डेली मन्ना
अत्यंत थकून गेल्याची व्याख्या करणे
Monday, 3rd of April 2023
34
27
1023
Categories :
Stress
नीतिसूत्रे १२:२५ स्पष्ट करते, "मनुष्याचे मन चिंतेने दबून जाते, परंतु गोड शब्द त्याला आनंदित करतो." हे वचन आपल्याला स्मरण देते की चिंता व निराशा वाटणे हे या पिढीसाठी काही नवीन विचार नाहीत; त्यात काहीही नवीन नाही. वास्तवात, उपदेशक १:९ आपल्याला सांगते, "........भूतलावर नवे म्हणून काहीच नाही." पवित्र शास्त्राच्या काळात देखील, लोकांना भावनात्मक तणाव आणि मानसिक तणाव सहन करावा लागला.
तुम्ही अत्यंत थकून गेल्याची व्याख्या कशी करणार?
जी मागणी केली आहे त्यापेक्षा स्त्रोत जे तुमच्याकडे उपलब्ध आहेत ते अधिक असते, तेव्हा ते मानसिकदृष्टया दबून जाण्यासाठी सिद्ध घटक आहे. जी मागणी केली आहे त्यापेक्षा स्त्रोत जे तुमच्याकडे उपलब्ध आहेत ते अधिक आहे असे तुम्हाला कधी वाटले काय? जर तुम्ही जीवन असेच जगाल, जरी काही वेळेकरिता, तर मला तुम्हाला इशारा देऊ दया की, तुम्ही थकून जाणार आहात.
अत्यंत थकवा ही शारीरिक, भावनिक आणि मानसिक थकव्याची स्थिती आहे जी जास्त आणि दीर्घकाळापर्यंत तणावामुळे उद्भवते. एखादी व्यक्ति जेव्हा भारावून जाते, भावनात्मकरित्या रिकामी होते आणि सतत मागण्या पूर्ण करू शकत नाही तेव्हा असे होते. जेव्हा ताणतणाव चालूच राहतो, तेव्हा देवाने नेमके जे करण्यासाठी त्यांना पाचारण केले आहे त्यामध्ये त्यांची रुची आणि प्रेरणा कमी होऊ लागते. अत्यंत थकवा हा संपूर्ण आरोग्य आणि कल्याणामध्ये खालावत जाण्याकडे नेऊ शकते. ते केवळ एखादा व्यक्तीला अत्यंत थकून जाण्यावरच प्रभाव करीत नाही परंतु त्यांच्या इतर सर्व संबंधावर परिणाम करते, आणि वातावरण खूप विषारी होते.
तुम्ही घरातील अलंकारिक बुल्डॉगमध्ये परिवर्तीत होता. ज्या प्रत्येकवेळी तुमचे जोडीदार तुमच्याबरोबर संवाद साधण्याचा प्रयत्न करतात, तुम्ही अनपेक्षितरित्या त्यांच्यावर ओरडता, त्यांना दुखविणे आणि संभ्रमात टाकून देता. तुमची लेकरे, जेव्हा फक्त अनौपचारिकपणे बोलण्यास पाहतात, तेव्हा तुमची विनाकारण ओरड, त्यांच्या उत्साहास नाउमेद करते. घरातील वातावरण हे तणावपूर्ण आणि विषारी बनते जेव्हा कुटुंबातील सदस्य तुमच्या उपस्थितीबद्दल प्रश्न विचारू लागतात. ते आश्चर्य करू लागतात की ते अधिक प्रसन्नदायक होतील जर तुम्ही त्याऐवजी ऑफिसमध्येच राहिलात, की तुमच्या अप्रत्याशित वर्तनाच्या भावनिक ताणापासून वाचविले जावे.
भीषण पुराच्या दरम्यान, एक मनुष्य त्याच्या घराच्या छप्परावर अडकून राहिला होता, कळकळीने प्रार्थना करीत होता, "देवा, कृपाकरून मला वाचव." शेवटी, एक हेलीकॉप्टर आले, परंतु त्याने त्यांना उत्तर दिले, "देव मला वाचवील!"
जेव्हा पाण्याची पातळी वाढतच गेली, एक बोट आली, पण त्या मनुष्याने उद्धटपणे यावर जोर दिला, "देव मला वाचवील!" पूर अत्यंत वाढला आणि एक निडर पोहणारा दिसला, जीवन वाचविण्यासाठी जैकेट देण्याची शेवटची संधी दिली, त्या मनुष्याला विनंती केली की ते घ्यावे. तरी पुन्हा, त्या मनुष्याने नाकारले, हे निश्चित आहे की देव मला वाचवील. मग, अपरिहार्यपणे, पुराच्या पाण्याने त्यास बुडवले, आणि तो वाहवत गेला, शेवटी तो स्वर्गात पोहचला.
तेथे, प्रत्येक जण रांगेत उभे राहिले, प्रभु येशूला भेटण्याच्या त्यांच्या संधीची आतुरतेने वाट पाहत होते. त्या मनुष्याला सोडून, प्रत्येक जण हसत होते, जो अत्यंत नाखूष होता. येशू त्याच्याकडे आला, त्यास हस्तांदोलन केले, त्याचे स्वर्गात स्वागत केले, आणि त्याच्या अप्रसन्नतेचे कारण विचारले. मनुष्याने उत्तर दिले, "मी तीन वेळा प्रार्थना केली, परंतु तू मला वाचवले नाही." येशूने उत्तर दिले, "ओह, तू त्याबद्दल अप्रसन्न आहेस."
प्रभु येशूने सौम्यपणे स्पष्ट केले, "माझ्या पुत्रा, आपल्याला काही गोष्टी स्पष्ट करण्याची गरज आहे. प्रथम, जेव्हा हेलीकॉप्टर आले, मी ते तुला सोडविण्यासाठी पाठविले होते, परंतु तू त्याकडे दुर्लक्ष केले. दुसऱ्यांदा, मी जीवनाची बोट देखील पाठविली, परंतु तू त्याचा देखील नाकार केला. शेवटी, मी स्वतः तुझ्याकडे पोहत आलो, जीवनाचा जैकेट तुला देत होतो, तरीही तू माझा स्वीकार केला नाही."
जेव्हा तो मनुष्य ते ऐकत होता, त्याने हे जाणले की मदत ही विविध प्रकारे आली होती परंतु त्याच्या अपेक्षेने त्यास दैवी साहाय्यासाठी आंधळे केले होते जे त्यामध्येच होते. म्हणून कृपाकरून, या मनुष्यासारखे होऊ नका; या संदेशाला जीवनरेखा माना.
प्रार्थना
स्वर्गीय पित्या, माझा आश्रय, माझ्या शक्तीचे स्त्रोत आणि माझ्या आत्म्यास पुनर्स्थापित करणारा म्हणून मी तुझे आभार मानतो. जेव्हा मी अत्यंत थकव्यास सामोरे जातो, मला ते ओळखण्यास ज्ञान दे की मी कधी थांबावे, नियंत्रण ठेवण्याची इच्छा सोडून दयावी आणि तुझ्या अखंड प्रेमावर अवलंबून राहावे. तुझ्या उपस्थितीमध्ये विश्राम करण्यास आणि माझ्या थकलेल्या आत्म्यास तुझ्या शांतीने पुनरुज्जीवित करू देण्यास मला शिकव. येशूच्या नावाने. आमेन!
Join our WhatsApp Channel
Most Read
● दयाळूपणाचे मोल आहे.● तुमच्या घरातील वातावरण बदलणे-४
● शेवटच्या समयाचे 7 मुख्य भविष्यात्मक चिन्हे # २
● तो शब्द पाळ
● देवाच्या चेतावणी कडे दुर्लक्ष करू नका
● गौरव आणि सामर्थ्याची भाषा-जीभ
● तुमचा हेतू काय आहे?
टिप्पण्या