त्या काळी इस्राएला ला कोणी राजा नव्हता, ज्याला जसे बरे दिसे तसे तो करी. (शास्ते २१:२५)
अशा प्रकारची ती वेळ होती ज्यात दबोरा जगली होती.तुम्हीं आणि मी ज्या वेळेत राहत आहोत त्यासमान ते वाटत नाही काय?
शास्ते ४ आणि ५ आपल्याला सांगते कीदबोरा ही इस्राएली इतिहासात पहिली स्त्री शासक होती. त्यावेळेत जेव्हा स्त्रियांना दुय्यमलेखले जाते होते, ती तिच्या वेळेत उच्च पदापर्यंत गेली. दबोरा चे कार्य आणि आचरण ह्याकडे लक्षपूर्वक पाहिले पाहिजे आणि त्याप्रकारे तिच्या जीवनाकडून सामर्थ्यशाली धडे शिकले पाहिजे.
#१ दबोरा ज्ञानी होती
त्या समयी लप्पिदोथाची बायको दबोरा संदेशहारिका ही इस्राएलाचा न्यायनिवाडा करीत असे. एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशांतील रामा व बेथेल ह्यांच्या दरम्यान दबोरेच्या खजुरीखाली तिची बैठक असे; इस्राएल लोक तिच्याकडे न्यायनिवाड्यासाठी येत असत. (शास्ते ४:४-५)
बायबल तिला संदेशहारिका म्हणते. एक संदेष्टा हा केवळ देवाचे मुख असा आहे. हे घडते जेव्हा व्यक्ति देवाच्या उपस्थिती मध्ये भरपूर वेळ घालवितो. हे स्पष्ट आहे की तिचे ज्ञान हे तिचे देवाबरोबरच्या घनिष्ठ संबंधाने आले होते. तिचे देवाबरोबरच्या घनिष्ठते मुळे तिला ज्ञान पुरविले होते की इस्राएली लोकांना विश्वसनीय मार्ग दाखवावा.
कोणीतरी एकदा म्हटले आहे, "तुम्ही एकतर समस्येचेभागीदार असता किंवा उपाय आणण्याचे भागीदार असता." हे स्पष्ट आहे की दबोरा ही लोकांच्या जीवनात समस्येचे समाधान करण्याची हिस्सेदार होती. तुम्ही सुद्धा तुमचे कुटुंब, तुमचे चर्च, तुमच्या कामाच्या ठिकाणी वगैरे समस्येचे समाधान करण्याचे भागीदार होऊ शकता. देवाबरोबर अधिक वेळ घालवा आणि तुम्ही हे होताना पाहाल.
#२ दबोरा ही उपलब्ध होती
बायबल सांगते, दबोरा ही एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशांतील रामा व बेथेल ह्यांच्या दरम्यान खजुरीखाली बसत असे."
एके दिवशी एका तरुण मुलीने मला विचारले, "पास्टर मायकल, देवाने सामर्थ्यशाली उपयोगात आणण्याचे गुपित काय आहे?" मी तिला स्पष्ट शब्दात सांगितले, "ही योग्यता नाही तर उपलब्ध असणे."
तुम्ही कदाचित इतरांच्या मध्य सर्वात वरदानीत व्यक्ति नसाल परंतु जर जे तुमच्याकडे आहे ते देवाला अर्पण करता, तोतुमचा उपयोग करेल. येथे देवाच्या राज्यात अनेक वरदानीत लोक आहेत परंतु ते कधीही उपलब्ध नाहीत. ते केवळ चर्च मध्ये तेव्हाच दिसतात जेव्हा त्या नगरात प्रसिद्ध संदेष्टा किंवा प्रचारक आले आहेत.
त्यांच्यासारखे बनू नका. उपासनेला हजर राहा जरी जेव्हा संदेष्टा किंवा प्रचारक हे प्रसिद्ध असे नाहीत. उपासनेला हजर राहा जरी जेव्हा प्रेरणा आणि काही प्रोत्साहन हे गमाविलेले आहे आणि तुमचे वरदान अर्पण करा. परमेश्वर तुम्हाला त्याप्रकारे तयार करेल ज्याकरिता त्याने तुमच्यासाठी योजना केली आहे.
आणखी एक गोष्ट, जेव्हा परमेश्वर पाहतो की तुम्ही पूर्णपणे नम्र झाला आहात की त्याची सेवाकरावी तेव्हा तो तुम्हाला लहान गोष्टी करण्यास सुद्धा सांगतो, मगच तो तुमच्यावर मोठया आणि अधिक महत्वाच्या गोष्टी करण्यासाठी भरंवसा ठेवू शकतो! (लूक १६: १० वाचा)
प्रार्थना
प्रत्येक प्रार्थना मुद्द्यासाठी कमीत कमी २ मिनिटे आणि अधिक वेळ प्रार्थना केली पाहिजे.
वैयक्तिक आध्यात्मिक वाढ
पित्या, येशूच्या नांवात, मला तुझ्या जवळ घे. पित्या, मी तुझे आभार मानतो की तूं मला योग्यता दिली आहे.आता, मला स्वीकारणारे हृदय दे, म्हणजे मी नेहमीच माझी योग्यता घेण्यास इच्छूक असावे आणि त्यास तुझ्यासाठी उपलब्ध करावे. येशूच्या नांवात. आमेन.
कुटुंबाचे तारण
परमेश्वर पित्या, तुझे वचन म्हणते की, "कारण ईश्वरप्रेरित दु:ख तारणदायी पश्चातापास कारणीभूत होते, त्याबद्दल वाईट वाटत नाही; पण ऐहिक दु:ख मरणास कारणीभूत होते" (२ करिंथ ७:१०). फक्त तूच आमचे डोळे या सत्यासाठी उघडू शकतो की सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला अंतरले आहेत. माझ्या कुटुंबाच्या सदस्यांना ईश्वरप्रेरित दु:खाच्या भावनेसह तुझ्या आत्म्याचा स्पर्श कर की त्यांनी पश्चाताप करावा, तुला शरण यावे आणि त्यांचे तारण व्हावे. येशूच्या नावाने.
आर्थिक प्रगती
पित्या, येशूच्या नावाने मला लाभहीन श्रम आणि भ्रमित कार्यांपासून मुक्त कर.
केएसएम चर्च
पित्या, येशूच्या नावाने, मी प्रार्थना करतो की थेट प्रक्षेपण देशभरातील हजारो कुटुंबांपर्यंत पोहचावे. तुला प्रभू आणि तारणारा म्हणून ओळखण्यासाठी त्यांना आकर्षित कर. जुळणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला वचन, उपासना आणि प्रार्थनेमध्ये वाढीव.
राष्ट्र
पित्या, येशूच्या नावाने, आपल्या राष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तुझा आत्मा सामर्थ्याने कार्यरत होण्यासाठी मी प्रार्थना करतो, ज्यामुळे चर्चची सतत वाढ व विस्तार होईल.
Join our WhatsApp Channel
Most Read
● उपासाचे जीवन-बदलणारे लाभ● जीवनाचे पुस्तक
● बेखमीर अंत:करण
● गुप्त गोष्टी समजून घेणे
● पाऊस पडत आहे
● अद्भुततेच्या क्षेत्रात प्रवेश मिळविणे
● दिवस ३३ :४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
टिप्पण्या