आपल्याला कसे जगावयाचे आहे तशीआपण योजना करतो, परंतु केवळ देव आपणांस समर्थ करतो की जगावे. (नीतिसूत्रे 16:9)
आपण उद्देश आणि योजना आखू शकतो की आपल्याला कसे जगावयाचे आहे आणि ते प्रशंसनीय असे आहे. तथापि, हा केवळ प्रभूच आहे, जोतसे करण्यास आपल्याला सामर्थ्य आणि योग्यता देतो.
प्रभु त्याच्या दयेमध्ये आपल्याला तीन मुख्य गोष्टी पुरवितो की आपल्या उद्धेशाकडे पोहोचावे आणित्याद्वारे परिवर्तन आणावे.
#1: तुम्हाला सामर्थ्यशाली करण्यासाठी तुम्हाला देवाच्याआत्म्याची गरज आहे.
देव तुम्हाला अशा स्थितीत ठेवणार नाही किंवा कोणतेही कार्य पूर्ण करण्यास तुम्हाला विचारणार नाही ज्यासाठी त्याने तुम्हाला पूर्णपणे तयार आणि समर्थ केलेले नाही. हेपूर्णपणे तयार आणि समर्थ करणे हे इच्छाशक्ती वर आधारित नाही तर देवाच्या सामर्थ्यावर आधारित आहे.
कारण हा तो [हे तुमचे सामर्थ्य नाही, तर त्याचे]परमेश्वर आहे जो तुम्हांमध्ये कार्यरत आहे, दोन्ही म्हणजे इच्छा आणि कृती साठी [ते म्हणजे, तुम्हां मध्ये शक्ती, ऊर्जा आणि प्रेरणा दयावी आणि तुमचे उद्देश पूर्ण करण्यासाठी समर्थता निर्माण करावी] त्याच्या चांगल्या संकल्पासाठी आहे. (फिलिप्पै 2:13)
हे प्रयत्न करण्यावर आधारित नाही, तर भरंवसा ठेवण्यावर. "तुम्ही तुमच्या स्वतःच्या शक्तीने किंवा तुमच्या स्वतःच्या सामर्थ्याने यश मिळवू शकणार नाही परंतु माझ्या आत्म्याद्वारे, असे परमेश्वर म्हणतो. (जखऱ्या 4:6). म्हणून, प्रतिदिवशी, जेव्हा आपण प्रार्थने मध्ये राहतो, तुम्ही पवित्र आत्म्याला विनंती करा की यावे आणि तुम्हाला समर्थ करावे.
#2: तुम्हाल मार्गदर्शन करण्यासाठी तुम्हाला देवाच्यावचनाची गरज आहे.
बायबल हे जीवनासाठी मार्गदर्शक असे आहे. जितके तुम्ही ते वाचाल, त्याचाअभ्यास कराल, त्याचे स्मरण कराल, आणि त्यावर मनन कराल तितके अधिक तुम्ही तुमच्या जीवनात यशस्वी आणि परिपूर्ण असे व्हाल.
जेव्हा यहोशवा ला देवाच्या लोकांचे आश्वासित भूमि मध्ये मार्गदर्शन करण्याचे कार्य सोपविले गेले-एक कार्य जे निश्चितच सोपे नव्हते.
देवाने हे शब्द त्यास सांगितले हे बोलत: "नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे; त्यात जे काही
लिहिले आहे ते तू काळजीपूर्वक पाळ आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यश:प्राप्ति घडेल." (यहोशवा 1:8)
#3: तुम्हाला साहाय्य करण्यासाठी देवाच्या लोकांची गरज आहे.
तुम्ही तुमच्या स्वतःहून तुमचे उद्देश्य पूर्ण करू शकणार नाही. स्वप्न पूर्ण करण्यासाठी एका संघाची आवश्यकता लागते! एक जमाव तुम्हाला मदत करू शकत नाही परंतु एक लहान गट करू शकतो. फेसबुक वरील 5000 हितचिंतक हे तुमच्याजवळ असणार नाहीत जेव्हा तुम्हाला त्यांची अत्यंत गरज असेन.
तुमच्यालहान जे-12 गटातील लोक हे मदतीचा एक चांगलास्त्रोत होऊ शकतात जेव्हा तुम्हाला त्यांची अत्यंत गरज असते. (आता, कृपा करून हे समजा की कधीकधी सर्व लोक हे जसे ते आपणांस हवे आहेत तसे असणार नाहीत. तेथे नेहमीच काही विषम असे लोक असतील.)
तरीसुद्धा, जे बायबल सांगते ते करण्यास मी प्राधान्य देईन, 'तुमच्या स्वतःहून तुम्ही असुरक्षित आहात. मित्रांसह तुम्ही वाईट गोष्टींचा सुद्धा सामना करू शकता. काय तुम्ही तिसरा पिळा बनू शकता? एक तीन-पदरी दोरी सहसा तुटत नाही. (उपदेशक 4:12)
जेव्हा तुमचे उद्देश्य पूर्ण करण्यात अडथळे हे उत्पन्न होतील, तेथे पोहचण्यासाठी तुमचा निर्णय बदलू नका, त्याऐवजी वरील तीन योजना कार्यान्वित करा.
प्रार्थना
पित्या, तुझी कृपा ही माझ्यासाठी पुरेशी आहे, तुझे सामर्थ्य माझ्या अशक्तपणात मला समर्थ करते. मी शक्तिशाली आणि निडर होईन, कारण माझा प्रभू परमेश्वर माझ्याबरोबर आहे. तो मला सोडणार नाही ना ही माझा त्याग करेन. येशूच्या नांवात, आमेन.
Most Read
● तुमची नवीन वाटचाल थांबविली जाऊ शकत नाही● मृतामधून प्रथम जन्मलेला
● दैवी शांति मध्ये प्रवेश कसा मिळवावा?
● परमेश्वराला पाहिजे की तुमचाउपयोग करावा
● शरण जाण्याचे ठिकाण
● महान पुरुष व स्त्रिया का पतन पावतात - ४
● तुमचे संबंध गमावू नका
टिप्पण्या