तुझ्याविरुद्ध चालविण्याकरिता घडिलेले कोणतेहीहत्त्यार तुजवर चालणार नाही तुजवर आरोप ठेवणाऱ्या सर्व जिव्हांना तूं दोषी ठरविशील. परमेश्वराच्या सेवकांचे हेच वतन आहे, हीच मजकडून मिळालेली त्यांची धार्मिकता आहे, असे परमेश्वर म्हणतो. (यशया 54:17)
माझ्या युद्धाची शस्त्रे दैहिक नाहीत परंतु तटबंदी जमीनदोस्त करण्यास ती देवाच्या दृष्टीने समर्थ आहेत. देव जर माझ्या पक्षाचा आहे, तर कोण माझा विरोधी होऊ शकतो? (2 करिंथ 10:4, रोम8:31)
परमेश्वरा द्वारे मी खात्रीने विजय मिळवील आणि हा तोच केवळ आहे जो माझ्या शत्रूंना पायदळी तुडविल. (स्तोत्र60:12)
मला अंधकाराच्या सामर्थ्यांतून वाचविले आहे; आणि देवाच्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेविले आहे. (कलस्सै 1:13)
तर मग आपली कंबर सत्याने कसा;
नीतिमत्वाचेउरस्त्राण धारण करा, शांतीच्या सुवार्तेने लाभलेली सिद्धता पायी चढवा, आणि ह्या सर्वांबरोबरच जिच्या योगे त्या दुष्टाचे सगळे जळते बाण तुम्हाला विझविता येतील, ती विश्वासाची ढाल हाती घ्या व उभे राहा. तारणाचेशिरस्त्राण व आत्म्याची तरवार म्हणजे देवाचे वचन, ही घ्या. (इफिस 6:14-17)
स्तोत्र 35:
1 हे परमेश्वरा, मला विरोध करणाऱ्यांना विरोध कर; माझ्याबरोबर लढणाऱ्याशी लढ.
2 ढाल व कवच धारण कर, माझ्या साहाय्यासाठी उभा राहा.
3 भाला हाती घे, माझा पाठलाग करणाऱ्यांचा मार्ग अडीव;
मीचतुझे तारण आहे असे तूं माझ्या जीवाला सांग.
4 माझा जीव घेऊ पाहणारे लज्जित व फजीत होवोत;
माझे नुकसान व्हावे म्हणून मनसुबा करणारे मागे हटोत व त्यांना लाज वाटो.
5 तें वाऱ्याने उडून चाललेल्या भूसासारखे होवोत,
परमेश्वराचा दूत त्यास उधळून लावो.
6 त्यांचा मार्ग अंधकारमय व निसरडा होवो, परमेश्वराचा दूत त्यांच्या पाठीस लागो.
7 कारण त्यांनी विनाकारण माझ्यासाठी आपला फासा गुप्तपणे मांडिला.
माझ्या जिवासाठी निष्कारण खाचहि खणीली.
8 त्याच्यावर नकळत आपत्ती येवो; जो फासा त्याने गुप्तपणे मांडिला त्यात तोच गुंतूनपडो;
तो त्यात अचानक नाश पावो.
9 मग माझा जीव परमेश्वराच्या ठायी उल्लास पावेल
आणि त्याने सिद्ध केलेल्या तारणामुळे हर्ष करील.

Join our WhatsApp Channel