तूं तर जेव्हा जेव्हा प्रार्थना करितोस तेव्हा तेव्हा 'आपल्या खोलीत जा व दार लावून घेऊन' आपल्या गुप्तवासी पित्याची 'प्रार्थनाकर' म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला तिचे फळ देईल. (मत्तय ६:६)
पवित्र शास्त्रात प्रभूचा "खोलीचा" संदर्भाचा अर्थ एक भौतिक स्थान म्हणून अक्षरशः नाही घेतला पाहिजे कारण मग पवित्र शास्त्र हे केवळ त्या लोकांसाठी लागू होईल ज्यांना अनेक खोल्यांसह घर आहे. प्रभू येशूने स्वतः विविध ठिकाणी प्रार्थना केली, जसे बाग, डोंगर आणि रान. त्याऐवजी, भर हा अडथळ्यापासून एक शांत, एकांत जागा शोधण्यावर आहे, जे देवाबरोबर गहन आणि अधिक केंद्रित संबंध करू देते. ही कल्पना सर्वत्र लागू आहे, जी ख्रिस्ती लोकांना प्रोत्साहन देते की त्यांच्या भौतिक परिसराची पर्वा न करता त्यांच्या स्वतःचे आध्यात्मिक पवित्रस्थान तयार करावे.
दार बंद करणे हे आपले अडखळण बंद करणे होय.देवाने ज्या कार्यासाठी तुम्हाला बोलाविले आहे त्याचा नंबर एक चा शत्रू हा अडथळा आहे. अडथळे तुमचे ध्यान काढून घेते. अडथळे हे धोकादायक असे आहेत कारण ते तुमचे ध्यान हे जे जास्तमहत्वाचे आहे त्यापासून जे अगदी लहान आहे त्याकडेनेहमी वळविते.
जेव्हा तुम्ही सर्व अडथळे काढून टाकता व चिन्हात्मकदृष्टया दार बंद करता, गोष्टी ह्या होऊ लागतात. हे ह्याच वेळी तुम्ही देवाचेध्यान आकर्षित करता. तेव्हा मग तो तुमच्या जीवनात कार्य करू लागतो ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केलेली नसते. लोक हे ठामपणे स्वीकारतील की परमेश्वर तुमच्या जीवनात कार्यरत आहे.
संदेष्टाअलीशा ने विधवेला सांगितले,"जा आणि सर्वी कडून व तुझ्या सर्व शेजाऱ्यांकडून रिकामीभांडे घेऊन ये; केवळ थोडे आणू नको. आणि जेव्हा तूं येशील, तेव्हा तूं व तुझी मुले आत असतील तेव्हा दार लावून घे व त्या सर्व भांडयात तेल ओत; आणि भांडे भरेल ते बाजूला ठेव."
लक्षातघ्या, तेल हे तेव्हाचवाढू लागले जेव्हा त्या स्त्रीने दार बंद केले. आता ही वेळ आहे की तुमच्या भोवतालच्या सर्व नकारात्मक आवाजांकडे दुर्लक्ष करावे. तुमच्या प्रार्थनेच्या वेळी तुमचे स्मार्ट फोन बंद करण्याची ही आता वेळ आहे. मी यास तुमच्या स्मार्ट फोन पासून उपास घेणे म्हणतो. कारण, अनेकांना त्यांच्या स्मार्ट फोन पासून भौतिकदृष्ट्या वेगळे होण्याची गरज आहे.उदाहरणार्थ, सध्या ते ज्या खोलीत आहेत त्यापासून काहींना त्यांचे स्मार्ट फोन दुसऱ्या खोलीत ठेवावे लागेल. हे ह्यावेळीच तुमच्या जीवनात प्रवाहाचा वर्षाव होण्यास सुरुवात होईल.
प्रार्थना
१.आपण २०२३ वर्षाच्या प्रत्येक आठवड्यात (मंगळावर/गुरुवार/शनिवार) उपास करीत आहोत. या उपासाचे पाच मुख्य उद्देश आहेत
२. प्रत्येक प्रार्थना मुद्द्यांसाठी कमीतकमी ३ मिनिटे किंवा जास्त वेळ प्रार्थना केली पाहिजे.
३. तसेच ह्या प्रार्थना मुद्द्यांना ज्या दिवशी तुम्ही उपास करीत नाहीत तेव्हा तुमच्या आध्यात्मिक वाढी साठी वापर करा.
व्यक्तिगत आध्यात्मिक वाढ
पित्या, येशूच्या नांवात,असे होवो की माझे शरीर, जीव व आत्माहेआपल्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्यापर्यंत निर्दोष असे राखिले जावो.
कौटुंबिक तारण
मी माझ्या संपूर्ण अंत:करणाने विश्वास ठेवतो व कबूल करतो, मी व माझे घराणे तर परमेश्वराचीच उपासना करणार. माझ्या येणाऱ्या दोन पिढ्या सुद्धा परमेश्वरचीच उपासना करतील. येशूच्या नांवात.
आर्थिकतेचा नवीन मार्ग
हेपित्या, मला आवश्यक व्यवसाय व मानसीक कौशल्याने परिपूर्ण कर की माझ्या मार्गात येणाऱ्या प्रत्येक संधीचा भरपूर फायदा घ्यावा.येशूच्या नांवात मलाआशीर्वादकर.
केएसएम चर्च वाढ
पित्या, असे होवो की प्रत्येक व्यक्ति जोकेएसएम चे प्रत्यक्ष प्रसारणपाहत आहे तेविलक्षण चमत्कार प्राप्त करतीलत्यामुळेतेत्या प्रत्येकांना आश्चर्यात टाकेल जे त्याविषयी ऐकतील. असे होवो की ते जे ह्या चमत्कार विषयी ऐकतील ते विश्वास सुद्धा प्राप्त करतील की तुमच्याकडे वळावे व त्यामुळे चमत्कार प्राप्त करावा.
देश
पित्या, येशूच्या नांवात,अंधाराच्या दुष्ट शक्ति द्वारेविनाशाच्या प्रत्येक जाळापासून आमच्या देशाला मुक्त ठेव.
Join our WhatsApp Channel
Most Read
● विश्वासासह विरोधकांना सामोरे जाणे● अद्भुततेच्या क्षेत्रात प्रवेश मिळविणे
● विश्वासाचे जीवन
● महानतेचे बीज
● लोक बहाणे करण्यासाठी कारणे देतात -भाग 2
● नवीन आध्यात्मिक वस्त्रे परिधान करा
● स्तुति वृद्धि करते
टिप्पण्या