english हिंदी తెలుగు മലയാളം தமிழ் ಕನ್ನಡ Contact us आमच्याशी संपर्क साधा स्पॉटिफाय वर ऐका स्पॉटिफाय वर ऐका Download on the App StoreIOS अँप डाउनलोड करा Get it on Google Play अँड्रॉइड अँप डाउनलोड करा
 
लॉग इन
ऑनलाइन देणगी
लॉग इन
  • होम
  • कार्यक्रम
  • थेट प्रसारण
  • टी.वी.
  • नोहाट्यूब
  • स्तुती
  • बातमी
  • डेली मन्ना
  • प्रार्थना
  • अंगीकार
  • स्वप्ने
  • ई पुस्तके
  • भाष्य
  • श्रद्धांजली
  • ओएसिस
ई पुस्तके

देव कसा आहे?

1 26
देव  एक “वरील मनुष्य” एक लांबचा न्यायाधीश किंवा वैयक्तिक प्राधान्याने घडलेला केवळ कोणी व्यक्ती आहे का? देव कोण आहे याबद्दल आपण विचार करताना हा प्रश्न अनेकदा निर्माण होतो. सुदैवाने, देवाने आपल्या स्वतःला प्रकटीकरणाच्या दोन महत्वाच्या पद्धतींद्वारे प्रकट केले आहे :

१.सामान्य प्रकटीकरण : देव सृष्टी द्वारे  त्याचे दैवीपण आणि सामर्थ्य प्रकट करतो (रोम. १:२०). विश्वाची सुंदरता, व्यवस्था आणि जटीलता त्याच्या अस्तित्वाची साक्ष देतात.

उदाहरणार्थ, मानवी शरीराची गुंतागुंतीची रचना लक्षात घ्या, डीएनएच्या जटीलतेपासून ते मेंदूच्या कार्यांच्या अचूकतेपर्यंत. त्याचप्रकारे, अवकाशात उत्तमप्रकारे अधांतरी असलेल्या आकाशगंगांसह विश्वाची विशालता, हे असीमित सामर्थ्य आणि ज्ञानासह सृष्टी निर्माणकर्त्याकडे इशारा करते. निसर्गाचे हे घटक केवळ आश्चर्याने प्रेरित करीत नाही तर दैवी हात कार्य करीत असल्याचा निर्विवाद पुरावा म्हणून देखील कार्य करते, जे आपल्याला देवाचा धावा करण्यास आणि त्याला ओळखण्यासाठी आमंत्रित करते.

२.विशेष प्रकटीकरण : सृष्टीच्याही पलीकडे, देवाने स्वतःला त्याच्या लिखित वचनाद्वारे प्रकट केले आहे -बायबल-आणि त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ता द्वारे, जो आपल्याला देव कसा आहे हे स्पष्टपणे दर्शवतो (योहान १:१४). बायबल, पवित्र आत्म्याने प्रेरित, देवाचा स्वभाव, चारित्र्य आणि मानवतेसाठी त्याच्या इच्छेला समजण्यासाठी सविस्तर मार्गदर्शन म्हणून काम करते. या पुस्तकातून, आपण इतिहासात देवाचा विश्वासूपणा, भविष्यासाठी त्याचे अभिवचन, आणि येशू ख्रिस्ता द्वारे दर्शवलेल्या त्याच्या प्रीतीला पाहतो.

उदाहरणार्थ, जेव्हा येशूने आजारी लोकांना बरे केले, पापांची क्षमा केली, आणि वादळ शांत केले, तेव्हा त्याने पित्याची करुणा, अधिकार आणि सामर्थ्य दाखवले. हे विशेष प्रकटीकरण देव आणि मानवतेमधील अंतर कमी करते, आणि तो कोण आहे आणि आपण त्याच्याशी कसा संबंध स्थापित करू शकतो याचे स्पष्ट चित्र दर्शवते.

त्रैक्य देव
बायबल शिकवते की केवळ एकच देव आहे (अनुवाद ६:४; यशया ४५:५). तथापि, हा एकच देव, तीन विभिन्न व्यक्ती म्हणून अस्तित्वात आहे- पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा. या कल्पनेला त्रैक्यत्व किंवा त्रि-एकता असे म्हणतात. जरी “त्रैक्यत्व” हा शब्द पवित्र शास्त्रात आढळत नाही, तरी शिकवण ही स्पष्ट आहे.

त्रैक्यत्वासाठी पुरावा :
  • योहान ६:२७, “नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका; तर पिता जो देव ह्याने ज्याच्यावर शिक्का मारला आहे तो मनुष्याचा पुत्र तुम्हांला सार्वकालिक जीवनासाठी टिकणारे अन्न देईल त्यासाठी श्रम करा.”  हे वचन येशूला देव पित्याने सार्वकालिक जीवन देण्यासाठी नियुक्त केले आहे या दैवी भुमिकेवर भर देते, जे त्याच्या देवत्वाची पुष्टी करते.
  • योहान २०:२८, “थोमाने त्याला म्हटले, “माझा प्रभू व माझा देव!” येथे थोमा येशूच्या पुनरुत्थानानंतर येशूला सरळपणे प्रभू म्हणून संबोधत आहे, त्याच्या दैवी स्वभावाबद्दल स्पष्टपणे स्वीकार.
  • प्रेषित. ५:३-४, “तेव्हा पेत्र म्हणाला, “हनन्या, तू पवित्र आत्म्याशी लबाडी करावी...म्हणून सैतानाने तुझे मन का भरवले आहे?.... तू मनुष्यांशी नव्हे तर देवाशी लबाडी केले आहेस.” हे पवित्र आत्म्याशी लबाडी करण्यास देवाशी लबाडी करण्याबरोबर एक करते, त्यांच्या विभिन्न भूमिकेला मानते तरीही एकच अस्तित्व आहे.
  • मत्तय. २८:१९, “तव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांना शिष्य करा; त्यांना पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याचे नावात बाप्तिस्मा द्या.” “नावात” हे एकवचनी नाव त्रैक्यत्वावर भर देते, त्याचवेळेस, पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाचा उल्लेख त्यांच्या विभिन्न व्यक्तित्वावर भर देते.
  • २ करिंथ १३:१४, “प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती, आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांसह असो.” हा आशीर्वाद सुंदररीत्या देवत्वाची एकता आणि सुसंवादाला स्पष्ट करतो.
त्रैक्यातील प्रत्येक व्यक्ती हा पूर्ण देव असून, त्यांना विभिन्न भूमिका आहेत :
  • पित्याला प्रीती आणि निवडीचे स्त्रोत म्हणून पाहिले जाते.
  • पुत्र हा सृष्टीचा उद्धारकर्ता आणि पालनहार आहे.
  • पवित्र आत्मा पुनरुज्जीवन, शुद्धीकरण, आणि विश्वासणाऱ्यांना सबळ करणारा आहे.
देवाचे गुण
बायबल देवाच्या गुणांचे वर्णन करण्याद्वारे तो कोण आहे याबद्दल गहन समज प्रदान करते. चला आपण या गुणधर्मांचा खोलवर विचार करू या.

१.देव आत्मा आहे
योहान ४:२४, देव भौतिक रचना किंवा स्थानाने सीमित नाही. त्याला प्रतीमांद्वारे किंवा एकाच ठिकाणी स्थित करण्याद्वारे सादर केले जाऊ शकत नाही. येशू, जो देवाची पूर्ण प्रतिमा, जो पित्याचे अंत:करण आणि स्वभाव प्रकट करतो (योहान १४:९ब).

२.देव प्रकाश आहे
१ योहान १:५ : देवाचा प्रकाश शुद्धता, पवित्रता आणि सत्य प्रतिनिधित करते. ते पापाला उघड करते, हृदयाला शुद्ध करते, आणि विश्वासणाऱ्यांना आध्यात्मिक परिपक्वतेकडे मार्गदर्शन करते. (योहान ८:१२)

३.देव प्रीती आहे
१ योहान ४:८ : देवाची प्रीती बिनशर्त आहे (अगापे). ते आपल्यासाठी सर्वोत्तमतेची इच्छा करते आणि जीवनाची आव्हाने काहीही असतानाही, आपल्याला सुरक्षितता, योग्यता आणि महत्व देते. (१ पेत्र. १:१५)

४.देव सर्वकाही जाणणारा आहे 
स्तोत्र. १४७:४-५ : देवाला सर्वकाही ठाऊक आहे-भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ. ही समज विश्वासणाऱ्यांना ही खात्री देते की त्याला कशानेही आश्चर्य होत नाही, आणि तो सर्व गोष्टी आपल्या भल्यासाठी करतो. (रोम. ८:२८)

५.देव सर्व-शक्तिमान आहे
यिर्मया ३२:२७; मत्तय. १९:२६ : देवाची शक्ती असीमित आहे. तो आपल्या त्याची मुले म्हणून आपल्या वारशाचे जतन करतो, संरक्षण करतो आणि त्याची हमी देतो. (योहान १०:२८; १ पेत्र. १:५)

६.देव सर्वव्यापी आहे
स्तोत्र. १३९:७-१० : देव सर्व ठिकाणी उपस्थित आहे. तो प्रत्येक परिस्थितीत आपल्याबरोबर चालतो, आपले सांत्वन, सुरक्षा आणि मार्गदर्शन करतो. (इब्री. १३:५-६)

७.देव असीमित आणि सार्वकालिक आहे
स्तोत्र. १४५:३; स्तोत्र. ९०:२ : देव वेळ किंवा अवकाश द्वारे सीमित नाही. त्याला सुरुवात किंवा अंत नाही, ज्यामुळे तो आपल्याला सार्वकालिक आशा आणि सुरक्षितता प्रदान करतो. (यशया ९:६)

८.देव अपरिवर्तनीय आहे (न बदलणारा)
याकोब १:१७ : देवाचे चारित्र्य आणि अभिवचने कधीही बदलत नाहीत. त्याचा अपरिवर्तनीय स्वभाव आपल्याला खात्री देतो की आपल्या तारणासाठी आणि आपल्या भविष्यासाठी त्याच्या योजना कायम आहेत. (इब्री. १३:८)

९.देव सार्वभौम आहे
यशया ४६:९-१० : देवाची सार्वभौमिकता म्हणजे तो सर्वांवर पूर्ण नियंत्रण ठेवून आहे. तरीही, हा अधिकार त्याचा चांगुलपणा आणि प्रीतीसह आहे, जे आपल्याला त्याच्या योजनेत आत्मविश्वास देतात. (स्तोत्र. १००:५)

१०.देवाचे आश्चर्यकारक गुण
जेव्हा देवाने स्वतःला मोशेला प्रकट केले, तेव्हा त्याने त्या गुणांवर भर दिला जे अनेकदा आपल्याला आश्चर्यात टाकते : निर्गम ३४: ६-७ : देव करुणामय, कृपाळू, मंदक्रोध, अपार प्रेमळ आणि क्षमाशील आहे. तरीही, तो न्यायी देखील आहे आणि तो अपराध्याला शिक्षा केल्यावाचून राहत नाही. कृपा आणि न्यायामधील हे संतुलन मानवतेबरोबर त्याच्या नातेसंबंधाची व्याख्या करते.

देवाप्रती आपला प्रतिसाद
देव कोण आहे हे जेव्हा आपण समजतो, तेव्हा पुढील गोष्ट देवासाठी आपला प्रतिसाद असेल :
  • उपासना : देवाच्या महानतेला ओळखा आणि तुम्ही त्याची भक्ती करा (स्तोत्र. १०३). देवाचे वैभव आणि सृष्टीकर्ता आणि पालनहार म्हणून त्याची भूमिका हे सर्वकाही उपासनेमध्ये स्वीकारले जाते. उदाहरणार्थ, दावीद राजाने देवाची उपासना स्तुतीच्या गीतांनी केली, देवाची दया आणि विश्वासूपणासाठी कृतज्ञता व्यक्त केली. जेव्हा आपण उपासना करतो, तेव्हा आपण आपल्या हृदयाला देवाच्या महानतेशी समरूप करतो आणि आपल्या जीवनात त्याच्या उपस्थितीला आमंत्रित करतो.
  • विश्वास : कठीण समयादरम्यान देखील, त्याची अभिवचने आणि सार्वभौमत्वावर भरवसा ठेवा. अब्राहामाच्या कथेमध्ये विश्वासाचे उदाहरण दिलेले आहे, तो वृद्ध झालेला असतानाही त्याला पुत्र होईल या देवाच्या अभिवचनावर त्याने विश्वास ठेवला (उत्पत्ती १५:६). देवावर भरवसा ठेवणे म्हणजे त्याचे वचन आणि चारित्र्यावर विसंबून राहणे, हे जाणून की परिस्थिती कितीही आव्हानात्मक असल्या तरी सर्व गोष्टी तो आपल्या भल्यासाठी करतो.
  • पवित्रता : देवासाठी वेगळे केलेले जीवन असे जगा, त्याची पवित्रता आणि प्रीतीला प्रतिबिंबित करा. पवित्रता ही नैतिक आचरणापेक्षा अधिक आहे; हे देवाच्या उद्देशासाठी समर्पित करणे आहे. दानीएलाचे राजाच्या मिष्ठान्नाने स्वतःला दूषित करण्याचा नकार (दानीएल १:८) हे देवासाठी वेगळे केलेल्या जीवनाला दर्शवतो. पवित्रता त्याचे पात्र म्हणून देवाच्या शक्तीला आपल्या द्वारे कार्य करण्यास आमंत्रित करते.
  • साक्ष : देवाची प्रीती आणि सत्याच्या साक्षीची सुवार्ता दुसऱ्यांना सांगा. विहिरीजवळील शोमरोनी स्त्री (योहान ४:२९) साक्षीचे उदाहरण म्हणून कार्य करते. येशूशी भेट झाल्यानंतर, तिने तिच्या समाजाला त्याच्याबद्दल सांगितले, त्यामुळे अनेकांना विश्वास करण्याकडे आणले. साक्ष देणे हा देवाची प्रीती आणि कृपेचा अनुभव करण्याचा स्वाभाविक प्रतिसाद आहे.
  • प्रार्थना : देवाजवळ आत्मविश्वासाने, त्याची शक्ती आणि दया ओळखून जा. प्रार्थना आपल्याला देवाच्या अंत:करणाशी जोडते. कर्मेल डोंगरावर एलीयाच्या प्रार्थनेने (१ राजे १८:३६-३८) देवाचे गौरव प्रकट करण्यासाठी देवाच्या शक्तीवरील विश्वासाला दर्शवले. प्रार्थना आपल्याला आपल्या गरजा आणि धन्यवाद व्यक्त करू देते, जे आपल्याला त्याच्याबरोबर आपल्या नातेसंबंधाला वाढवते.
Join our WhatsApp Channel
अध्याय
  • देव कसा आहे?
संपर्क
फ़ोन: +91 8356956746
+91 9137395828
व्हाट्स एप: +91 8356956746
ईमेल: [email protected]
पता :
10/15, First Floor, Behind St. Roque Grotto, Kolivery Village, Kalina, Santacruz East, Mumbai, Maharashtra, 400098
आमच्या सामाजिक नेटवर्कवर सामील व्हा!
Download on the App Store
Get it on Google Play
मेलिंग यादीमध्ये सामील व्हा
अन्वेषण
कार्यक्रम
थेट प्रसारण
नोहाट्यूब
टी.वी.
देणगी
डेली मन्ना
स्तुती
अंगीकार
स्वप्ने
संपर्क
© 2025 Karuna Sadan, India.
➤
लॉग इन
कृपया या साईट वर टिपणी आणि कंमेंट करण्यासाठी आपल्या NOAH खात्यावर प्रवेश करा |
लॉग इन