डेली मन्ना
दिवस १२:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
Friday, 22nd of December 2023
38
26
1337
Categories :
उपास व प्रार्थना
असामान्य यशप्राप्तीचा हा माझा हंगाम आहे
“११ परमेश्वराचा कोश ओबेद-अदोम गित्ती ह्याच्या घरी तीन महिने राहिला आणि परमेश्वराने ओबेद-अदोम व त्याचे सर्व घराणे ह्यांना बरकत दिली. परमेश्वराने ओबेद-अदोम ह्याच्या घराण्याला व त्याच्या सर्वस्वाला बरकत दिली असे दावीद राजाला कोणी सांगितले; तेव्हा दाविदाने जाऊन देवाचा कोश ओबेद-अदोमाच्या घरून दावीदपुरास मोठ्या आनंदाने आणला.” (२ शमुवेल ६:११-१२)
जुन्या करारात, देवाचा कोश त्याच्या लोकांच्या मध्ये देवाच्या उपस्थितीचे प्रतिनिधित्व करत होता. नवीन करारात, देवाची उपस्थिती ही आता कोशापुरती मर्यादित नव्हती; आपली शरीरे ही देवाचे मंदिर आहेत (१ करिंथ. ६:१९-२०). जर देवाची उपस्थिती ओबेद-अदोमाच्या जीवनास तीन महिन्यात बदलू शकत होती, तर तुमच्या जीवनात देवाची उपस्थिती तुम्हांला असामान्य यशप्राप्ती देऊ शकते. देवाची उपस्थिती ही अजूनही सामर्थ्यशाली आहे आणि कोणतीही परिस्थिती बदलू शकते. नवीन करारात ख्रिस्त देवाच्या उपस्थितीचे प्रतिनिधित्व होता आणि जेव्हाजेव्हा तो प्रकट होतो, तेथे नेहमीच असामान्य यशप्राप्ती होते अशी नोंद आहे.
असामान्य यशप्राप्तीचा आनंद घेणे म्हणजे काय?
१. असामान्य यशप्राप्ती ती आहे जी तुमच्या जीवनात आणि तुमच्या कुटुंबाच्या संपूर्ण वंशात कधीही घडली नव्हती.
२. असामान्य यशप्राप्ती म्हणजे एखाद्या परिस्थितीवर देवाच्या चमत्कारिक कार्याचा आनंद घेणे.
३. असामान्य यशप्राप्ती ही लक्षणीय आणि नाकारले न जाणारे यश, साक्षी आणि प्राप्ती आहे.
४. म्हणजे जेथे मार्ग नाही तेथे देव मार्ग बनवतो.
असामान्य यशप्राप्तीची पवित्र शास्त्रातील उदाहरणे
१. ऋण रद्द करण्यासाठी आर्थिकदृष्ट्या समर्थ होणे
२ राजे ४:१-७ मध्ये, विधवेने असामान्य यशप्राप्तीचा अनुभव केला आणि ती ऋणातून मुक्त झाली. देवाचा अभिषेक इतका शक्तिशाली आहे जो तुम्हांला ऋणातून मुक्त करतो. मी तुमच्या जीवनावर आदेश देतो, येशूच्या नावाने असामान्य यशप्राप्तीचा हा तुमचा हंगाम आहे.
२. लज्जेला कृपेने पांघरून घातले जाईल
येशूच्या उपस्थितीने लज्जेला झाकले जे नवीन विवाहित जोडपे आणि त्याच्या कुटुंबावर येणार होते. चमत्कार ज्याने पाण्याला द्राक्षारसात बदलले ती असामान्य यशप्राप्ती होती (योहान. २:१-१२). देवाची उपस्थिती फरक आणते; आणि ती लज्जा आणि निंदा संपुष्टात आणते.
असामान्य यशप्राप्तीचा आनंद कसा घ्यावा?
१. काहीतरी घडण्यापर्यंत प्रार्थना करा
प्रार्थना परिस्थितीवर देवाच्या सामर्थ्याला आमंत्रित करते; ते अशक्यतेला शक्यतेमध्ये बदलते. जर येथे प्रार्थना करण्यासाठी एक माणूस आहे, तर तेथे प्रार्थनेचे उत्तर देण्यासाठी देव आहे.
“एलीया आपल्यासारखा स्वभावाचा माणूस होता त्याने पाऊस पडू नये अशी आग्रहाने प्रार्थना केली, आणि साडेतीन वर्षे पृथ्वीवर पाऊस पडला नाही. पुन्हा त्याने प्रार्थना केली; तेव्हा आकाशाने पाऊस पाडला, आणि भूमीने आपले फळ उपजवले.” (याकोब ५:१७-१८)
२. देवाच्या वचनाचे पालन करणे
आज्ञाधारकपणा तुम्हांला असामान्य यशप्राप्तीसाठी योग्य ठिकाणी स्थिर करते. तुमच्या आज्ञाधारकपणाचे स्तर तुमच्या असामान्य यशप्राप्तीला निश्चित करेल.
“शिमोनाने त्याला उत्तर दिले, ‘गुरुजी, आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरले नाही, तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडतो.” (लूक. ५:५)
“त्याची आई चाकरांनी म्हणाली, ‘हा तुम्हांला जे काही सांगेल ते करा.” (योहान. २:५)
आपला देव भस्म करणारा अग्नी आहे; आणि तो अग्नीने उत्तर देणारा परमेश्वर आहे (१ राजे १८:२४; इब्री. १२:२९). देवाकडून उत्तर अनपेक्षितपणे येते. तुमच्या सर्व प्रार्थना आणि उपास व्यर्थ होणार नाहीत; तुमच्या जीवनात देवाच्या गौरवाची जाहिरात करणाऱ्या साक्षी येशूच्या नावाने तुम्ही प्राप्त कराल.
३. कधीही हार मानू नका
जर तुम्ही देवावर, तो सर्व शक्यतेचा परमेश्वर आहे म्हणून विश्वास ठेवत नसाल, तर तुम्ही असामान्य यशप्राप्तीचा आनंद घेऊ शकणार नाही. निराशाजनक परिस्थितीतही तुम्ही आशावादी राहिले पाहिजे; हे अशा प्रकारेच देव हस्तक्षेप करतो की गोष्टींना बदलावे. असामान्य प्रगतीसाठी विश्वास हा तुम्हांला नेहमीच योग्य ठिकाणी स्थिर करेल. कधीही हार मानू नका.
“१८ तशी तुझी संतती होईल,’ ह्या वचनाप्रमाणे त्याने ‘बहुत राष्ट्रांचा बाप’ व्हावे म्हणून आशेला जागा नसतानाही त्याने आशेने विश्वास ठेवला. १९ तथापि विश्वासाने दुर्बळ न होता, आपले निर्जीव झालेले शरीर (तो सुमारे शंभर वर्षांचा होता) व सारा हिच्या गर्भाशयाचे निर्जीवपण ही त्याने लक्षात घेतली, २० परंतु देवाच्या अभिवचनाकडे पाहून तो अविश्वासामुळे डगमगला नाही, तर विश्वासाने सबळ होऊन त्याने देवाचे गौरव केले. २१ आणि देव आपण दिलेले अभिवचन पूर्ण करण्यासाठी समर्थ आहे अशी त्याची पक्की खातरी होती.” (रोम. ४:१८-२१)
प्रार्थना
तुमच्या मनातून येईपर्यंत प्रत्येक प्रार्थना अस्त्र वारंवार म्हणत राहा. केवळ तेव्हाच मग पुढील प्रार्थना अस्त्राकडे वळा. (ते वारंवार करा, त्यास वैयक्तिक करा आणि कमीत कमी १ मिनिटासाठी तसे प्रत्येक प्रार्थना मुद्द्याबरोबर करा.)
१. पित्या, गुप्त संधींसाठी येशूच्या नावाने माझे डोळे उघड. (इफिस. १:१८)
२. माझ्या प्रगतीला अडथळा करणाऱ्या प्रत्येक बालेकिल्ल्यांना येशूच्या नावाने मी ओढून काढत आहे. (२ करिंथ. १०:४)
३. माझे नशीब खराब करू शकणाऱ्या कोणत्याही नात्यापासून येशूच्या नावाने मी संबंध तोडतो. (२ करिंथ. ६:१४)
४. परमेश्वरा, असामान्य यशप्राप्तीसाठी येशूच्या नावाने मला शहाणपण प्रदान कर. (याकोब १:५)
५. पित्या, येशूच्या नावाने मला आर्थिक, वैवाहिक आणि आंतरराष्ट्रीय यशप्राप्ती प्रदान कर. (यिर्मया २९:११)
६. कोणतीही शक्ती जी मला साक्षीसाठी नाकारत आहे येशूच्या नावाने पवित्र आत्म्याच्या अग्नीने ती नष्ट होवो. (यशया ५४:१७)
७. कोणताही बलाढ्य माणूस जो माझ्या पुढील स्तराविरोधात लढा देत आहे तो येशूच्या नावाने बांधला जावा. (मत्तय. १२:२९)
८. परमेश्वरा, माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबियांसाठी आशिर्वादाची नवीन द्वारे येशूच्या नावाने उघड. (प्रकटीकरण ३:८)
९. या हंगामात मी संपूर्ण यशप्राप्ती येशूच्या नावाने प्राप्त करत आहे. (स्तोत्र. ८४:११)
१०.माझी साक्ष आणि माझ्या नशिबाचे लक्ष दुसरीकडे करण्यासाठी कोणतीही शक्ती हल्ला करत आहे, मी तुला येशूच्या नावाने नष्ट करतो. (लूक. १०:१९)
११. माझ्या यशप्राप्तीच्या विरोधात लढा देणारी कोणतीही वेदी, येशूच्या नावाने उध्वस्त होवो. (शास्ते ६:२५-२७)
१२. माझ्या नशिबाला पदोन्नत करण्याच्या विरोधात बोलणारी कोणतीही शक्ती, येशूच्या नावाने गप्प केली जावी. (यशया ५४:१७)
१३. येशूच्या नावाने माझे नशीब रद्द होणार नाही. (यिर्मया १:५)
१४. येशूच्या नावाने माझी चांगली अपेक्षा कमी केली जाणार नाही. (नीतिसूत्रे २३:१८)
१५. हे परमेश्वरा, मला, माझ्या कुटुंबाच्या सदस्यांना, पास्टर मायकल आणि संघाला येशूच्या नावाने अभिषेकाच्या उच्च स्तरावर ने. (१ शमुवेल १६:१३)
१६. पित्या, असामान्य यशप्राप्तीसाठी मला येशूच्या नावाने समर्थ कर. (प्रेषित. १:८)
१७. येशूच्या नावाने, असामान्य प्रगतीसाठी हा माझा हंगाम आहे. (स्तोत्र. ७५:६-७)
१८. येशूच्या नावाने, जे सर्व मी गमावले आहे त्याचा पाठलाग करतो, त्यावर प्रभुत्व मिळवतो आणि येशूच्या नावाने ते प्राप्त करतो. (१ शमुवेल ३०:८)
१९. हे परमेश्वरा, या उपास आणि प्रार्थनेच्या ४० दिवसांत जे सर्व जण सहभागी झाले आहेत त्या सर्वांना आणि मला येशूच्या नावाने समर्थ कर. (यशया ४०:३१)
२०. मी आदेश देत आहे की, येशूच्या नावाने सर्व काही माझ्या चांगल्यासाठी कार्य करण्यास सुरुवात करो. (रोम. ८:२८)
Join our WhatsApp Channel
Most Read
● प्रार्थनाहीनता दुतांच्या कार्यास अडथळा आणते● सार्वकालिक निवेश
● आजच्या वेळेत हे करा
● कृपेवर कृपा
● तुमचा आशीर्वाद बहुगुणीत करण्याचा खात्रीशीर मार्ग
● दिवस ०८ : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे
● २१ दिवस उपवासः दिवस १८
टिप्पण्या