डेली मन्ना
18
14
184
हुशारीने कार्य करा
Friday, 4th of July 2025
Categories :
कामाची जागा
प्राधान्यक्रम
मनुष्याने सर्व जग मिळविले आणि आपला जीव गमवाल तर त्याला काय लाभ? अथवा मनुष्य आपल्या जिवाबद्दल काय मोबदला देणार? (मत्तय १६:२६)
तुम्ही किती कठीण परिश्रम करता ते नाही; तर तुम्ही किती हुशारीने ते काम करता ते आहे: एका मनुष्याला सांगण्यात आले की जर त्याने कठीण परिश्रम केले तर तो श्रीमंत होईल. एकच कठीण काम जे त्याला ठाऊक होते ते खड्डे खणणे. तेव्हा त्याने त्याच्या घराच्या मागच्या बाजूला खोल खड्डे खणण्यास सुरुवात केली. तो श्रीमंत झाला नाही; त्यास केवळ चांगलीच पाठदुखी मिळाली. त्याने कठीण परिश्रम केले पण त्याने कोणत्याही प्राथमिकते शिवाय उद्देशहीन काम केले.
सर्वात महत्वाचा प्रश्न नेहमी विचारला जातो –लोक, व्यवसाय किंवा संस्था अपयशी का ठरतात? मुख्य कारण हे, प्राथमिकतेसंबंधी विचार करण्यात अपयश हे आहे. विद्यार्थी: त्याने किंवा तिने त्यांच्या प्राथमिकता-अभ्यास संबंधी विचार केला नाही परंतु सोयीस्करपणे सतत पुढे ढकलत राहिले. विवाहाचा विचार करा: कोणत्याही जोडीदाराने एकदुसऱ्याबरोबर चांगला वेळ घालविला नाही परंतु दिसणाऱ्या इतर महत्वाच्या गोष्टी करीत राहिले. हे त्याप्रमाणे आहे की मनुष्याने सर्व जग मिळविले पण आपला जीव गमाविला.
तुम्हाला असे वाटते काय तुम्ही प्रगती ही करीत नाहीत परंतु केवळ त्याच चक्रातून वारंवार जात आहात? तुम्ही जीवनाशी नेहमीच निराश झालेले आहात काय? जर तुमचे उत्तर ह्या प्रश्नांना, "होय" असेन, मग हे असे असू शकते की तुमच्या सर्व प्राथमिकता ह्या मिसळल्या आहेत. दिवसाची सुरुवात प्रार्थना व वचनासह करण्याद्वारे तुमच्या जीवनाची प्राथमिकता प्रभु येशूला करा. असे करण्याने बरीच संकटे व धक्कादायक प्रसंगापासून तुम्हाला वाचविले जाऊ शकते. आत्म्याच्या वाणी कडे तुम्ही लक्ष दयाल काय?
Bible Reading: Psalms 77-80
प्रार्थना
हे परमेश्वरा, तूं माझा परमेश्वर आहेस; पहाटेच मी तुझा धावा करेन. जेव्हा मी तुझे राज्य व धार्मिकता मिळविण्याचा प्रयत्न करतो तेव्हा सर्व गोष्टी मला प्राप्त होतील, येशुच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel

Most Read
● सापडलेल्या मेंढराचा आनंद● दिवस ०१ : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे
● पहारेकरी
● स्वप्नेनष्ट करणारे
● भिऊ नका
● लोकांचे पाच गट येशूला भेटले # 1
● चला आपण परमेश्वराकडे वळू या
टिप्पण्या