जी एक गोष्ट आहे जेव्हा इतर आपल्या विरुद्ध चुका करतात; आपल्याला विश्वास असू शकतो की देव आपल्याला पुनर्स्थापित करेल, परंतु जेव्हा आपण स्वतःच आपणांवर संकट आणतो, तेव्हा आपण खेद व यातनेमध्ये जगतो, हा विचार करून की देव आपल्याला साहाय्य करणार नाही कारण आपण स्वतःच हा सर्व गोंधळ केला आहे.
आपल्या दयाळू स्वर्गीय पित्याने, त्याच्या असीम ज्ञानामध्ये, आपला कमकुवतपणा जाणला आहे, आणि म्हणून एक रणनीती आखली आहे की आपल्या अपयशांना चमत्कारांमध्ये बदलावे ! देवाने केवळ चांगल्या समयाची योजना केलेली नाही, देवाकडे तेव्हा देखील योजना आहे जेव्हा आपण स्वतःच गोंधळ निर्माण केलेला आहे. देव आपल्या चुकांद्वारे आश्चर्यात नाही.
यिर्मया २९:११ म्हणते, "परमेश्वर म्हणतो, तुम्हांविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो; ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीत; ते तुम्हांस तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत." लक्षात घ्या, देवाजवळ केवळ योजना नाही, परंतु त्याजजवळ आपल्यासाठी "अनेक योजना" आहेत. याची पर्वा नाही की आपण किती चुका केल्या आहेत, त्याजजवळ नेहमीच आपल्यासाठी योजना आहे. जसे मी अगोदर उल्लेखिले आहे, परमेश्वर अगोदरच आपला कमकुवतपणा जाणून आहे.
१३ जसा बाप आपल्या मुलांवर ममता करितो, तसा परमेश्वर आपले भय धरणाऱ्यांवर ममता करितो.
१४ कारण तो आमची प्रकृती जाणतो; आम्ही केवळ माती आहो हे तो आठवितो. (स्तोत्र १०३:१३-१४)
परमेश्वराला हे ठाऊक आहे की आपण परीक्षेत पडू शकतो, अपमानित होतो, आणि कधी कधी चुकीचे शब्द वापरतो; तो आमची रचना जाणतो.
एक स्त्री होती जिचा विवाह एका अद्भुत पुरुषाबरोबर झाला होता परंतु कमकुवतपणाच्या स्थितीमध्ये, तिच्या कामाच्या ठिकाणी इतर कोणाबरोबर तरी भावनात्मकदृष्टया संबंधात आली होती. अर्थातच, तिने त्यानंतर पश्चाताप केला होता आणि आपल्या पतीला देखील सांगितले होते, ज्याने कृपेने तिला क्षमा केली व तीचा स्वीकार केला होता. तथापि, हे तिच्या मनात सतत डोकावत होते. जेव्हा जेव्हा ती केवळ एकटीच असे, ती आवाज ऐकू लागली. हे आवाज तिला सांगत असे, "ट्रेन मधून बाहेर उडी मार." एके दिवशी ट्रेनच्या अगदी पायथ्याजवळ ती आली होती आणि स्वतःला खाडीमध्ये झोकून देण्याचा प्रयत्न केला, परंतु देवाच्या कृपेने, कोणीतरी तीचा हात धरला.
तुमच्यापैकी कोणी आवाज ऐकत असतील तुम्हाला हे सांगत असतील की तुम्ही अपयशी आहात; तुमच्या जीवनात काहीही चांगले होणार नाही; तुम्ही इतक्या वाईटरीतीने गोंधळ केला आहे की त्यातून बाहेर निघण्याचा काहीही मार्ग नाही. मला तुम्हांला प्रोत्साहन देऊ दया.
तुम्हांला ठाऊक आहे काय की प्रभु येशूने स्वतःची कशी ओळख करून दिली? त्याने असे म्हटले नाही की, मी एक शिक्षक आहे, मी चमत्कार करणारा आहे. इतिहासाचे पुस्तक शोधून पाहा आणि तुम्ही स्वतःच पाहा. अनेकांनी म्हटले आहे, "हाच मार्ग आहे, या मार्गाने जा", आणि बरेच काही. केवळ प्रभु येशूने स्वतःला मार्ग म्हटले आहे (योहान १४:६). तुमच्या सर्व चुकांमधून, तुमच्या सर्व गोंधळामधून तो तुमच्यासाठी मार्ग बनवेल. यामुळेच तुम्ही त्याजवर विश्वास ठेवला पाहिजे!
आणखी एक स्त्री होती, तिने केवळ क्षुल्लक कारणामुळे, तिच्या पतीचे घर सोडले आणि तिच्या आईच्या घरी राहू लागली. आता तुम्हांला तर हे ठाऊकच आहे की येथे नेहमीच लोक असतील जे तुमच्या जीवनात इंधन व आग ओतण्याचे काम करतील. तिच्या मित्रांनी तिला सांगितले, "तुझी बाजू बरोबर आहे, तूं माघार घेऊ नको." तिचे तिच्या पतीवर प्रेम होते, परंतु आगीमध्ये सर्व इंधन ओतल्यामुळे, ती तिच्या आईच्या घरी तीन आठवडे राहिली. इतर बाजूने देखील, तेथे लोक होते जे आगीमध्ये इंधन घालीत होते. अफवा पसरू लागल्या, "तिचे इतर कोणाबरोबर तरी संबंध झाले असतील, आणि तेच तर कारण आहे की ती तिच्या घरी परत जात नाही." तिचे सासरचे लोक तिच्या पतीवर दबाव आणीत होते की तिला सोडून दयावे, आणि लवकरच, घटस्पोटाची सुचना तिला मिळाली. ती आमच्या एका प्रार्थना सभेला अश्रुपूर्ण अशी हे म्हणत आली, "पास्टर, देव माझा विवाह पुनर्स्थापित करू शकतो काय?" म्हणजे तुम्ही पाहता की कशी लहान ठिणगी मोठया गोष्टींमध्ये परिवर्तीत होते.
जर तुम्ही लूक १५ वाचता, तेथे एक मुलगा आहे जो त्याच्या पित्याजवळ येतो आणि म्हणतो, "मला ठाऊक आहे तूं जिवंत आहे, पण माझ्यासाठी तूं मेलेला आहे, मला संपत्तीचा माझा हिस्सा दे." त्या काळात संपत्ति मुलाला तेव्हाच दिली जात होती जेव्हा वडील मरण पावत असे. वडील, कोणताही वादविवाद न करता, पण खात्रीने दु:ख झालेले असताना, त्याच्या मुलाला संपत्तीचा त्याचा वाटा देतात. नीतिसूत्रे २०:२१ मध्ये बायबल म्हणते, "आरंभी उतावळीने मिळविलेल्या धनाचा शेवट कल्याणकारक होत नाही." तेच प्रत्यक्षात त्या मुलाच्या जीवनात घडले.
मग फार दिवस झाले नाहीत तोच धाकटा मुलगा सर्व काही जमा करून दूर देशी निघून गेला; आणि तेथे त्याने चैनबाजी करून आपली मालमत्ता उधळून टाकली. (लूक १५:१३)
त्याने सर्व काही खर्च केल्यानंतर, दुष्काळ उत्पन्न झाला आणि जिवंत राहण्यासाठी, तो डुकरे चारण्याचे काम करू लागला. एके काळी, मुलगा राजकुमारांसोबत संगती करीत होता, आणि आता तो डुकरांसोबत खात होता. एके दिवशी, तो शुद्धीवर आला आणि निर्णय घेतला की मी माझ्या पित्याच्या घरी परत जाईन.
तुमच्या चुका, तुमच्या सर्व गोंधळपणामध्ये पहिली गोष्ट जी अनुभवायची आहे ती हे जाणणे की तुमचा पिता हा दयाळू आहे. तुमचे शेजारी आणि तुमच्या नातेवाईकांनी तुम्हांला दया दाखविली नसेन, परंतु तुमचा स्वर्गीय पिता दयाळू आहे (लूक ६:३६). परमेश्वर दयाळू व क्षमाशील आहे! आम्ही ज्यास पात्र आहोत ते तो आम्हांस देत नाही. देवापासून लपू नका; त्याजकडे वळा.
म्हणून तो (उधळा पुत्र) उठला आणि त्याच्या (स्वतःच्या) पित्याकडे आला. परंतु जेव्हा फार दूरवर होता तेव्हाच त्याच्या पित्याने त्याला पाहिले आणि दया व सौम्यतेने भरून गेला होता (त्याच्यासाठी); आणि तो पळत गेला आणि त्यास मीठी मारिली आणि त्याचे मुके घेतले [तळमळीने]. (लूक १५:२०)
ही वास्तविकता की तो फार दूरवरच असताना त्याच्या पित्याने त्यास पाहिले याचा अर्थ त्याचा पिता दररोज त्याची वाट पाहत होता, हा विचार करून की एक दिवस माझा मुलगा परत वळेल आणि घरी परत येईल. आपला स्वर्गीय पिता देखील, त्याचप्रकारे आपल्यासाठी विचार करीत आहे, त्याच्याकडे परत यावे यासाठी आतुरतेने वाट बघत आहे.
पवित्र शास्त्र सांगते की पिता त्याच्या मुलाकडे धावत गेला. त्या काळातील मध्य पूर्वीय संस्कृतीमध्ये, एका सम्मानित माणसाने त्याचे वस्त्र वर ओढून धरावे आणि धावत जावे हे लज्जाजनक मानले जात होते. परंतु पित्याला ठाऊक होते की इतर कोणी जर त्यास प्रथम भेटले असते तर ते कदाचित त्यास मारतील, आणि त्यास परत माघारी घालवून देतील, किंवा कुटुंबाला लज्जित केल्याबद्दल सार्वजनिकपणे अपमानित करतील. समाजाकडे अशा मूर्ख व्यक्तीसाठी इतर काहीही नाही पण केवळ तिरस्कार होता. म्हणून पिता त्याच्या मुलाकडे धावत गेला, समाजाची लज्जा स्वतःवर घेतली.
हे तारणाचे चित्र आहे: परमेश्वर-मानवजातीकडे पूर्ण पसरलेल्या हाताने धावत आहे, केवळ आपल्याला मिठीत घेण्यासाठी नव्हे, तर आपल्या शिक्षेसाठी राखीव ठेवलेल्या खिळ्यांना स्वीकारावे.
एक व्यक्ति जो डुकरांसोबत राहिला आहे त्याच्याकडून चांगला वास येणार नाही, तरीही त्याचा पिता त्याजजवळ धावत गेला, त्यास मीठी मारली आणि तळमळीने त्याचे मुके घेतले. पित्याने हे म्हटले नाही, "प्रथम तूं अंघोळ कर आणि मग मी तुला मीठी मारीन व तुझे मुके घेईन." त्याने त्याच्या पुत्राचा जसा तो होता तसाच स्वीकार केला. हे परमेश्वराचे हृदय आहे. तो तुमच्याकडे धावत येईल; आणि तो तुम्हांला मीठी मारील आणि तुम्ही ज्या गोंधळाच्या स्थितीत आहात त्यातच तो तुमचे मुके घेईल. त्याची केवळ एवढीच इच्छा आहे की तुम्ही त्याजकडे वळावे.
प्रकटीकरण १:५ म्हणते, "जो आपल्यावर प्रीति करितो, ज्यांने आपल्या रक्ताने तुम्हांआम्हांला पातकातून मुक्त केले", शब्दांच्या क्रमाकडे लक्ष दया: प्रथम प्रीति केली आणि मग धुतले. हे असे नव्हते की देवाने आपल्याला काही कर्तव्याच्या हेतूने धुतले नाही आणि मग प्रीति केली कारण मग तेव्हा आपण शुद्ध होतो. आपण ज्यावेळेस घाणेरडे होतो तेव्हाच त्याने आपल्यावर प्रीति केली, पण मग त्याने आम्हांला धुतले.
तुम्ही कदाचित रडत असाल, "पास्टर, माझा विवाह निष्फळ झाला आहे; माझा व्यवसाय निष्फळ झाला आहे." निष्फळपणा भरभराटीमध्ये बदलण्यात आणि तुमच्या चुकांना आश्चर्यामध्ये बदलण्याचे परमेश्वरास प्रभुत्व आहे. रोम. ८:२८ मध्ये प्रेषित पौलाने लिहिले, "परंतु आपल्याला ठाऊक आहे की, देवावर प्रीति करणाऱ्यांस म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलाविलेल्यांस देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात." "सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात", सर्व गोष्टीमध्ये आपल्या चुका देखील आहेत.
देवाने अब्राहाम व साराला अभिवचन दिले होते की त्यांना बाळ होईल. अनेक वर्षे निघून गेली, आणि खरेच काहीही झाले नाही. यावेळी त्यांनी निर्णय घेतला की त्या परिस्थितीला स्वतःच्या हातात घ्यावे आणि देवाला साहाय्य करावे. साराने अब्राहामाला सांगितले की तिची दासी हाजराबरोबर लैंगिक सहवास कर, आणि त्यांना मुलगा झाला आणि त्यांनी त्याचे नाव इश्माएल ठेवले. सर्व काही चांगले दिसत होते जसे काही देवाने त्याच्या अभिवचनाचे उत्तर दिले होते. परंतु सत्य हे होते की इश्माएल हा अभिवचन असलेला पुत्र नव्हता. इश्माएल ही एक मोठी चूक होती ज्याने अब्राहामाच्या घराण्यात भांडणे व संभ्रम उत्पन्न केला होता.
अब्राहाम देवाकडे गेला आणि या परिस्थितीविषयी बोलला. आणखी एक मुख्य गोष्ट येथे ही, "परमेश्वराला तुमची चूक सांगा", परंतु आपण देवाला कधीही सांगत नाही.
आणि देवाने अब्राहामाला सांगितले की जरी हा एक भयंकर गोंधळ झाला आहे तरीही, "पाहा, मी त्याचे कल्याण करीन; त्याला सफळ व बहुगुणीत करीन; त्याच्या पोटी बारा सरदार निपजतील; मी त्यांचे मोठे राष्ट्र करीन" (उत्पत्ति १७: २०). अनेक वर्षानंतर, उत्पत्ति ३७ मध्ये, आपण योसेफाच्या भावांना पाहतो, ते मत्सराने त्यास इश्माएली लोकांना विकून देतात, जे नंतर त्यास मिसर देशात विकतात. तुम्हाला पुढची कथा ठाऊक आहे. योसेफ हा मिसर देशाचा राज्यपाल झाला आणि दुष्काळामध्ये इस्राएली लोकांच्या बारा वंशजांचा समूळ नाश होण्यापासून वाचविण्याचे कारण असा झाला.
अद्भूतपणे, हे तेच इश्माएली लोकांचे वंशज होते जे त्या योग्यवेळी तेथे आले होते आणि अब्राहामाचा पणतू, योसेफ यास खडग्यात मरण्यापासून वाचविले होते जेव्हा त्याच्या भावांनी त्याचा विश्वासघात केला होता. (उत्पत्ति ३७ पाहा)
मी काय म्हणत आहे? अब्राहामाची चूक ही योसेफाचा चमत्कार झाली होती, ज्याने त्यांच्या उरलेल्या घराण्यांस वाचविण्यास साहाय्य केले होते. हा इतका अद्भुत परमेश्वर आहे! आपण जेव्हा चुकतो तेव्हा देखील कसे चांगले करावे हे त्यास ठाऊक आहे.
आपणांमध्ये काही इश्माएल आहे. आपणां सर्वांजवळ वेळ आहे जेव्हा आपण तो वाया घालवून देतो आणि आपण त्या गोष्टींमध्ये व्यस्त होतो, ज्यामध्ये आपण तो वेळ नाही घालविला पाहिजे होता, आणि सर्व गोंधळ करून टाकतो. दोष देणारा सतत हळुवार बोलत असतो, "तूं एक लज्जाजनक अपयशी आहेस. परमेश्वर कधीही तुला साहाय्य करणार नाही." त्या खोटया गोष्टींवर कधीही विश्वास ठेवू नका. परमेश्वर पूर्णपणे दयेने भरलेला आहे. जेव्हा तुम्ही चुका करता तेव्हा तो त्याची पाठ दाखवीत नाही.
प्रार्थना अस्त्रे
१. माझ्या भूतकाळातील चुकांच्या परिणामामुळे पराजय, दोष व स्वतःला दोष देणाऱ्या प्रत्येक दुष्ट वाणीला येशूच्या नावाने मी शांत करतो.
२. माझ्या पित्या, येशूच्या नावाने मला एक नवीन सुरुवात दे.
३. ते ज्यांनी माझा पराजय व अपयशाबद्दल ऐकले आहे ते येशूच्या नावाने माझे यश साजरे करण्यात परत येतील.
४. दोष देणे व यातनेची प्रत्येक वाणी जी मला माझ्या भूतकाळात मागे ओढत आहे ती येशूच्या नवाने शांत केली जावी.
५. मी येशूच्या नावाने माझ्या सुंदर भविष्यामध्ये प्रवेश करण्यासाठी धैर्य व साहसाचा आत्मा प्राप्त करीत आहे.
६. मी पराजय नाही. मी अपयशी नाही. येशूच्या सर्वशक्तिमान नावाने मी फलदायक आणि यशस्वी आहे.

Join our WhatsApp Channel

अध्याय