोनी-बेजेक नेराजांच्याहातापायाचे आंगठे कापून टाकले होते ज्यांच्यावर त्याने प्रभुत्व मिळविले होते की त्यांना एक योद्धे म्हणून निरुपद्रवीकेले होते, हा अनुमान लावून की ते येथून पुढे कोणतेही शस्त्र धरूशकणार नाही किंवा पळून जाणार नाही.
जसे तुम्ही पेरता तशीच कापणी कराल हा सिद्धांत येथे आहे
कालेब म्हणाला, जो कोणी लढून किर्याथ-सेफर काबीज करील त्याला मी आपली मुलगी अखसा देईन. तेव्हा कालेबाचा धाकटा भाऊ कनाज ह्याचा मुलगा अथनिएल ह्याने ते नगर घेतले; म्हणून कालेबाने आपली मुलगी अखसा त्याला दिली. (शास्ते १: १२-१३)
जरी कालेब हा पंच्याऐंशी वर्षाचा होता, त्यास परमेश्वराच्या आश्वासनात ठाम विश्वास होता. तोदृढ चारित्र्याचा एक चांगला मनुष्य होता.
त्याला एक मुलगी अखसा होती, जिला एक मनुष्य ज्याचे नवी अथनिएल आहे त्यास विवाहात दिली होती.
आता असे झाले, की ती [अखसा]आली तेव्हा आपल्या बापापासून काही जमीन मागून घेण्यासाठी तिने त्याला चिथावले. ती गाढवावरून उतरली तेव्हा कालेबाने तिला विचारले, तुला काय पाहिजे? ती त्याला म्हणाली, मला एक देणगी दया; तुम्ही मला नेगेब प्रदेशात स्थायिक केले आहे तेव्हा मला पाण्याचे झरे दया; तेव्हा कालेबाने तिला उंचावरचे व पायथ्याचे झरे दिले. (शास्ते १: १४-१५)
एक नवीन नवरी म्हणून, ती आपल्या बापाकडे आली की त्याने तिच्या जीवनावर आणि वैवाहिक जीवनावर आध्यात्मिक आशीर्वाद दयावे. तिला ठाऊक होते तिला तिच्या जीवनावर देवाचा आशीर्वाद हा पाहिजे. तिने प्रथम तिच्या पतीला विनंती केली कीतिच्या पित्याला विचारावे परंतु नंतर ती गप्प राहिली, तिने धैर्याने तिच्या पित्याला आशीर्वाद मागितला.
हे मला सांगते की एक मुलगी म्हणून, तिला तिच्या पित्याबरोबर अद्भुत संबंध होते. तिच्या पित्याबरोबर ह्या घनिष्ठ संबंधाने तिला आत्मविश्वास दिला की तिच्या पित्याला आशीर्वाद साठी मागावे.तिला आत्मविश्वास होता, जर तिने तिच्या पित्याला मागितले, तर तो तिला नाकारणार नाही.
प्रार्थने मध्ये हे एक अद्भुत शिक्षण आहे
की जर आपण त्याच्या इच्छेनुसार काही मागितले, तर तो ते ऐकतो. आणि जर आपल्याला ठाऊक आहे की तो ते ऐकतो, जे काही आपण मागतो, आपल्याला ठाऊक आहे की जे काही आपण मागितले आहे ते तो देणारच. (१ योहान ५: १४-१५)
प्रार्थने मध्ये आत्मविश्वास हा परमेश्वराबरोबरच्या दैनंदिन संबंधामुळे येतो. आत्मविश्वास आपल्याला आपल्या मागण्या मध्ये निडर करेल. परमेश्वराबरोबरील संबंध हे नेहमीच याची खात्री देईल की आपण ते कधीही मागणार नाही जे त्यास अप्रसन्न करते. उत्तरीत प्रार्थनेचे हे गुपित आहे. अखसाचे वैवाहिक जीवन आणि कुटुंब हे आशीर्वादित होते आणि म्हणून तुमचे आणि माझे सुद्धा जेव्हा आपण ह्या सिद्धांताला आपल्या आचरणात आणतो.
सुटका
कारण कनानी लोकांनी हे निश्चित केले होते की ते त्याच भूमी मध्ये राहतील. (शास्ते १: २७)
आणि अमोरी लोकांनी येथील डोंगरावर राहण्याचा निश्चय केला होता. (शास्ते १: ३५)
जसे कनानी लोकांनी त्याच भूमी मध्ये राहण्याचा निश्चय केला होता, त्याच प्रकारे अंधाऱ्याचे आत्मे यांनी निश्चित केले आहे एखादया विशेष अशा व्यक्तीच्या जीवनात राहावे. काही आत्मे हेहट्टी आहेत आणित्यांनी तेथेच राहण्याचे ठरविले आहे.
हे मग तेव्हाच तुम्हाला प्रार्थना आणि उपास ची भारदस्त शस्त्रसामग्री आणण्याची गरज आहे. प्रभु येशूने म्हटले, "तथापि, अशा प्रकारचे भूत हे प्रार्थना आणि उपास शिवाय जात नाही." (मत्तय १७: २१)
अमोऱ्यांनी दानाच्या वंशजांना डोंगराळ प्रदेशात मागे रेटले; ते त्यांना तळवटीत उतरू देईनात. (शास्ते १:३४)
येथे काही आत्मे आहेत जे तुम्हाला काही निश्चित क्षेत्रात जाऊ देत नाहीत. येथे काही ठिकाणे आहेत जी तुमच्यासाठी बंद आहेत.
Chapters