तेव्हा स्वर्गातून एक देवदूत येऊन आपणाला शक्ति देताना त्याने पाहिला. मग अत्यंत विव्हळ होऊन त्याने अधिक आग्रहाने प्रार्थना केली, तेव्हा रक्ताचे मोठमोठे थेंब भूमीवर पडावे असा त्याचा घाम पडत होता. (लूक २२:४३-४४)
तोस्त्री ला म्हणाला, "मी तुझे दु:ख व तुझे गर्भधारण बहुगुणीत करीन; .......तुझ्यामुळे भूमीला शाप आला आहे; तूं आयुष्यभर कष्ट करून तिचा उपज खाशील. (उत्पत्ति ३: १६-१७)
येशू जेव्हा गेथसेमाने बागेत होता, त्याने रक्त सांडले. वैद्यकीय शास्त्र याची पुष्टी करते की जेव्हा व्यक्तितीव्र यातनेत असतो, रक्तवाहिन्या फुटतात आणि रंध्रामधून रक्त बाहेर पडते. तेच काय ते प्रत्यक्षात येशूला गेथसेमाने बागेत झाले.
जर तुम्ही संकटातून जात आहात, कदाचित तुम्ही तुमची इच्छाशक्ती गमाविली असेल. काहीही प्रकरण असो, तुम्हीहे म्हणत ते पुन्हा प्राप्त करू शकता, "परमेश्वरा, तुझ्या रक्ताने मला शुद्ध कर. माझ्या जीवनात ये. तुझी इच्छा पूर्ण करण्यास मला समर्थ कर."
येशूने पित्याकडे तीन वेळा प्रार्थना केली की हा संकटाचा प्याला काढून टाकावा. परंतु नंतर त्याने म्हटले, "तरी माझी इच्छा नाही तर तुझी इच्छा पूर्ण होवो." इच्छाशक्ती जी तुम्ही गमाविली आहे, ती येशू ख्रिस्तामध्ये प्राप्त केली जाऊ शकते.
यशया ५०:६ म्हणते, "मी मारणाऱ्यापुढे आपली पाठ केली, केस उपटणाऱ्यापुढे मी आपले गळ केले; उपमर्द व छिथू यांपासूनमी आपले तोंड चुकविले नाही." आदर व कृपे विषयी चेहरा बोलतो. येशूनेत्याचे रक्त त्याच्या चेहऱ्यावरून वाहिलेजेणेकरून येशू द्वारे आपण आदर व ओळख प्राप्त करावी. त्याचा चेहरा विद्रूप केला गेला जेणेकरून तुमचा चेहरा स्वीकारला जावा.आज धैर्याने परमेश्वरासमोर या, जेणेकरून तो तुम्हाला पुनर्स्थापित करो. तो तुमची सर्व भग्नता व्यवस्थित करेन व तुम्हांला परिपूर्ण करेन.
प्रार्थना
प्रत्येक प्रार्थना मुद्द्यांसाठी कमीतकमी ३ मिनिटे किंवा जास्त वेळ प्रार्थना केली पाहिजे.
व्यक्तिगत आध्यात्मिक वाढ
स्वर्गातील पित्या, मला आशीर्वादित केल्याबद्दल मी तुझा धन्यवाद करतो. तुझा पुत्र, येशू ख्रिस्ताला ह्या जगात माझ्या ऐवजी बलिदान होण्यासाठी पाठविल्याबद्दल तुझा धन्यवाद. ख्रिस्ताने जो आशीर्वाद माझ्यासाठी ठेवला आहे तो मी प्राप्त करतो. मी तो आदर व ओळख प्राप्त करतो जे तुझ्यापासून येते आणि तुला सर्व गौरव देतो. येशूच्या नांवात. आमेन.
कौटुंबिक तारण
येशूच्या नांवात, मी आदेश देतो की मी, माझ्याकुटुंबाचे सदस्य, व माझे चर्च हे सिद्धांतांचे प्रत्येक वारे व मनुष्याच्या कपट योजनासह गडबडणार नाही किंवा त्याने भारावून जाणार नाही.
येशूच्या नांवात, मी आदेश देतो की मी, माझ्याकुटुंबाचे सदस्य, व माझे चर्च हे फसवणुकीच्या कपटयुक्त योजनांच्या धूर्त लबाडीच्या विरोधात संरक्षित केले जावो आणि आम्ही स्पष्टपणे लपलेले असत्य पाहावे व त्यास पूर्णपणे अस्वीकार करावे.
आर्थिकतेचा नवीन मार्ग
ख्रिस्त येशू द्वारे माझा पिता गौरवाच्या द्वारे माझी व माझ्या कुटुंबाच्या सदस्यांची सर्व गरज पुरवेल.
केएसएम चर्च वाढ
पित्या, पास्टर मायकल व त्याच्या संघाच्या सदस्यांना तुझ्या आत्म्याद्वारे नवीन अभिषेक कर ज्याचा परिणाम तुझ्या लोकांमध्ये चिन्हे व चमत्कार व सामर्थ्याची कार्ये होवो. ह्याद्वारे लोकांना तुझ्या राज्यात आण. येशूच्या नांवात.
देश
पित्या, येशूच्या नांवात मी प्रार्थना करतो की भारत देशाच्या प्रत्येक शहर व राज्यातील लोकांची अंत:करणे तुझ्याकडे वळो. त्यांनी त्यांच्या पापाचा पश्चाताप करावा व तुला प्रभु व तारणारा म्हणून स्वीकारावे.
Join our WhatsApp Channel
Most Read
● प्रभावीपणे वेळेचे व्यवस्थापन कसे करावे● दिवस १२ : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे
● भविष्यात्मक वचन प्राप्त केल्यानंतर काय करावे?
● परमेश्वराची सेवा करण्याचा अर्थ काय आहे-२
● छाटण्याचा समय
● विसरलेली आज्ञा
● स्तुति वृद्धि करते
टिप्पण्या