डेली मन्ना
13
12
131
तयारी नसलेल्या जगात तयारी
Thursday, 6th of November 2025
Categories :
अंतिम क्षण
लूक १७ मध्ये, नोहाचा काळ आणि त्याच्या दुसऱ्या आगमनापूर्वीच्या काळामध्ये येशूने जोरदार तुलना केली आहे. जग, ज्याबद्दल तो वर्णन करतो, जे त्याच्या नियमित लयीत चालू राहते- लोक खातात, पितात आणि विवाह करतात आणि त्यांचे दररोजचे जीवन जगतात, जे येणाऱ्या दैवी न्यायाबद्दल गाफील दिसतात. प्रगल्भता हरवत चाललेल्या प्रापंचिक जीवनात गुंतलेल्या समाजाचे चित्र यात रेखाटले आहे.
“नोहाच्या दिवसांत झाले तसे मनुष्याच्या पुत्राच्या दिवसांतही होईल.” (लूक १७:२६)
नोहाचे दिवस केवळ नित्यक्रमानेच नव्हे तर येणाऱ्या जलप्रलयाच्या इशाऱ्यांच्या चिन्हांकडे उघड दुर्लक्ष केले आहे. पश्चाताप करण्यासाठी नोहाचे सततचे सांगणे असतानाही, जग आपल्या व्यवहारात चालू होते, त्यांची इच्छा, महत्वाकांक्षा आणि विचलनाने भरून गेलेले होते. त्याचप्रमाणे, २ पेत्र. ३:२-४ मध्ये, शेवटच्या दिवसांतील निंदा करणाऱ्यांविषयी आपल्याला इशारा देण्यात आला आहे, जे त्यांच्या स्वतःच्या इच्छेने प्रेरित, प्रभू येशूच्या दुसऱ्या आगमनाच्या प्रत्यक्ष कल्पनेवर उपहासाने प्रश्नचिन्ह उभे करत होते.
“प्रथम हे ध्यानात ठेवा की, स्वतःच्याच वासनांप्रमाणे चालणारे थट्टेखोर लोक शेवटल्या दिवसांत थट्टा करत येऊन म्हणतील, ‘त्याच्या येण्याचे वचन आता कोठे आहे? कारण वाडवडील निजले तेव्हापासून सर्वकाही उत्पत्तीच्या प्रारंभापासून होते तसेच चालू आहे.” (२ पेत्र ३:३-४)
ही वचने आपल्यासाठी वेळेवर स्मरण देणारी आहेत. ज्याप्रमाणे नोहाच्या दिवसांत त्यावेळी विस्तृत हिंसा आणि नैतिक पतन झाले होते (उत्पत्ती ६:११), त्याप्रमाणेच आजचे आपले जग त्याच्या स्वतःच्याच आव्हानांना सामोरे जात आहे. तरीही, या सर्वांच्या मध्ये, येथे आशा आहे.
प्रेषित पौल, थेस्सलनीकाच्या त्याच्या पत्रात , विश्वासणाऱ्यांना प्रकाशाचे पुत्र असा, जागरूक, आणि सौम्य प्रभूच्या पुन्हा येण्यासाठी नेहमी तयार राहण्याचे प्रोत्साहन देत आहे.
“बंधूजनहो, त्या दिवसाने चोरासारखे तुम्हांला गाठावे असे तुम्ही अंधारात नाही. कारण तुम्ही सगळे प्रकाशाची प्रजा व दिवसाची प्रजा आहात; आपण रात्रीचे व अंधाराचे नाही.” (१ थेस्सलनीका. ५:४-५)
विश्वासणारे म्हणून, आपल्याला निकडीच्या भावनेने, भीतीने भरकटून जाणारे नाही तर आपला उद्देश आणि सेवाकार्याच्या गहन समजेद्वारे जगण्यास बोलावलेले आहे. आपण ख्रिस्ताचे राजदूत, प्रेम, आशा आणि तारणाचा त्याचा संदेश पसरवण्याच्या उद्धीष्टासह आहोत. येशूच्या स्पष्ट दुसऱ्या आगमनाने आपल्याला भीतीने पक्षाघाती नाही केले पाहिजे परंतु आपल्याला कृतीत पुढे न्यावे.
मत्तयाच्या पुस्तकात, येशू आपल्याला आठवण देतो की सर्वात मोठी आज्ञा ही देवावर आणि आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करणे आहे. असे केल्याने, आपण त्याच्या प्रकाशाचे किरण होतो, आणि संशय, उपहास आणि आत्मसंतुष्टतेच्या अंधारातून मागे सरकतो.
“येशू त्याला म्हणाला, ‘तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण अंत:करणाने, पूर्ण जीवाने व पूर्ण मनाने प्रीती कर’. हीच मोठी व पहिली आज्ञा आहे.” हिच्यासारखी दुसरी ही आहे की, ‘तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर.” (मत्तय २२:३७-३९)
या अनिश्चित काळात, चला आपण नोहाच्या काळातील लोकांसारखे होऊ नये, असुरक्षित आणि तयारीविना. त्याऐवजी, चला आपण जागरूक होऊ या, आपला प्रकाश प्रज्वलित करू या, प्रत्येक दिवस उद्देशाने जगू, आणि आपला तारणारा-प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्यास स्वीकारण्यास नेहमीच तयार राहू या.
Bible Reading: Luke 22-23
प्रार्थना
पित्या, आम्हांला वेळेची पारख करण्यासाठी शहाणपण, आमच्या विश्वासात स्थिर उभे राहण्यास धैर्य, आणि गरजेत असणाऱ्या जगाला तुझा संदेश सांगण्यास प्रेम प्रदान कर. असे होवो की आम्ही नेहमीच तयार असावे, आणि तुझ्या स्पष्ट परत येण्याच्या प्रकाशात प्रत्येक दिवस जगावा. येशूच्या नावाने. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● मी प्रयत्न सोडणार नाही● प्राचीन इस्राएलच्या घरांकडून शिकवणी
● तुम्ही अजूनही का वाट पाहत आहात?
● दिवस ०१: ४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● महान पुरुष व स्त्रिया का पतन पावतात -३
● २१ दिवस उपवासः दिवस १७
● गहनता शोधणे, केवळ प्रदर्शन नाही
टिप्पण्या
