देवपित्याला प्रिय असलेले आणि येशू ख्रिस्तासाठी राखून [वेगळे असे केले]ठेवलेले असेपाचारलेले लोक [ज्यांसनिवडिले आहे]ह्यांस येशू ख्रिस्ताचा [मशीहा]दास व याकोबाचा बंधु यहूदा [जो हे पत्र लिहित आहे]ह्याच्याकडून. (यहूदा १:१)
हे पत्र यांस लिहिले होते:
१.पाचारलेले लोक [निवडलेले]
२. देवपित्याला प्रिय असलेले
३.येशू ख्रिस्तासाठी राखून ठेवलेले [वेगळे केलेले]
तेथे लोक असतील जी आपल्या देवाच्या कृपेला कामातुरपणाने विपर्यास करतील. (यहूदा १:४)
न्यू लिविंग ट्रान्सलेशन त्यास फारच भविष्यात्मक असे वर्णन करते.
मी हे म्हणत आहे कारण काही अभक्त लोक तुमच्या मंडळी मध्ये चोरून आत शिरली आहेत, ते म्हणत आहेत देवाची अद्भुत कृपा आपल्याला अनैतिक जीवन जगू देते.( यहूदा १:४)
प्रामाणिक कृपा ही पाप करण्यास परवाना असे नाही; ते सामर्थ्य आहे की पापावर वर्चस्व ठेवून जगावे. कोणतेही कृपेचे शिक्षण जे देवाच्या पवित्र प्रमाणाशी तडजोड करावयास लावते ते देवाच्या कृपेचा विपर्यास करीत आहे.
आणि ज्या देवदूतांनी आपले अधिकारपद न राखता आपले वसतिस्थान सोडले, त्यांस त्याने निरंतरच्या बंधनात, निबिड काळोखामध्ये महान दिवसाच्या न्यायाकरिता राखून ठेवले. (यहूदा १:६)
नफ्ताली चा नवीन करार हे संशयात्मक पुस्तकात ३.३.४-५ मध्येसदोम च्या स्त्रिया व हे पतित देवदूत यांच्या मधील लैंगिक संबंधाचा संदर्भ देत आहे, ज्यांस'पहारेकरी' असे म्हटले आहे.
जुबिली चे पुस्तक देवा द्वारे पाठविलेल्या पवित्र दुतांचा उल्लेख करतेकी"पहारेकरी" यांना शिक्षा करावी.
हनोखाच्या दुसऱ्या पुस्तकात सदोमा मधील लोक निषिद्ध कार्ये करीत आहेत याचे वर्णन आहे ज्यात ते लेकरांबरोबर लैंगिक कृत्ये, जादूटोणा, मंत्रतंत्रे आणि अनेक दैवतांच्या उपासना ह्या आहेत. हनोखाचेपहिले पुस्तक ६-१० मध्ये, हे सुचविते की तेथे असे दोनशे "पहारेकरी" होते, जे पृथ्वीवर आले होते, जे सदोमातील स्त्रियांसाठी वासना घेऊन आले होते ज्यांना त्यांच्यापासून लैंगिक सहवासातून नेफिलीम (महाकाय) असे उत्पत्ति झाली होती. मनुष्य व देवदूत दोघांनी देवा द्वारे आखलेल्या मर्यादेचे उल्लंघन केले होते.
तरीही मीखाएल आद्यदेवदूत, सैतानाबरोबर संघर्ष करीत होता, जेव्हा त्याने मोशेच्या शरीरा विषयी वाद उपस्थित केला होता, तेव्हा त्याला दोषी ठरवून त्याची निंदा करावयास तो धजला नाही; तर'प्रभु तुला धमकावो' एवढेच तो म्हणाला. (यहूदा १:
९)
यहूदासंशयात्मक पुस्तकाचा संदर्भ देत आहे ज्यात हा वृत्तांत आहे.
ओरीगेन, प्रारंभीचे ख्रिस्ती विज्ञानी व ईश्वरविज्ञानी, "मोशे चे अनुमान" या पुस्तकाचा उल्लेख करतात, जे ह्याच वादविवादाचा उल्लेख करते जे सैतान व आद्यदेवदूत मीखाएल मध्ये मोशे च्या शरीरावरून झाला होता.
सैतानाला मोशे चे शरीर लोकांसाठी उपलब्ध असे पाहिजे होते की त्यांना त्यामध्ये लुभवावे की देवा ऐवजी मोशे च्या हाडांची उपासना करावी. अशा प्रकारे त्यांनी स्वतःलाच शाप दिला असता. परमेश्वरालाअसेव्हावयास नको होते आणि म्हणून त्याने त्याच्या दुताला पाठविले की मोशे जो त्याचा सेवक याचे शरीर लपवून ठेवावे.
परंतु प्रियजनहो, तुम्ही तर आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या [मशीहा, अभिषिक्त जन] प्रेषितांनी [विशेष असे दूत] पूर्वी सांगितलेल्या वचनांची आठवण ठेवा. (यहूदा १:१७)
पवित्र शास्त्र आपल्याला आदेश देते की पवित्र शास्त्रात तसेच देवा द्वारे अभिषिक्त पुरुष व स्त्रियां द्वारे केलेले भविष्यात्मक भाकीताची आठवण करावी.
आशीर्वाद
तुम्हांस पतनापासून राखण्यास आणि आपल्या ऐश्वर्ययुक्त सान्निध्यात निर्दोष असे उल्लासाने उभेकरण्यास जो समर्थ आहे,
अशा आपल्या उद्धारक एकाच देवाला,
येशू ख्रिस्त आपला प्रभु ह्याच्या द्वारे गौरव,
महिमा, पराक्रम व अधिकार ही युगारंभापूर्वी,
आता व युगानुयुग आहेत.
आमेन. (वचने २४-२५)
Chapters