परमेश्वराने म्हटले की "जो याजक परमेश्वराची सेवा करीत आहे, त्याने देवडी व वेदी च्या मध्ये रुंदन करावे." (योएल २:१७)
घरामध्ये, 'देवडी" हा भाग सर्व जण पाहू शकतात, ते सेवाकार्याचे सार्वजनिक प्रदर्शन सादर करते. वेदी खाजगी सेवा सादर करते. ख्रिस्ती लोकांच्या जीवनात, येथे सार्वजनिक पेक्षा देवाला खाजगी सेवा असली पाहिजे.
जेव्हा तुम्ही आपल्या प्रभु येशू विषयी वाचता, तेव्हा तुम्ही त्याला जितके खाजगीमध्ये प्रार्थना करताना पाहता तसे सार्वजनिकपणे प्रार्थना करिताना पाहत नाही. बायबल आपल्याला सांगते की तो नेहमी रात्रीच्या वेळी प्रार्थना करीत असे आणि त्याच्या पित्याबरोबर घनिष्ठ संबंधात एकटाच वेळ घालवित असे. खाजगी भक्तीच्या त्या वेळेमधून, देवाच्या सामर्थ्याचे सार्वजनिक प्रदर्शन हे आरोग्य देणे, मृतांमधून उठविणे, आशीर्वाद व बरेच काही यामधून ओसंडून वाहत असे.
विजय हे सार्वजनिकपणे नाही तर खाजगीपणे जिंकिले जाते. त्यामुळेच उपास करणे ही इतकी खाजगी शिस्त आहे. जेथे कोठे थोडीच खाजगी शिस्त आहे, तेथे थोडाच सार्वजनिक पुरस्कार आहे.
देवाचा पुरस्कार हा सर्वांना पाहण्यासाठी आहे. फक्त ईयोबाच्या जीवनाकडे पाहा. तो विनाशकारक संकटातून गेला व सर्व काही गमाविले. त्याची संपत्ति, त्याचा परिवार, त्याचे स्वास्थ्य सर्व काही त्याच्याकडून काढून घेतले गेले. तरीसुद्धा त्याने प्रार्थना केली, त्याने उपास केला, आणि तो खाजगी भक्ती करण्यात विश्वासू राहिला.
ईयोबाने म्हटले, ".....माझ्या स्वतःच्या मनोरथापलीकडे मी त्याच्या तोंडची वचने जतन करून ठेविली आहेत" (ईयोब २३:१२). आणि परमेश्वराने ईयोबाच्या दु:खाचा परिहार केला; पूर्वी ईयोबाची मालमत्ता होती तिच्या दुप्पट परमेश्वराने त्याला दिली" (ईयोब ४२:१०). बायबल म्हणते की, परमेश्वराने, "ईयोबाच्या पूर्वीच्या दिवसांपेक्षा त्याचे नंतरचे जीवन अधिक आशीर्वादित केले" (ईयोब ४२:१०), आणि त्याला अधिक पुत्र व कन्या दिल्या. देवाच्या उघड पुरस्काराने ईयोबाचे जीवन आशीर्वादाने भरून गेले.
असे होवो की परमेश्वर तुम्हाला उघडपणे आशीर्वाद देवो कारण हे तुमचे गुप्तपणे दान देणे, प्रार्थना व उपास आहेत. लोक तुमच्याकडे पाहतील व म्हणतील, "पाहा, परमेश्वराने काय केले आहे."
सुचना: आज उपासाचा दुसरा दिवस आहे. लक्षात ठेवा ऑगस्ट व सप्टेंबर २०२० च्या महिन्यात मंगळवार, गुरुवार व शनिवार ह्या दिवशी आपण उपासात आहोत. कृपा करून आमच्याबरोबर एक व्हा की सामर्थ्यशाली आध्यात्मिक व शारीरिक नवीन वाटचाल प्राप्त करावी.
प्रार्थना
प्रत्येक प्रार्थना शस्त्र जोपर्यंत तुमच्या अंत:करणातून येत नाही तोपर्यंत ते वारंवार म्हणत राहा. केवळ तेव्हाच मग पुढच्या प्रार्थना शस्त्राकडे वळा. (वारंवार करा, व्यक्तिगत बनवा, प्रत्येक प्रार्थना मुद्यासह ते कमीत कमी 3 मिनिटे असे करा.)
१. प्रत्येक सैतानी अडखळणे जे माझी प्रगती, माझ्या कुटुंबाच्या प्रगती मध्ये बाधा करीत आहे, ते येशूच्या नांवात उपटून टाकिले जावो.
२. प्रत्येक सैतानी अडखळणे जे करुणा सदन सेवाकार्याच्या प्रगती मध्ये बाधा करीत आहे, ते येशूच्या नांवात अग्निद्वारे उपटून टाकिले जावो.
३. प्रत्येक सैतानी अडखळणे जे पास्टर मायकल, त्यांचे कुटुंबीय व त्यांच्या संघाच्या प्रगती मध्ये बाधा करीत आहे, ते येशूच्या नांवात पूर्णपणे विखरून टाकिले जावो.
४. पवित्र आत्म्याच्या अग्नि माझ्यावर व माझ्या कुटुंबावर येशूच्या नांवात उतरो.
पवित्र आत्म्याचा अग्नि आपल्या देशावर कार्य करो. आमच्या देशाच्या लोकांना तुझ्याकडे वळीव हे परमेश्वरा. आमच्या देशाला स्वास्थ्य दे परमेश्वरा.
माझ्या प्रार्थनेला उत्तर दिल्याबद्दल तुझा धन्यवाद होवो, हे परमेश्वरा. येशूच्या नांवात, आमेन.

Most Read
● कृपेवर कृपा● मुळा बद्दल विचार करणे
● परमेश्वराला प्रथम स्थान देणे# २
● पित्याची मुलगी-अखसा
● तुम्ही अजूनही का वाट पाहत आहात?
● योग्य व्यक्तीबरोबर संबंध ठेवा
● दिवस १४ : २१ दिवस उपास व प्रार्थनेचे
टिप्पण्या