येशू कडे पाहण्याचा काय अर्थ आहे? प्रभु येशू व त्याचे वचन हे एक आहे. वास्तवात, पवित्र शास्त्र त्यास देवाचे वचन म्हणते. (योहान १:१)
देवाचे वचन हे आरशा प्रमाणे आहे. आपण इतरांची पडताळणी करण्यासाठी नेहमी आरशा चा उपयोग करतो. पवित्रशास्त्र सांगते की जसे आरसा प्रतिबिंबितकरतो की आपण बाहेरून कशा समान आहोत, देवाचे वचन प्रतिबिंबित करते की आपण आतून कशा समान आहोत (याकोब २३-२४). जेव्हा तुम्ही वचनावर विचार करता, तुम्ही प्रत्यक्षात येशू कडे पाहत आहात.
याकोबआपल्याला तीन व्यवहारिक मार्ग देतो की देवाच्या वचनावर विचार करावा.
परंतु जो स्वातंत्र्याच्या परिपूर्ण नियमांचे निरीक्षण करून ते तसेच करीत राहतो, तो ऐकून विसरणारा न होता, कृति करणारा होतो व त्याला आपल्या कार्यांत धन्यता मिळेल. (याकोब १:२५)
ते वाचा'....जो कोणी सिद्ध नियमशास्त्रात हेतुपूर्वक पाहतो.
त्याची उजळणी करा '.....आणि तसेच करीत राहा....'.याचा अर्थ वारंवार व वारंवार व वारंवार.
ते लक्षात ठेवा'......ते विसरू नये जे त्यांनी ऐकले आहे..'
तुमच्या आध्यात्मिक वाढी साठी एक सर्वात मोठी गोष्ट तुम्ही जी करू शकता ते पवित्र शास्त्राची वचने स्मरणात ठेवण्याची सवय विकसित करावी. काही वेळा नंतर असे दिसते की तुम्ही ते विसरू शकता परंतु मला तुम्हाला सांगू दया, तुमचा आध्यात्मिक मनुष्य जेव्हा तुम्हाला फारच गरज असेन तेव्हा ती वचने तुम्हाला स्पष्ट करेन.
जर तुम्ही तुमच्या स्वतःकडे किंवा इतर कोणाकडे पाहत असाल, तरही वेळ आहे की येशू कडे पाहण्यास सुरुवात करावी. तुम्ही हे कसे करता? जे वचन तुम्ही वाचले, उजळणी केली व स्मरण केले आहे त्याची अपेक्षा करा की ते प्रत्यक्ष जीवनाच्या परिस्थितीत तुमच्यासाठी कार्य करेल.
शर्यतीत धावणारे सर्व धावतात पण एकालाच बक्षीस मिळते हे तुम्हांला ठाऊक नाही काय? असे धावा की तुम्हांला ते मिळेल. (१ करिंथ ९:२४)
पवित्र शास्त्र आपल्याला प्रोत्साहन देते की जिंकण्याच्या विचाराने रेस पळावी. जर तुम्ही वरील गोष्टी करता,तर तुम्ही निश्चितच रेस ही चांगल्या प्रकारे धावाल व जिंकाल.
प्रार्थना
पित्या, माझ्या अंत:करणाला येशूच्या प्रीति मध्ये निर्देशित कर, आणि त्याचे सातत्य पाळावे.
पित्या, मला साहाय्य कर की चांगली लढत लढावी, धाव संपवावी व विश्वास राखावा येशूच्या नांवात मी प्रार्थना करतो. आमेन.
Most Read
● एक शास्वती होय● भविष्यात्मक मध्यस्थी
● स्वप्न पाहण्याचे धाडस करा
● स्वैराचाराच्या सामर्थ्यास मोडणे-२
● प्रार्थनारहित जीवन जगण्याचे पाप
● चला आपण परमेश्वराकडे वळू या
● आत्म्यात उत्सुक असा
टिप्पण्या