डेली मन्ना
२१ दिवस उपवासः दिवस १२
Thursday, 23rd of December 2021
52
12
3251
Categories :
उपास व प्रार्थना
नातेसंबंधांमध्ये समेट
क्रोध हा अंतिम मुक्काम ला नष्ट करणारा आहे. क्रोध हा अंतिम मुक्कामाचा सर्वात पहिला शत्रू आहे. संबंधाला ते एका किंवा इतर मार्गा द्वारे प्रभावित करतो.
सर्वात पहिली वेळ मोशे क्रोधात आला, त्याने कोणाला तरी जिवंत मारले. (निर्गम २:१२)
दुसरी वेळ तो क्रोधात आला, त्याने मूळ आज्ञा पाट्या तोडल्या, देवाने ज्या कोरल्या होत्या व स्वतःच्या बोटाने लिहिल्या होत्या, वासराच्या सोन्याची मूर्ति जाळली, ती राख पाण्यावर विखरली व इस्राएल लोकांना ते पाणी बळजबरीने पाजिले. (निर्गम ३२:१९-२०)
तिसऱ्या वेळी तो क्रोधात आला, त्याने खडकाला बोलण्या ऐवजी त्यास दोनदा मारले, आणि त्या प्रक्रीये मध्ये स्वतःची सेवा संपविली. (गणना २०:११)
क्रोध हा इतका गंभीर आहे की तुम्हाला त्यावर उपाय करण्याची गरज आहे. ते इतर आत्म्यांना प्रवेश देण्यास द्वार उघडते. हे त्याप्रमाणे आहे जसे जळते कोळसे हाता मध्ये धरणे की त्यावर फेकांवे ज्यांच्यावर तुम्ही क्रोध करीत आहात, परंतु प्रत्यक्षात तुम्ही स्वतःलाच जाळत आहात.
मनन करण्यासाठी पवित्र शास्त्रातील वचने
नीतिसूत्रे १३:२०
नीतिसूत्रे १८:२४
नीतिसूत्रे १७:१७
योहान १५:१२-१३
तुमच्या स्वतःला, तुमच्या घराला, तुमच्या संपत्तीला व तुमच्या कुटुंबातील सदस्यांना तेलाने अभिषेक करा. जरा तुमच्या घरात पाळीव प्राणी आहेत त्यांना सुद्धा तेलाने अभिषेक करा.
प्रार्थना
प्रत्येक प्रार्थना अस्त्र वारंवार म्हणा जोपर्यंत ते तुमच्या अंत:करणातून येत नाही. केवळ तेव्हाच मग पुढच्या प्रार्थना अस्त्रा कडे वळा. (वारंवार म्हणा, व्यक्तिगत करा व प्रत्येक प्रार्थना मुद्दा कमीत कमी एक मिनीट असे करा.)
माझ्या जीवनातील क्रोधाच्या आत्म्या मी तुला येशूच्या नांवात आज्ञा देत आहे, की कायमचे नष्ट होऊन जा.
माझ्या जीवनातील प्रत्येक द्वार जे क्रोधाच्या आत्म्यासाठी उघडे केले गेले आहे येशूच्या नांवात ते कायमचे बंद केले जावे.
पवित्र आत्म्या जे प्रत्येक नुकसान माझ्या क्रोधाच्या आत्म्याने केले आहे येशूच्या नांवात ते स्वस्थ व्हावे.
जेव्हा लोक मला पाहतात (माझ्याविषयी ऐकतात, माझ्याविषयी बोलतात) ते त्यांच्या अंत:करणात आनंदी व्हावेत. (निर्गम ४:१४)
वाईट-इच्छा व गैरसमजेचा प्रत्येक आत्मा माझ्या प्रत्येक संबंधांमधून येशूच्या नांवात उपटून टाकला जावो.
माझे प्रत्येक नातेसंबध मी येशूच्या रक्ता द्वारे आवरण करतो. माझ्या जीवनातील प्रत्येक संबंधाने देवाच्या अग्नीचा स्पर्श येशूच्या नांवात प्राप्त करावा.
असे होवो की शांतीचा राजकुमार-प्रभु येशू ख्रिस्त माझ्या प्रत्येक संबंधांमध्ये राज्य करो.
पवित्र आत्म्या माझ्या प्रत्येक संबंधांना परिवर्तीत कर व माझ्या प्रत्येक संबंधांना तुझ्या राज्याच्या वाढीसाठी उपयोगात आण.
सर्व लपलेल्या वाईट संगतीस येशूच्या नांवात मी त्याग करीत आहे.
माझ्या संबंधांच्या विरोधातील प्रत्येक वाईट लेख येशूच्या रक्ता द्वारे धुऊन शुद्ध केले जावे.
पाण्यातील प्रत्येक जादूटोणा ज्याने माझ्या स्वप्नात आध्यात्मिक पती/पत्नीला परिचित केले आहे, येशूच्या नांवात अग्निद्वारे भाजले जावो.
पाण्यातील जादूटोण्याचा प्रत्येक दलाल जो स्वप्नात माझे पती/पत्नी असे दर्शवित आहे, येशूच्या नांवात अग्निद्वारे भस्म होवो.
पाण्यातील जादूटोण्याचा प्रत्येक दलाल जो माझ्या नातेसंबंधाशी शारीरिकतेने जुळला आहे की त्यास निराश करावे, येशूच्या नांवात अग्निद्वारे नष्ट होवो.
Join our WhatsApp Channel
Most Read
● देवाच्या प्रेमाचा अनुभव घेणे● दिवस १७ : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे
● तुमचे मार्गदर्शन कोण करीत आहे?
● आपल्या पाठीमागे पूल हे जळत आहेत
● परमेश्वराकडे तुमच्यासाठी योजना आहे
● तुमच्या घरातील वातावरण बदलणे-२
● दिवस २० : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे
टिप्पण्या