निवडलेली बाई व तिची मुले ह्यांस वडील ह्यांजकडून: जे सत्य आपल्या ठायी आहे व आपल्याबरोबर सर्वकाळ राहील, त्या सत्यामुळे तुम्हांवर मी खरी प्रीति करतो; आणि मीच केवळ नव्हे तर ज्यांना सत्याचे ज्ञान झाले आहे ते सर्वच करितात. (२ योहान १)
प्रीतीचा आधार हा नेहमीच सत्य असला पाहिजे. सत्य हे देवाचे वचन आहे. (योहान १७:१७)
"प्रीति आणि आदेश" यामधील संबंध
हे प्रेम आहे, की आपण त्याच्या आज्ञेनुसार चालतो. (२ योहान १:६)
१. येशू त्याच्या पित्याच्या आज्ञा पाळतो आणि त्याच्या पित्याच्या प्रीतीत राहतो.
"मी आपल्या पित्याच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रीतीत राहतो" (योहान १५:१०ब)
२. येशू त्याच्या पित्याच्या आज्ञा पाळतो म्हणजे जगओळखेल की येशू त्याच्या पित्यावर प्रीति करतो.
"मी पित्यावर प्रीति करतो आणि पित्याने जशी मला आज्ञा दिली तसे करितो, हे जगाने ओळखावे म्हणून असे होते." (योहान १४:३१)
३. जरी तुम्ही येशूवर प्रीति करता तर तुम्ही येशूच्या आज्ञा पाळाल.
"माझ्यावर तुमची प्रीति असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल." (योहान १४:१५)
४. जर तुम्ही येशूच्या आज्ञा पाळल्या, तर तुम्ही येशूच्या प्रीतीत राहाल.
"तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रीतीत राहाल." (योहान १५:१०)
ख्रिस्ताच्या शिक्षणाला चिकटून न राहता जो पुढेपुढेच जातो त्याला देव प्राप्त झाला नाही; जो शिक्षणाला धरून राहतो त्याला पिता व पुत्र ह्या दोघांची प्राप्ति झाली आहे. (२ योहान ९)
काळजीपूर्वक लक्षात घ्या योग्य सिद्धांत असण्याचेमहत्त्व. योग्य सिद्धांत व्यक्तीला येशू व पित्या बरोबर संबंधात आणते.
तेथे योहानाच्या वेळेस काही होते ज्यांनी देवाच्या पुत्राचा नकार केला होता की तो प्रत्यक्षात शरीरातआला आहे. ते त्या गटाचा हिस्सा होते ज्यांस ग्नोस्टिकअसे म्हणतात, जे असा विश्वास ठेवत होते की शारीरिक गोष्टी ह्या वाईट आहेत व आध्यात्मिक गोष्टी ह्या शुद्ध आहेत. त्यामुळे, ते येशूला स्वीकारीत नव्हते कारण तो शरीराने जन्मला होता. (लूक २:७)
हे शिक्षण न देणारा कोणी तुम्हांकडे आला तर त्याला घरात घेऊ नका व त्याचे क्षेमकुशल विचारू नका; कारण जो त्याचे स्वागत करितो तो त्याच्या दुष्कर्माचा भागीदार होतो. (२ योहान १०-११)
जे असे सिद्धांत आणतात आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे. पवित्र शास्त्र आपल्याला चेतावणी देते की जर आपण अशा लोकांबरोबर संगती करतो तर आपण सुद्धा त्याच्या दुष्कार्मांचे भागीदार होतो.
Chapters