जे प्रारंभापासूनहोते, जे आम्ही ऐकले आहे, जे आम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे, जे आम्ही न्याहाळले व आपल्या हातानी चाचपले, त्या जीवनाच्या शब्दाविषयी आम्ही सांगतो.
(१ योहान १:१)
१. जे आम्ही ऐकले आहे
२. जे आम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे
३. जे आम्ही न्याहाळले
४. जे आम्ही आपल्या हातांनीचाचपले
की परमेश्वर प्रकाश आहे, आणि त्याच्यामध्ये काहीही अंधार नाही. तथापि,त्याच्याबरोबर आपली सहभागिता आहे असे जर आपण म्हणत असलो, पण अंधारात चालत असलो, तर आपण खोटे बोलतो, सत्याने वागत नाही.
ख्रिस्ती लोकांसाठी हे चांगले वचन आहे की दिवाळीच्या दिवशी हिंदू लोकांपर्यंत घेऊन जावे.
स्मरण वचन
पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे, आणि त्याचा पुत्र येशू ह्याचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करिते. (१ योहान १:७)
त्याच्याबरोबर आपली सहभागिता आहे असे जर आपण म्हणत असलो, पण अंधारात चालत असलो, तर आपण खोटे बोलतो, सत्याने वागत नाही.पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे, आणि त्याचा पुत्र येशू ह्याचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करिते. (१ योहान १:६-७)
तुम्ही एका गोष्टीचा दावा करता आणि तुमचे जीवन दुसरेच काहीतरी प्रगट करते, तर तुम्ही खोटारडे आहात, आणि सत्यावर चालत नाही. कदाचित तुम्ही सत्य वाचता, तुम्ही सत्याविषयी गाता, सामाजिक माध्यमावर सत्याविषयी लिहिता वगैरे, परंतु वास्तविकता ही तीच राहते की तुम्ही सत्यानुसार चालणारे नाहीत.
जेव्हा कोणाचे जीवन हे मुख्यतः पाप द्वारे दर्शविले जाते, आपल्याकडे चांगले कारण आहे याचा अनुमान लावणे की त्याचे कार्य हे प्रामाणिक नाही.
प्रकाशात चालणे काय आहे?
प्रकाशात चालणे याचा अर्थ तो जसा चालला आपण सुद्धा तसे चालले पाहिजे.
प्रकाशात चालणे याचा हा सुद्द्धा अर्थ आहे की एकमेकांबरोबर चांगली संगती असली पाहिजे.
प्रकाशात चालणे याचा अर्थ आपण पापापासून पूर्णपणे मुक्त झालो आहोत असे नाही, त्याउलट, त्याचा अर्थ आपण आतापासून पापाचे गुलाम नाहीत. (रोम ६:१७-१९)
स्मरण वचन
जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीयव न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील, व आपल्याला सर्व अनीतीपासून शुद्ध करील. (१ योहान १:९)
हे वचन आपल्या सर्वांना जे ह्या पापमय जगात अपराधांसह संघर्ष करीत आहेत त्या सर्वांसाठी क्षमा व शुद्धतेचे आश्वासन निश्चित करते.
दैवी क्षमेला दोन दृष्टीकोन आहेत. एक आहे कायद्यात्मक क्षमा तेदेव जो न्यायाधीश म्हणून देतो. ही क्षमा तुमच्या पापांसाठी ख्रिस्ताच्या प्रायश्चित्तद्वारे देवाने तुमच्यासाठी विकत घेतली आहे. अशा प्रकारची क्षमा तुम्हाला सार्वकालिक दोषाच्या कोणत्याही भयापासून मुक्त करते.न्यायीकरणाचीही क्षमा आहे.
अशी क्षमा ही ताबडतोब पूर्ण होते-तुम्हाला आता त्याचा पुन्हाशोध करण्याची गरज नाही.
दुसरी ही आई-वडिलांची क्षमा जी परमेश्वर तुमचा पिता म्हणून देतो. त्यास दु:ख होते जेव्हा त्याची मुले पाप करतात.
न्यायीकरणाची क्षमा कायद्यात्मक दोषाला विचारात घेते, परंतु ते तुमच्या पापावर पित्याच्या अप्रसन्नतेला रद्द करीत नाही. तो ज्यांच्यावर प्रीती करतो त्याप्रत्येकाला तोशिक्षा करतो, हे त्यांच्या भल्यासाठी असते. (इब्री १२:५-११)
परमेश्वराच्या शिस्ती मध्ये-कधीकधी अवज्ञेकरिताशिक्षा-दु:ख देणारी, सामावलेली असते; ह्याबाबत कोणीही वाद करणार नाही. परंतु तुम्ही हे लक्षात ठेवले पाहिजे: त्याच्या पवित्रतेमध्ये सहभागी होण्यास तुम्हाला कारणीभूत करीत आहे (वचन १०), तो तुम्हाला प्रशिक्षण देत आहे (वचन ११), तो तुमच्या मध्ये "धार्मिकतेचे शांतीमय फळ" निर्माण करीत आहे (वचन११).
म्हणून जेव्हा तुम्ही पाप केले आहे, स्वतःला नम्र करा, तुमची पापे कबूल करा, आणि त्याच्या प्रेमळ शिस्तीच्या अधीन व्हा.