इस्राएल घराण्यापैकी अथवा त्यांच्यामध्ये राहणाऱ्या परदेशीय लोकांपैकी कोणी कोणत्याही प्रकारचे रक्त सेवन केले तर रक्त सेवन करणाऱ्या मनुष्याला मी विन्मुख होईन त्याचा स्वजनांतून उच्छेद करीन. (लेवीय १७: १०)
मी त्या मनुष्याला विन्मुख होईन जो रक्त सेवन करेल.
इस्राएली लोकांना परमेश्वराचा हा कडक आदेश होता, परंतु कारण हे सरळ होते.
"शरीराचे जीवन तर रक्तांत असते, आणि तुमच्या जिवाबद्दल वेदीवर प्रायश्चित्त करण्यासाठी ते मी तुम्हांला दिले आहे; कारण रक्तांत जीव असल्याकारणाने रक्तानेच प्रायश्चित्त होते." (लेवीय १७: ११)
१. कारण शरीराचे जीवन रक्तांत आहे.
विचार हा की सर्व जीवन हे परमेश्वराचे आहे आणि कारण रक्त हे जीवात असते, तर विशेषतः ते देवाचे आहे.
बायबल जोर देऊन सांगते "जीवन" हे रक्ता मध्ये आहे. जेव्हा रक्त तुमच्या शरीरात वाहणे थांबते, तेव्हा तुम्ही मृत होता, पूर्णपणे आणि लगेच. त्याप्रमाणेच, ईश्वरविज्ञान, चर्च, एक प्रार्थना गट किंवा एक व्यक्तिख्रिस्ताच्या रक्ता शिवाय मृत आहे.ख्रिस्ताचे जीवन, त्याच्या सामर्थ्या आणि आशीर्वाद सह, हे केवळ तुमचेच आहे कारण तुम्ही विश्वासा द्वारे त्याच्या रक्ता मध्ये जुडलेले आहात.
२. आणि तुमच्या जिवाबद्दल वेदीवर प्रायश्चित्त करण्यासाठी ते मी तुम्हांला दिले आहे: त्यातच भर, रक्त हे माध्यम होते ज्याद्वारे प्रायश्चित्त हे केले जात होते-त्यामुळे रक्त सेवन करणे हे त्यास अपवित्र करणे होय. तसेच, प्रायश्चित्ताच्या स्मरणात्मक भरपाईद्वारे पापाची गंभीरता ही प्रकट होते-मृत्यू.
३. अर्थातच, अनेक विधर्मी विधी मध्ये रक्त पिणे साजरे केले जाते, आणि परमेश्वराला ह्या विधर्मी विधींपासून सुद्धा वेगळे होणे पाहिजे होते.
"इस्राएल लोकांपैकी कोणी अथवा त्यांच्यामध्ये राहणाऱ्या परदेशियांपैकी कोणी खाण्यालायक पशुची किंवा पक्ष्याची शिकार केली तर त्याने त्याचे रक्त जमिनीवर ओतून मातीने झाकावे. कारण प्राणिमात्रांच्या जीवनाविषयी म्हणाल तर त्यांचे रक्त हेच त्यांचे जीवन होय; ह्यास्तव इस्राएल लोकांना मी म्हटले आहे की, कोणत्याही प्राण्यांचे रक्त सेवन करू नये, कारण सर्व प्राण्यांचे जीवन हेच त्यांचे रक्त होय, ते जो कोणी सेवन करील त्याचा उच्छेद व्हावा." (लेवीय १७: १३-१४)
जुन्या करारात प्राण्यांच्या रक्ताला हा आदर ह्याने आपल्याला विचार करावयास लावले पाहिजे की आपण येशूच्या रक्ताला कसा आदर दिला पाहिजे. जर, जुन्या करारात, प्राण्यांच्या रक्ताला आदर दिला पाहिजे होता, तर येशूच्या मौल्यवान रक्ता विषयी काय जे नवीन करार करते?
तर ज्याने देवाच्या पुत्राला पायांखाली तुडविले, जेणेकरून तो स्वतः पवित्र झाला होता ते 'कराराचे रक्त' ज्याने अपवित्र मानले, आणि कृपेच्या आत्म्याचा अपमान केला तो किती अधिक कठीण दंडास पात्र ठरेल म्हणून तुम्हांस वाटते?" (इब्री १०: २९)
प्रार्थना
पित्या, मी तुझे आभार मानतो की सर्व जीवन हे तुझे आणि केवळ तुझेच आहे. मी माझे जीवन तुझ्या हातात समर्पित करतो. येशूच्या नांवात.
प्रभु येशू, येशूच्या मौल्यवान रक्तासाठी मी तुझे आभार मानतो जे माझ्या उद्धारा करिता सांडले गेले.
येशूच्या नांवात आणि येशूच्या रक्ता द्वारे, पाप, सैतान, आणि त्याच्या सेवकांवर मी विजय घोषित करतो.
प्रभु येशू, येशूच्या मौल्यवान रक्तासाठी मी तुझे आभार मानतो जे माझ्या उद्धारा करिता सांडले गेले.
येशूच्या नांवात आणि येशूच्या रक्ता द्वारे, पाप, सैतान, आणि त्याच्या सेवकांवर मी विजय घोषित करतो.
Most Read
● तुमची सुटका आणि स्वास्थ्याचा उद्देश● नवीन वर्षाच्या शुभेच्छा २०२१ (दिवस २१)
● एस्तेरचे रहस्य काय होते?
● युद्धासाठी प्रशिक्षण
● कालेबचा आत्मा
● तुमच्या नवीन वाटचालीस प्राप्त करा
● तुम्ही अजूनही का थांबून आहात?
टिप्पण्या