पेंटेकॉस्ट चा अर्थ "पन्नासावा दिवस" आणि हा वल्हांडणानंतर पन्नास दिवसांनी येतो. पवित्र शास्त्राच्या समयात, तो सणाचा समय होता जेव्हा लोक सर्वीकडून यरुशलेमेला येताना त्यांच्याबरोबर त्यांच्या गव्हाच्या उपजचे प्रथम फळ देवाला मंदिरात अर्पण करण्यासाठी आणीत असत.
पेंटेकॉस्ट ही एक वेळ असे ओळखले जात होते जेव्हा मोशेने सीनाय पर्वतावर नियमशास्त्र प्राप्त केले, आणि इस्राएलचा देवा बरोबर विवाह झाला (निर्गम २४:१२-१८). पहिला पेंटेकॉस्ट हा भविष्यातील पेंटेकॉस्टचा प्रतिबिंब होता जेव्हा पवित्र आत्मा आला, आणि प्रभु येशू ख्रिस्ताच्या मंडळीने यरुशलेम मध्ये जन्म घेतला. पेंटेकॉस्ट हा 'मंडळीचा वाढदिवस' आहे.
देवाच्या आर्थिकव्यवस्थेमध्ये प्रत्येक गोष्टीला उद्देश आहे. पेंटेकॉस्ट ला सुद्धा उद्देश आहे. येशूने स्वर्गारोहणा अगोदर जेव्हा त्याच्या शिष्यांना एकत्र केले, तेव्हा त्याने त्यांना सांगितले, "आणि तुम्हांला सामर्थ्य प्राप्त होईल जेव्हा पवित्र आत्मा तुम्हांवर येईल...." (प्रेषित १:८).
शिष्यांना त्यांचे स्वतःचे भाष्य होते की ते त्या सामर्थ्यासह काय करतील. ते हे जाणण्यास अधिकच उत्सुक होते की येशूने आता रोमन वर्चस्वाला उलथून टाकावे व त्याचे राज्य स्थापित करावे. परंतु जसे आपल्याला ठाऊक आहे की येशूने पंत पिलातास स्पष्टपणे सांगितले होते की त्याचे राज्य हे ह्या जगाचे नाही. (योहान १८:३६)
प्रभु येशूने स्पष्टपणे याचा उल्लेख केला की पेंटेकॉस्टचा उद्देश हा होता की आपण संपूर्ण यरुशलेमेत, सर्व यहूदियात, शोमरोन व जगाच्या शेवटापर्यंत त्याचे साक्षीदार व्हावे. (प्रेषित १:८)
साक्षीदार होणे याचा काय अर्थ आहे?
साक्षीदार होणे याचा अर्थ, कोणी जे पाहिले, ऐकले व अनुभविले ते सत्य सांगणे आहे. येशूचे साक्षीदार होणे याचा अर्थ तो कोण आहे व आपला तारणारा म्हणून त्याने काय केले आहे ती सुवार्ता सांगणे आहे. पवित्र आत्मा हा उत्सुक आहे की आपला वापर करावा की ह्या भटकलेल्या व नष्ट होणाऱ्या जगाला देवाच्या प्रीतीचा चांगुलपणा घोषित करावा.
माझ्या जीवनात एक वेळ अशी आली होती जेव्हा मी आत्महत्या करण्याच्या मनस्थितीत होतो. आणि त्याचवेळेस कोणीतरी रस्त्यावर मला कृपेची सुवार्ता सांगितली. मग मला एका उपासनेला आमंत्रित करण्यात आले आणि तेव्हाच माझे जीवन पूर्णपणे बदलून गेले. काय झाले असते जर त्या मनुष्याने मला प्रभू विषयी साक्ष दिली नसती? केवळ त्याचा विचार करण्याविषयी सुद्धा माझा थरकाप होतो. पेंटेकॉस्टचा हा खरा उद्देश आहे.
प्रार्थना
पित्या, मी येथे आहे, तुझा आत्मा व सामर्थ्याने मला समर्थ कर. तुझा पुत्र येशू विषयी मी लोकांना सांगेन. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● कलंकित करणाऱ्या पापासाठी अद्भुत कृपेची आवश्यकता आहे● एक स्थान ज्यास स्वर्ग म्हणतात
● परमेश्वर तुमच्या शरीरा विषयी काळजी करतो काय
● संयम आत्मसात करणे
● महान पुरुष व स्त्रियांचे पतन का होते-२
● तुमच्या पीडे मध्ये देवाच्या अधीन होण्यास शिकणे
● दिवस १३:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
टिप्पण्या