डेली मन्ना
त्याच्या पुनरुत्थानाची साक्ष कसे बनावे
Sunday, 9th of April 2023
42
23
1283
Categories :
खरा साक्षीदार
प्रेषित ४:३३ कडे माझ्याबरोबर चला, "प्रेषित मोठया सामर्थ्याने प्रभु येशूच्या पुनरुत्थानाविषयी साक्ष देत होते; आणि त्या सर्वांवर मोठी कृपा होती."
लक्षात घ्या, पवित्र शास्त्र सांगते, "मोठया सामर्थ्याने", मला हे आवडले, केवळ सामर्थ्य नाही, मोठे सामर्थ्य. मी करुणा सदन सेवाकार्यात भविष्यवाणी करतो की, आम्ही सामर्थ्य पाहिले आहे, परंतु आता आम्ही मोठे सामर्थ्य पाहणार आहोत. ह्यामुळेच आम्ही मध्यस्थी करण्यात, आमच्या उपासात व प्रार्थने मध्ये आळशी होत नाहीत. प्रेषितांनी येशूच्या पुनरुत्थानाची साक्ष मोठया सामर्थ्याने दिली. आपल्या स्वतःच्या जीवनात आपल्याला याचे अनुकरण करण्याची गरज आहे.
तथाकथित टीकाकारांद्वारे सामर्थ्याचा नकार हा काही अंशापर्यंत केला जाऊ शकतो. तथापि मोठया सामर्थ्याचा नकार किंवा त्याकडे दुर्लक्ष हे केले जाऊ शकत नाही. तुम्ही पाहा, तेथे फारोचे जादुगार चमत्कार व सामर्थ्याची नकल ही काही मुद्द्यापर्यंत करू शकत होते जे देवाचा माणूस मोशे द्वारे प्रदर्शित केले गेले होते. मग परमेश्वराने काही अद्भुत असे केले, आणि मग मोशेने काहीतरी केले ज्याने जादुगारांवर दबाव आणला हे घोषित करण्यास की, "हे देवाचे बोट आहे." (निर्गम ८:१९)
मला हे पाहिजे की तुम्ही हे लक्षात घ्यावे की जादूगारांनी असे म्हटले नाही की, "ह्यात देवाचा हात आहे", परंतु "देवाचे बोट". सर्व मनुष्यांचे सामर्थ्य जर एकत्र केले तर त्यापेक्षा देवाचे बोट हे सामर्थ्यशाली आहे. तेथेच मग आपण सामर्थ्य व मोठे सामर्थ्य ह्यामधील फरक पाहू शकतो. प्रेषितांनी सुद्धा मोठया सामर्थ्याचे प्रदर्शन केले व ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाची साक्ष दिली.
प्रिय पाळक, जे-१२ पुढारी व करुणा सदन सेवाकार्याशी जुळलेल्या प्रत्येक व्यक्तींना मला प्रोत्साहन दयावयास वाटते, पूर्वी कधी केले नाही असे प्रभूचा धावा करण्याची वेळ झाली आहे.
येथे काही लोक आहेत जे त्यांच्या जीवनास काही लहान गोष्टींद्वारे नियंत्रित करू देतात. "पास्टर, मी ऐकले की त्याने माझ्याविषयी असे म्हटले आहे. त्याने असे नाही म्हटले पाहिजे होते. येथूनपुढे सेवा करावयास मला आवडणार नाही. जोपर्यंत येथे ह्या ग्रहावर लोक आहेत, ते तुमच्याविषयी सतत बोलत राहतील. इतरांविषयी काही क्षणी तुम्ही सुद्धा बोलले नाही काय?
"पास्टर, माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मला शुभेच्छा देण्यास ते विसरले? त्यांनी ही शुभेच्छा दिली परंतु मला नाही. "तिळाचा डोंगर करू नका." प्रार्थना व वचन मध्ये अधिक प्रगती करा. येथे अनेक लोक मरत आहेत ज्यांना प्रोत्साहनाची गरजे आहे. पवित्र आत्म्याच्या वाणी कडे तुम्ही कान दयाल काय व त्याच्या पुनरूत्थानाचे साक्षीदार होणार काय? ह्यासाठी परमेश्वर तुम्हाला व तुमच्या प्रियजनांना प्रीति दाखवेल.
"पास्टर, कोणीही मला प्रेम करीत नाही, मला इतके अस्विकारलेले असे वाटते. हैलो, येशू तुम्हाला इतके प्रेम करतो आणि तुमच्यासाठी त्याची प्रीति ही कधीही बदलणार नाही. हे इतके चांगले नाही काय? तुम्ही केव्हा प्रेरणा घेणार व त्याच्या पुनरूत्थानाचे खरे साक्षीदार होणार? जर आता नाही, तर केव्हा? जर तुम्ही नाही, तर कोण?
प्रभु येशूने स्पष्टपणे सांगितले, "हे म्हणत चिंता करू नका, आम्ही काय खाणार? आम्ही काय पिणार? आम्ही काय घालणार? माझ्या विवाहा विषयी काय? माझ्या नोकरी विषयी काय? ह्या गोष्टी अविश्वासणाऱ्यांच्या मनावर वर्चस्व करतात, परंतु तुमच्या स्वर्गीय पित्याला तुमच्या सर्व गरजा ठाऊक आहेत. ह्यासर्वांपेक्षा देवाच्या राज्याचा शोध घ्या, व नीतिमत्वपूर्वक जगा, व ज्या सर्वांची तुम्हाला गरज आहे ते तो तुम्हाला देईल. (मत्तय ६:३३ सारांश)
पवित्र आत्म्याला तुमच्या मध्ये व तुमच्या द्वारे कार्य करू देऊन, त्याच्या पुनरूत्थानाचे तुम्ही खरे साक्षीदार व्हाल. आणि उत्तम भाग हा की तुमच्या जीवनात मग सर्वकाही योग्य वेळी होऊ लागेल. स्तोत्रकर्त्या प्रमाणे तुम्ही घोषणा दयाल, "माझ्यासाठी मापनसूत्रे रमणीय स्थानी पडली आहेत. माझे वतन माझ्या मनाजोगे आहे." (स्तोत्र १६:६)
प्रार्थना
पित्या, येशूच्या नांवात, मला आज वरून नवीन अग्नीची गरज आहे. तुझ्या आत्म्याने माझा बाप्तिस्मा कर म्हणजे मी तुझ्या पुनरुत्थानाचा खरा साक्षीदार व्हावे. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● चांगले यश काय आहे?● देवाचे वचन काय तुम्हाला अडखळवू शकते?
● त्याच्या सामर्थ्याचा उद्देश
● प्रार्थना कशी करावी जेव्हा तुम्हाला देवापासून दूर आहोत असे वाटते
● अत्यंत वाढणारा विश्वास
● महानतेचे बीज
● सार्वकालिक निवेश
टिप्पण्या