"परमेश्वर जर घर बांधत नाही तर ते बांधणाऱ्यांचे श्रम व्यर्थ आहेत." (स्तोत्र १२७:१)
इस्राएल लोकांच्या पूर्वीच्या दिवसांत, जास्तकरून घरे ही सामान्य वस्तूंनी बनविलेली होती: पायासाठी दगड, आणि भिंती आणि घाण जमीन. तथापि, यापैकी काही घरांत खाली जमिनीवर मुख्य घरात नक्काशीदार फरशी लावलेली असे, हे दाखवीत की प्राचीन काळामध्ये देखील, लोक त्यांच्या सभोवतालच्या भागाला सुंदर बनविण्यास पाहत असत.
परंतु ही घराची भौतिक रचना नव्हती जी त्यास एक विशेष असे बनवीत होती. जशी म्हण आहे, "जेथे घर आहे तेथे हृद्य आहे," आणि हे लोक आहेत जे त्या घरात राहत आहेत ते त्याच्या वातावरणास बनवितात.
बायबल मध्ये, आपण आपली जीवने मजबूत पायांवर उभी करण्याच्या महत्वाबद्दल अनेक उदाहरणे पाहतो. उदाहरणार्थ, येशू दोन बांधकाम करणाऱ्यांबद्दल हे म्हणत बोलला, " २४ह्यास्तव जो प्रत्येक जण ही माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागतो तो कोणाएका सुज्ञ मनुष्यासारखा ठरेल; त्याने आपले घर खडकावर बांधले; २५मग पाऊस पडला, पूर आला, वाराही सुटला, व त्या घरास लागला; तरी ते पडले नाही, कारण त्याचा पाया खडकावर घातला होता. २६तसेच जो कोणी माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागत नाही तो कोणाएका मूर्ख मनुष्यासारखा ठरेल, त्याने आपले घर वाळूवर बांधले; २७मग पाऊस पडला, पूर आला, वाराही सुटला, व त्या घरास लागला; तेव्हा ते पडले, अगदी कोसळून पडले." (मत्तय ७:२४-२७)
त्याचप्रमाणे, नीतिसूत्रे १४:१ म्हणते, "प्रत्येक सुज्ञ स्त्री आपले घर बांधते; पण मूर्ख स्त्री आपल्या हातांनी ते पाडून टाकते." हे वचन आपल्याला आठवण देते की आपल्याकडे जबाबदारी आहे की घराचे वातावरण निर्माण करावे जे आपल्या स्वतःला व आपल्या लेकरांसाठी पोषण करणारे व साहाय्यक असावे.
तर मग आपण घराचे वातावरण कसे निर्माण करावे जे आपल्या घरात पोषणदायक व साहाय्यक असावे. येथे काही व्यवहारिक सिद्धांत आहेत ज्याचा विचार करावा. मी विश्वास ठेवतो की जर तुम्ही त्यांस आचरणात आणले, तर तुम्ही तुमच्या घरात मुख्य बदल पाहाल.
१. नातेसंबधांना प्राथमिकता दया.
दिवसाच्या शेवटी, आपल्या जीवनातील लोक सर्वात महत्वाचे असतात. आपले जोडीदार, लेकरे आणि कुटुंबाच्या इतर सदस्यांच्या नातेसंबधांमध्ये आपल्याला वेळ व शक्ती देण्याची गरज आहे. नीतिसूत्रे २४:३-४ म्हणते, "सुज्ञानाच्या योगे घर बांधता येते; समंजसपणाने ते मजबूत राहते; ज्ञानाच्या योगे त्याच्या खोल्या सर्व प्रकारच्या मोलवान व मनोरम वस्तूंनी भरून जातात." खरे ज्ञान जे लोक आपल्या सभोवती आहेत त्यांना मूल्य देण्याने सुरु होते.
२. प्रीति आणि कृपेचे वातावरण जोपासणे
क्षमा, संयम व दयाळूपणा हे सुदृढ घरासाठी महत्वाचे घटक आहेत. इफिस. ४:२-३ म्हणते, "पूर्ण नम्रता, सौम्यता व सहनशीलता दाखवून एकमेकांना प्रीतीने वागवून घ्या; आत्म्याच्या द्वारे घडून आलेले ऐक्य शांतीच्या बंधनाने राखण्यास झटत जा." या गुणांना आचरणात आणणे नेहमीच सोपे नसते, परंतु ते आपल्या घराला आरोग्य आणि पुनर्स्थितीत आणण्याचे ठिकाण बनविण्यास परिवर्तीत करू शकतात.
३. सुंदरता आणि व्यवस्था निर्माण करा.
जरी हे घराचे सर्वात महत्वाचे पैलू नसले तरी जागा निर्माण करण्याविषयी काहीतरी म्हटले पाहिजे जी सौंदर्यदृष्टया सुखकारक आणि सुव्यस्थित असावी. यासाठी साधारण काम करावे लागते जसे ताजी फुले ठेवणे किंवा कलाकुसर करणे किंवा मोठी कामे की तुमच्या घरातून अनावश्यक वस्तूंना काढून टाकणे. उपदेशक ३:११ म्हणते, "आपापल्या समयी होणारी हरएक वस्तू त्याने सुंदर बनवली आहे... ." आपल्या घरांमध्ये सुंदरता आणण्याद्वारे आपण देवाची निर्माण करण्याची रचना आणि सौंदर्यशील प्रीतीला प्रतिबिंबित करू शकतो.
४. विश्वासाची संस्कृती निर्माण करावी
नियमित कौटुंबिक प्रार्थना, उपासनेची व्यक्तिगत वेळ, आणि देवाच्या वचनाचे अध्ययन हे तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला देवाच्या व एकमेकांच्या जवळ येण्यास साहाय्य करू शकतात. यहोशवा २४:१५ म्हणते, "...मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार." तुमच्या घरात विश्वासाला प्राथमिकता देण्याद्वारे, तुम्ही एक पाया बनवू शकता जो या आयुष्याच्याही पलीकडे कायम राहतो.
हे सामान्य व व्यवहारिक सिद्धांत आत्मसात करण्याद्वारे, आपण एक घर निर्माण करू शकतो जे खरेच आपल्यासाठी आणि इतरांसाठी एक पवित्रस्थान असेल.
प्रार्थना
स्वर्गीय पित्या, आम्ही आमच्या घरच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात तुझ्या उपस्थितीला आमंत्रित करतो. त्याभोवती अग्नीची भिंत असे हो, आणि त्यामधील गौरव असे हो. येशूच्या नावाने, आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● मध्यस्थी वर एक भविष्यात्मक शिकवण १● भिऊ नका
● पृथ्वीवरील राजांचा अधिपती
● चमत्कार करणारा परमेश्वर जो आवश्यकतेपेक्षा अधिक आहे
● सन्मानाचे जीवन जगा
● अडखळण्याच्या जाळ्यात पडण्यापासून मुक्त राहणे
● हेतुपुरस्सर शोध
टिप्पण्या