मी इतके स्पष्टपणेते ठिकाण आठवतो जेथे मी एक लहान बाळ म्हणून वाढलो. तेइतके रमणीय गाव होते. अनेक वर्षे, मी पाहत असे की काही मुले तेथे मैदानात बसून राहायची आणि त्यांचा वेळ घालवीत राहायची.
असाच एक मुलगा कॅल्विन होता. तो ह्या मुलांच्या गटात बसून राहायचा. जेव्हा केव्हा तो त्यांना काहीतरी नवीन करण्यास सुचवायचा, इतर त्याची खिल्ली उडवत असे आणि त्यास वेगवेगळ्या नावाने हाक मारीत असे. केवळ अशा गटाचा हिस्सा व्हावे, म्हणून कॅल्विन शांत राहायचा.
लवकरच कॅल्विन ने शाळा अभ्यास पूर्ण केला आणि एका चांगल्या कॉलेज मध्ये प्रवेश घेतला. हे मग तेव्हाच देवाच्या कृपेने तो काही थोडया लोकांना भेटला जे सकारात्मक आणि उद्देशमय जीवन जगणारे होते. जवळजवळ ताबडतोब, कॅल्विन च्या जीवनात गोष्टी बदलू लागल्या. तो ध्येय निश्चित करू लागला आणि त्यासाठी खूप मेहनत करू लागला. आज, कॅल्विन कडे स्वतःची भोजन पुरवठा करणारी कंपनी आणि एक सुंदर कुटुंब आहे.
मी काही वेळे मागे त्यास भेटलो आणि त्यास विचारले हे सर्व काही कसे घडले. त्याने मला तोंडावरच म्हटले की हे सर्व योग्य मित्र आणि योग्य संबंध मिळाल्यामुळेच हा सर्व फरक घडला. त्याने मला हे सुद्धा सांगितले की त्याच्या ह्या नवीन मित्रांनी त्यास देवाकडे कसेआणले.
मला त्याच्यासाठी आनंद झाला परंतु मी त्या मुलांविषयी सुद्धा उत्सुक होतो की त्यांचे काय झाले. त्याने मला सांगितले की ते अजूनही त्याच ठिकाणी राहतात, काहीही करीत नाही.
त्यानेआणखी म्हटले, "पास्टर, मी जर त्या मुलांसोबत असतो, तर मी अजूनही गल्लीत क्रिकेट खेळत राहिलो असतो."
कॅल्विन ची कथा ही एक मोठी आठवण देते की इतरांचा आपल्या जीवनावर किती प्रभाव पडतो. कधी कधी, आपल्याला सवय लागून जाते की काही ठराविक लोकांच्या सोबतीत राहावे. आपण त्याच्या परिणामाविषयी जरा सुद्धा विचार करत नाही जे आपल्या पाचारण किंवा आपल्या भविष्यावर पडेल.
फसू नका, कुसंगतीने नीति बिघडते. वाईट संगती चांगले आचरण, नैतिकतेपासून वंचित ठेवते आणि चारित्र्यास खराब करते. (१ करिंथ १५: ३३ ऐम्पलीफाईड बायबल)
जेव्हा आपण जगिक नैतिकता असणाऱ्या व्यक्तींच्या संगतीत राहतो किंवा त्यामध्ये आनंद प्राप्त करतो, मग आपण त्यांचे आचरण, भाषा आणि सवयी सारखे करण्याच्या धोक्यात असतो.
तुम्ही ह्या म्हणी विषयी ऐकले आहे काय, "मला सांगा की तुम्ही कोणा सोबत वेळ घालविता, आणि मग मी तुम्हाला सांगेल की तुम्ही काय व्हाल."
येथे ह्या सरळ वाक्यात खूपच ज्ञान आहे. फक्त त्यावेळेविषयी विचार करा जेव्हा तुम्ही एक तरुण मुलगा किंवा एक तरुण मुलगी असे वाढत होता. तुम्हांला आठवते का की आपले आई-वडील आपण कोणाबरोबर संबंधठेवतो त्याविषयी किती चिंतेत असत?
आपले आई आणि वडील यांना पाहिजे असत की आपल्या मित्रांना भेटावे आणि त्यांच्याविषयी सर्वकाही जाणावे. हे आपल्याला जास्तच क्रूर असे वाटे परंतु आता एक आई-वडील या नात्याने, मी जाणले आहे की त्यांनी असे का केले होते.
(तुम्ही अधिकतर माझ्याबरोबर सहमत व्हाल) आपल्या आई-वडिलांना ठाऊक होते की कोणाच्याही जीवनावर मित्रांचा प्रभाव हा कसा पडू शकतो आणि म्हणून ते आपल्यावर फार बारकाईने लक्ष ठेवत असत.
लक्षात घ्या की बायबल 'आशीर्वादित मनुष्य" बाबत वर्णन करते
जो पुरुष दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही; पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही; आणि निंदकांच्या बैठकीत बसत नाही. (स्तोत्रसंहिता १: १)
आधुनिक साहित्य नेहमी लोकांना "घातक लोक" आणि"प्रगती करणारे लोक" अशी वर्गवारी करतात.
घातक लोक हे ते आहेत जे नेहमी विषारी शब्द बोलत असतात जेव्हा केव्हा त्यांना वेळ मिळतो. त्याउलट,प्रगती करणारे लोक हे सकारात्मक आणि सहाय्यकारी असतात. सरळ शब्दात म्हटले तर, ते तुम्हाला प्रेरणा देतात आणि त्यांच्यासोबत राहणे आनंदी वाटते.
घातक लोक नेहमीच तुम्हांला त्यांच्या स्तरापर्यंत खेचण्याचा प्रयत्न करतात याउलट प्रगती करणारे लोक हे तुम्हांला त्यांच्या स्तरापर्यंत घेण्याचा प्रयत्न करतात.
घातक लोक हे तुम्हांला नेहमीच सांगतील की तुम्ही अमुक अमुक गोष्टी करू शकत नाही, का गोष्टी अशक्य आहेत. खिन्न वाक्या द्वारे ते तुम्हाला दाबून ठेवतात की आर्थिक स्थिती किती खालावली आहे आणि बऱ्याच काही गोष्टी. अशा लोकांना ऐकल्या नंतर, तुम्हांला शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्टया फार कमकुवत असे वाटते.
ह्या सर्व वर्षात-मी ह्या दोन्ही गोष्टी अनुभविल्या आहेत-घातक आणि प्रगती करणारे लोक. मी केवळ एवढेच म्हणू शकतो की जर तुम्ही तुमचे उद्देश प्राप्त करण्याविषयी खरेच गंभीर आहात, देवाने-दिलेल्या पाचारणास पूर्ण करणे-तर मग घातक लोकांपासून मरी प्रमाणे दूर राहा.
जर त्याचा अर्थ सामाजिक माध्यमावर काही मित्र गमाविणे, यूट्यूब चैनल वर काहींना संपर्क न करणे जे नकारात्मकतेला बढावा देते, काही संपर्क काढणे किंवा त्यास प्रतिबंध करणे आहे तर तसेच होवो-तसे करा.
दैवी संबंध तुम्हाला प्राप्त होण्याअगोदर येथे काही दैवी संबंध तोडणे व्हायला पाहिजे.
परमेश्वराने अब्राहामास आशीर्वाद देण्याअगोदर अब्राहाम लूत पासून वेगळा झाला. (उत्पत्ति १३: ५-१३ वाचा)
याकोबाने आश्वासित भूमी मिळविण्याअगोदर त्यास एसाव पासून वेगळे व्हावे लागले.(उत्पत्ति३३: १६-२० वाचा)
प्रार्थना
पित्या, मला योग्य व्यक्तींद्वारे घेरून ठेव.
Join our WhatsApp Channel
Most Read
● ख्रिस्ता समान होणे● आर्थिक संकटातून बाहेर कसे यावे
● परमेश्वराला तुमचा बदला घेऊ दया
● सैतान तुमच्या कार्यात कसे अडथळे आणतो
● सापांना रोखणे
● महान पुरुष व स्त्रिया का पतन पावतात - ४
● ख्रिस्ता द्वारे विजय मिळवणे
टिप्पण्या