यरीहोच्या गजबजलेल्या रस्त्यांवर, एक खूप श्रीमंत माणूस विकत घेऊ शकत नसलेल्या वस्तूंच्या शोधात भटकत होता-विमोचन. त्याचे नाव, जक्कय, त्याचा अर्थ “शुद्ध”, प्रमुख कर वसूल करणारा या नात्याने त्याने आपलेच लोक: यहूदी, यांच्याकडून संपत्ती जमा केली होती, जीवन जे तो जगत होता त्याच्या ते अगदी विरोधात होते. परंतु एक भेट त्याला होणार होती- एक भेट जी त्याचे नाव आणि त्याचे नशीब पुन्हा परिभाषित करेल.
लूक १९:१-२ मध्ये जक्कयाची कथा जशी लिहिलेली आहे , ती शोधणाऱ्या हृदयाच्या परिवर्तनीय शक्तीची साक्ष म्हणून उलगडते. त्याची सामाजिक स्थिति आणि अप्रतिष्ठा असूनही प्रभू येशूला पाहण्याची जक्कयाची उत्कट इच्छा त्याच्या जीवनाचा मार्ग कायमचा बदलणार होती. जसे नीतिसूत्रे ८:१७ वचन देते, “माझ्यावर जे प्रीती करतात त्यांच्यावर मी प्रीती करते; जे मला परिश्रमाने शोधतात त्यांना मी सापडते.”
गर्दी खूप आणि गोंगाट फार होता; आणि जक्कय ठेंगणा होता. तरीही, त्याच्या मर्यादा मोठ्या विश्वासासाठी पायरी झाल्या, जसे आपण लूक १९:३-४ मध्ये वाचतो. त्याच्यासारखे, आपल्याला अनेकदा आपल्या अपुरेपणाची, आपल्या कमतरतांची आठवण करून दिली जाते जी देवाबद्दलच्या आपल्या दृष्टीकोनात अडथळा आणतात. परंतु देव आपल्याला बालकासारखा विश्वास असण्याबद्दल पाचारण करतो, की गोंगाट आणि टीकाकारांपेक्षा उभारून यावे. मत्तय १८:३ मध्ये, येशू शिकवतो, “मी तुम्हांला खचित सांगतो, तुमचा पालट होऊन तुम्ही बालकांसारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही.” लहान बालकासारखे, जक्कयने तसेच केले जेव्हा तो येशूला पाहण्यासाठी घाईने उंबराच्या झाडावर चढला.
उंबराचे झाड तेथे योगायोगाने ठेवलेले नव्हते. जक्कयाची कृपेशी भेट होण्यासाठी एक स्थान म्हणून देवाकडून आधीच एक दैवी पुरवठा रचला गेला होता. १ करिंथ. २:९ आपल्या अंत:करणाशी कुजबुजते, “हे तर ह्या शास्त्रलेखाप्रमाणे आहे, डोळ्याने जे पाहिले नाही, कानाने जे ऐकले नाही व माणसाच्या मनात जे आले नाही, ते आपणावर प्रीती करणाऱ्यांसाठी देवाने सिद्ध केले आहे.” त्याचप्रकारे, तुम्हांला गरज पडण्याअगोदर देवाने तुमच्यासाठी खूप आधी गोष्टी तयार केल्या आहेत. जेव्हा तुम्ही त्याचा धावा करता, तेव्हा त्या गोष्टी तुम्हांला प्रकट करण्यात येतील.
जसे येशू जवळ आला, तसे त्याने जक्कयाला नावाने हाक मारली जसे काही ते जुने मित्र होते. या दैवी भेटीमध्ये, आपण यशया ४३:१ चा प्रतिध्वनी पाहतो, “मी तुला तुझ्या नावाने हाक मारली आहे, तू माझा आहेस.” येशू स्वतःला जक्कयाच्या घरी आमंत्रित करतो, त्याच्या अंत:करणात खोलवर राहण्याच्या आमंत्रणास सूचित करते. लोकसमुदायाने कुरकुर केली, पण स्वर्गाने आनंद केला, कारण आणखी एक हरवलेले मेंढरू सापडले होते.
जक्कयाची कथा ही आपली कथा आहे. जेव्हा आपण प्रभूचा धावा करतो, तेव्हा ज्या प्रत्येक मर्यादा आपणांस अडथळा करतात त्यावर आपण मात करू. नम्रतेच्या ठिकाणी येण्यासाठी जेव्हा आपण येशूच्या आमंत्रणास स्वीकारतो, तेव्हा आपणास प्रभू येशूची कायमची उपस्थिती प्राप्त होईल जी केवळ आपलेच नाही तर आपल्या घराण्याचे देखील परिवर्तन करेल. तेव्हा आपल्याला खऱ्या अर्थाने विश्वासाचे पुत्र म्हणतील.
प्रार्थना
प्रभू येशू तुझ्या परिवर्तनीय कृपा आणि दयेसाठी तुझे आभार. आम्हांला आतून बाहेरून बदलून टाक जेणेकरून आमच्या जीवनात तुझे चालू असलेले कार्य आमच्या बोलण्यात आणि कार्यात योग्यरीत्या प्रतिबिंबित होवो. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● तुमची प्रतिक्रिया काय आहे?● प्रीति-जिंकण्याची योजना -२
● पाच प्रकारच्या लोकांना येशू दररोज भेटला #3
● लैंगिक परीक्षेवर वर्चस्व कसे मिळवावे
● परमेश्वर अंत:करण शोधतो
● देव आज मला पुरवठा करू शकतो काय?
● सार्वकालिकता मनात ठेवून जगणे
टिप्पण्या