डेली मन्ना
दिवस १५ :४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
Monday, 25th of December 2023
30
22
1003
Categories :
उपास व प्रार्थना
अंधाराच्या कामांचा प्रतिकार आणि उलट करणे
“पाहा, उपटण्यास व विध्वंस करण्यास, नासधूस करण्यास व पाडून टाकण्यास, बांधण्यास व लागवड करण्यास मी तुला आज राष्ट्रांवर व राज्यांवर नेमले आहे.” (यिर्मया १:१०)
विश्वासणारे म्हणून अंधाराच्या कामांना विरोध करणे आणि त्यांना नष्ट करण्याची आपल्याकडे जबाबदारी आहे. जे काही प्रतिकार करण्यात तुम्ही अयशस्वी व्हाल ते तसेच राहील. पुष्कळ विश्वासणारे त्यांच्या जीवनातील सैतानाचा प्रतिकार करण्यासाठी देवाची वाट पाहत राहतात. ते दैवी तत्वांबद्दल अज्ञानी आहेत जे “वाईटाचा प्रतिकार” करण्याची जबाबदारी आपल्यावर टाकते.
अंधाराच्या शक्तींचे कार्य खरे आहे; आपण त्यांना आपला समाज, बातम्या आणि राष्ट्रात पाहू शकतो. पुष्कळ जण त्यास व्याकरणाने स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतात, परंतु आध्यात्मिक व्यक्तीला हे ठाऊक असते की तसल्या गोष्टी आध्यात्मिकरित्याच हाताळल्या जाऊ शकतात.
विश्वासणारे म्हणून, ख्रिस्त पृथ्वीवर असताना त्याने दुष्टाचे कार्य कसे नष्ट केले शिकण्याने आपण त्याचे अनुकरण करावे हे आपले ध्येय असावे.
“नासोरी येशूला देवाने पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला; तो सत्कर्मे करत व सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांना बरे करत फिरला; कारण देव त्याच्याबरोबर होता.” (प्रेषित. १०:३८)
शत्रूची शस्त्रे कोणती आहेत?
शत्रूच्या सर्व शस्त्रांची मी यादी देऊ शकत नाही; ध्येय हे तुम्हांला काही सांगावे जे दुष्टाच्या कार्याबद्दल तुमचे डोळे उघडतील. ही थोडीशी समज त्यासोबत जोडलेल्या पवित्र शास्त्रांच्या वचनाद्वारे तुम्हांला आध्यात्मिक समज देईल.
१. आजार आणि रोग
“तो शब्बाथ दिवशी एका सभास्थानात शिकवत होता. तेव्हा पाहा, अठरा वर्षे विकाराचा आत्मा लागलेली एक स्त्री तेथे होती; ती कुबडी असल्यामुळे तिला नीट उभे राहता येत नव्हते. येशूने तिला पाहून बोलावले व म्हटले, ‘बाई, तू आपल्या विकारापासून मुक्त झाली आहेस.’ त्याने तिच्यावर हात ठेवताच ती सरळ झाली व देवाचा महिमा वर्णू लागली.
ही तर अब्राहामाची कन्या आहे; पाहा, हिला सैतानाने अठरा वर्षे बांधून ठेवले होते; शब्बाथ दिवशी हिला ह्या बंधनापासून सोडवणे योग्य नव्हते काय?” (लूक. १३:१०-१३, १६)
सैतानाने या स्त्रीला १८ वर्षे बांधून ठेवले होते; आणि जर ख्रिस्ताने तिला बरे केले नसते, तर ती त्या विकारात मरून गेली असती.
२. दोष लावणे
सैतान लोकांना पाप करायला लावतो, आणि देवासमोर तरीही त्यांना दोष लावतो.
“तेव्हा मुख्य याजक यहोशवा हा परमेश्वराच्या दिव्यदूतासमोर उभा आहे व त्याचा विरोध करण्यासाठी सैतान त्याच्या उजवीकडे उभा आहे, असे त्याने मला दाखवले. मग परमेश्वर सैतानास म्हणाला, ‘अरे सैताना, परमेश्वर तुला धमकी देवो; यरुशलेम आपलीशी करणारा परमेश्वर तुला धमकी देवो; हा अग्नीतून काढलेले कोलीत नव्हे काय?” (जखऱ्या ३:१-२)
“तेव्हा मी स्वर्गात मोठी वाणी ऐकली; ती म्हणाली; ‘आता आमच्या देवाने सिद्ध केलेले तारण, त्याचे सामर्थ्य व त्याचे राज्य आणि त्याच्या ख्रिस्ताचा अधिकार हे प्रकट झाले आहेत; कारण आमच्या बंधूंना दोष देणारा, आमच्या देवासमोर रात्रंदिवस त्यांच्यावर दोषारोप करणारा, खाली टाकण्यात आला आहे.’ (प्रकटीकरण १२:१०)
सैतानाच्या दोषारोपासमोर, आपण देवाच्या वचनाच्या सत्यामध्ये आशा आणि शक्ती प्राप्त करू शकतो. प्रभू येशूने स्वतः सैतानाकडून दोषाला तोंड दिले; आणि त्याने पवित्र शास्त्राचा संदर्भ देत उत्तर दिले होते आणि देवाचा पुत्र म्हणून त्याच्या ओळखीमध्ये भक्कम असा उभा होता.
३. वाईट करणारा, भीती, शंका आणि खोटे बोलणे
सैतानाचा हल्ला हा आजार आणि रोगांपुरता मर्यादित नाही. जर तुम्ही सत्याविषयी अज्ञानी आहात, तर सैतान तुम्हांला खोटे विकेल. वाईट करणे आणि खोटे बोलणे हे आजार, रोग, मृत्यू, दारिद्र्य, आणि सैतानाचे इतर सर्व हल्ल्यांना दार उघडणारे आहेत.
“तेव्हा परीक्षक त्याच्याजवळ येऊन म्हणाला, ‘तू देवाचा पुत्र आहेस तर ह्या धोंड्याच्या भाकरी व्हाव्यात अशी आज्ञा कर.” (मत्तय. ४:३)
सैतान हा फसवणुकीत माहीर आहे आणि सत्याला विकृत करण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्या मनात शंकेचे बीज पेरतो. देवाच्या वचनाचे नियमितपणे वाचन आणि मनन करून आपण याचा प्रतिकार करू शकतो, जे आपल्या विश्वासासाठी खात्रीशीर आणि भक्कम पाया आहे.
४. वाईट बाण
वाईट बाण हे आध्यात्मिक बाण आहे जे लोकांना मारले जातात एकतर त्यांना मारून टाकावे किंवा त्यांच्या जीवनात वाईट गोष्टींना भरून टाकावे.
“कारण पाहा, दुर्जन धनुष्य वाकवत आहे; सरळ मनाच्यांना अंधारात मारण्यासाठी दोरीला तीर लावत आहेत.” (स्तोत्र. ११:२)
“त्यांनी आपली जीभ तलवारीसारखी पाजळली आहे; सात्विकाला एकांतात मारावे म्हणून त्यांनी तीरासारखा आपल्या कटु शब्दांचा नेम धरला आहे.” (स्तोत्र. ६४:३)
हे वाईट बाण अनेक स्वरूप धारण करू शकतात; उदाहरणार्थ, कटु शब्द. वाईट तीरांचा प्रतिकार करण्याचा एक मार्ग हा देवाची शस्त्रसामग्री धारण करावी जसे इफिस. ६:१०-१७ मध्ये वर्णन केले आहे.
५. आंधळेपणा
जेव्हा तुमची आध्यात्मिक समज स्पष्ट होते, तेव्हा तुम्ही सैतानाच्या शक्तीपासून देवाकडे मुक्त होतात. त्यांचे डोळे उघडण्यासाठी हा एक शक्तिशाली आणि परिवर्तनीय अनुभव होऊ शकतो, जेणेकरून त्यांना अंधारातून प्रकाशाकडे, आणि सैतानाच्या शक्तीपासून देवाकडे वळवावे, म्हणजे त्यांना पापांची क्षमा प्राप्त व्हावी आणि जे माझ्यावरील विश्वासाद्वारे शुद्ध झालेले आहेत त्यांच्यामध्ये त्यांना वारसा मिळावा. (प्रेषित. २६:१८)
“त्यांची म्हणजे विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची मने ह्या युगाच्या दैवताने आंधळी केली आहेत, अशा हेतूने की, देवाची प्रतिमा जो ख्रिस्त त्याच्या गौरवी सुवार्तेचा प्रकाश त्यांच्यावर प्रकाशु नये. (२ करिंथ. ४:४)
६. मृत्यू, निराशा आणि वांझपणा
मृत्यूचा आत्मा वेगवेगळ्या प्रकारे कार्य करू शकतो, कधीकधी लोक घसरून पडतात आणि मरू शकतात आणि इतर वेळी आत्महत्त्या, अपघात, नैसर्गिक आपत्ती, युद्ध इत्यादी., द्वारे तो कार्य करू शकतो. सैतान हा हिरावून घेणे, मारणे, आणि नाश करण्यामागे असतो, आणि या गोष्टींनी तुम्हांला अंधाराच्या कामांना ओळखण्यास मदत केली पाहिजे. (योहान. १०:१०)
७. अपयश आणि दारिद्र्य
दारिद्र्य हे सैतानाच्या हातात एक शक्तिशाली साधन आहे. तो लोकांच्या नशिबाला मर्यादित करण्यासाठी त्याचा वापर करतो. अशा अनेक गोष्टी आहेत जे तुम्ही राज्यासाठी करू शकता जर तुमच्याकडे धन आहे. दारिद्र्याने अनेकांना वेश्याव्यवसाय, लुटमार आणि निराशेमध्ये नेले आहे. ही देवाची इच्छा आहे की तुमच्या सर्व गरजा पूर्ण केल्या जाव्यात.
“माझा देव आपल्या संपत्यनुरूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठायी गौरवाच्या द्वारे पुरवील.” (फिलिप्पै. ४:१९)
८. पाप
पाप हे देवाच्या नियमशास्त्राचे उल्लंघन आहे. जर सैतान तुम्हांला देवाची अवज्ञा करायला प्रेरित करू शकला, तर मग तो विना अडथळा कार्य करू शकतो. देवाची तुम्ही अवज्ञा करणे हे सैतानाला द्वार उघडणे आहे.
“जो कोणी पाप करतो तो स्वैराचार करतो; कारण पाप स्वैराचार आहे.” (१ योहान. ३:४)
अंधाराच्या कामांना आपण कसे नष्ट करावे?
१). विश्वासाच्या शक्तिला सक्रीय करा.
जेव्हा तुम्ही विश्वासाने कार्य करता तेव्हा अशक्यतेला जागा नाही. दुष्टाच्या सर्व अग्निमय तीरांना विझवण्यासाठी विश्वासाची आवश्यकता लागते. सैतानाने काय केलेले आहे याची पर्वा नाही, त्यास उलट करता येऊ शकते जेव्हा तुम्हांला विश्वास आहे. लाजरस हा आजाराने मारला गेला (सैतानाच्या हाताचे काम), परंतु ख्रिस्त आला, आणि वाईटाच्या कामाला पालटले. मनुष्यासाठी, हे अशक्य असे दिसू शकते, परंतु विश्वास ठेवणाऱ्या माणसासाठी, सर्वकाही शक्य आहे. (मार्क. ९:२३)
२). सत्याला सक्रीय करा
आजार, रोग, वाईट करणारा, आंधळेपणा आणि अंधाराच्या इतर पुष्कळ कामांच्या परिणामाला नष्ट करण्यासाठी सत्याची आवश्यकता लागते. सत्य हे शस्त्र आहे, आणि सत्याच्या विरोधात काहीही करू शकत नाही. तुम्ही सत्यासाठी भुकेले असावे अशी मला आवश्यकता आहे. हे काहीतरी आहे जे तुम्ही स्वतःच शोधले पाहिजे. सत्य जे तुम्हांला माहित आहे ते विजय ज्याचा तुम्ही आनंद घ्याल त्यास निश्चित करते. (योहान. ८:३२, ३६)
३). प्रीतीच्या शक्तीला सक्रीय करा.
देव प्रीती आहे, आणि जेव्हा आपण देवाच्या प्रीतीचा वापर करतो, ते एखाद्या परिस्थितीवर देवाच्या प्रीतीला सरळपणे मोकळे करणे आहे. जितके अधिक तुम्ही प्रीतीत चालाल, तितकेच अधिक देवाचे सामर्थ्य परिस्थितीच्या विरोधात कार्य करते. तुम्ही वाईटाने वाईटावर विजय मिळवू शकत नाही; तुम्ही त्यावर फक्त चांगल्यानेच विजय मिळवू शकता. प्रीतीची ही एक शक्तिशाली बाजू आहे; प्रीती ही कमकुवत नाही, परंतु अजूनही प्रीतीच्या शक्तीच्या बाजूकडे अनेकांनी प्रवेश केलेला नाही.
“वाईटाने जिंकला जाऊ नकोस, तर बऱ्याने वाईटाला जिंक.” (रोम. १२:२१)
“जो प्रीती करत नाही तो देवाला ओळखत नाही; कारण देव प्रीती आहे.” (१ योहान. ४:८)
४). अभिषेक प्राप्त करण्यासाठी इच्छुक असा
अभिषेकला काहीही नष्ट करण्यासाठी कठीण नाही (यशया १०:२७). अभिषेक हा आत्मा आणि देवाचे वचन आहे. विश्वासणारे म्हणून, तुम्हांला आधीच तुमच्यात अभिषेक आहे; तुम्हांला केवळ योग्य आदेश आणि कबुली करायची आहे आणि तसेच त्याच्याबरोबर प्रार्थना करा.
५). ख्रिस्तामधील तुमच्या अधिकाराचा वापर करा
आपला अधिकार वापरणे हा कायदेशीर मार्गांमधून एक मार्ग आहे की आपण शत्रूवर उपाय करू शकतो. शत्रूने जे काही केलेले आहे त्याला उलटण्यासाठी आपल्याजवळ ख्रिस्ताचा अधिकार आहे. बांधण्यासाठी आपल्या अधिकाराचा वापर करण्यात आपण अपयशी ठरलो, तर स्वर्गात काहीही केले जाणार नाही. (मत्तय. १५:१३)
येशूच्या येण्याच्या उद्देश हा अंधाराच्या कामांना काढून टाकणे होता आणि त्याने विश्वासणाऱ्यांना ते काम पूर्ण करण्यासाठी शक्ती प्रदान केली. अंधाराच्या कामांना उलट आणि नष्ट करण्यासाठी तुम्ही तयार आहात का? (१ योहान. ३:८). कुरकुर आणि संघर्ष करणे थांबवा. शत्रूच्या शक्तीवर तुमचा अधिकार वापरण्याची ही वेळ आहे. तुमच्या जीवनात गोष्टी चांगल्यासाठी बदलत आहेत हे येशूच्या नावाने मी पाहत आहे.
प्रार्थना
तुमच्या मनापासून येईपर्यंत प्रत्येक प्रार्थना अस्त्र वारंवार म्हणत राहा. केवळ तेव्हाच पुढील प्रार्थना अस्त्राकडे वळा. घाई करू नका.
1.माझ्या आणि माझ्या कुटुंबियांच्या जीवनात अपयश, आजार आणि मत्सरास टाकणाऱ्या प्रत्येक वाईट वेदींना येशूच्या नावाने मी तोडून टाकत आहे. (मीखा ५:११-१२)
2.माझ्या शरीरातील कोणताही सुप्त आजार आणि रोग प्रकट होण्याची वाट पाहत येशूच्या नावाने मी त्यास उपटून टाकत आहे. (यिर्मया १:१०)
3.माझे घर आणि जीवनात लपलेली प्रत्येक वाईट उपस्थिती ती त्यांच्या लपण्याच्या ठिकाणाहून येशूच्या नावाने नष्ट होवो. (स्तोत्र. ६८:१-२)
4.शत्रूने माझ्यावर केलेल्या प्रत्येक हानीला येशूच्या नावाने मी उलटतो. (यशया ५४:१७)
5.प्रत्येक चांगली गोष्ट जी माझ्या नशीबात आहे ती येशूच्या नावाने आता प्रकट होवो. (अनुवाद २८:६)
6.सैतानाने माझ्या विरोधात रचलेल्या प्रत्येक गोष्टीला येशूच्या नावाने मी काढून टाकत आहे. (यशया ५४:१७)
7.माझ्या आणि माझ्या कुटुंबियांच्या विरोधात द्वेषपूर्ण बोलण्याने न्याय करणाऱ्या प्रत्येक बोलण्यास येशूच्या नावाने मी नि:शब्द करत आहे. (यशया ५४:१७)
8.माझ्या आणि माझ्या कुटुंबियांच्या विरोधात पाप आणि दोष लावणाऱ्या प्रत्येक आवाजाला येशूच्या नावाने मी गप्प करत आहे. (प्रकटीकरण १२:१०)
9.मी देवाच्या देवदूतांना मोक्याच्या ठिकाणी पाठवतो, आणि माझ्या आणि माझ्या कुटुंबावरील आशीर्वाद आणि प्रगतीला विरोध करणाऱ्या प्रत्येक सैतानी विरोधाला येशूच्या नावाने त्यांनी नष्ट करावे असा आदेश देतो. (स्तोत्र. ३४:७)
10.माझ्या जीवनाच्या विरोधातील प्रत्येक दुष्ट योजनेला मी उधळून लावतो; सर्व गोष्टी माझ्या चांगल्यासाठी कार्य करावे असे येशूच्या नावाने होऊ दे. (रोम.८:२८)
11.माझ्या नशिबाचा अपव्यय करण्याच्या हेतूने केलेल्या प्रत्येक योजनेला येशूच्या नावाने मी रद्द करतो. (यिर्मया २९:११)
12.माझ्या आणि माझ्या कुटुंबियांच्या विरोधात येणारे वाईट येशूच्या नावाने रद्द केले जावे. (२ थेस्सलनीका. ३:३)
13.माझे जीवन आणि माझ्या प्रतिष्ठेच्या विरोधातील कोणत्याही दुष्ट नोंदी, न्याय करणे आणि दोष लावण्यास येशूच्या नावाने पुसून काढतो. (कलस्सै. २:१४)
14.येशूच्या रक्ताने, माझ्या प्रगतीला विरोध करणारी प्रत्येक शत्रूची शक्ती आणि तत्वे यांवर येशूच्या नावाने मी विजय मिळवतो. (प्रकटीकरण १२:११)
15.माझे गौरव आणि प्रगतीला अडथळा करणारे प्राचीन बालेकिल्ले आणि द्वेषपूर्ण करार यांना येशूच्या नावाने मी नष्ट करतो. (२ करिंथ. १०:४)
16.येशूच्या रक्ताने, वाईट, संकटे, दु:ख आणि नाशापासून येशूच्या नावाने माझ्याभोवती कवच केलेले आहे. (निर्गम. १२:१३)
17.माझे मर्यादित केलेले लाभ आणि आशीर्वादांना येशूच्या नावाने मी मोकळे करत आहे. (यशया. ४५:२-३)
18.पित्या, येशूच्या नावाने माझ्या बाजूने समय आणि हंगामांना पुन्हा आयोजित कर. (दानीएल २:२१)
19.परमेश्वरा, येशूच्या नावाने माझ्या आत्म्याला सुरक्षित कर. (इफिस. ३:१६)
20.मला आणि या उपास कार्यक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येकाला येशूच्या नावाने ज्ञानाचा आत्मा आणि तुला अधिक गहनपणे ओळखण्यासाठी प्रकटीकरण प्रदान कर. (इफिस. १:१७)
Join our WhatsApp Channel
Most Read
● तुम्ही एका उद्देशा साठी जन्मला आहात● दिवस ३६:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● बी बद्दल आश्चर्यकारक सत्य
● दिवस २६:४० दिवसांचा उपवास आणि प्रार्थना
● मृतामधून प्रथम जन्मलेला
● प्रार्थने मध्ये अडथळ्यांवर कशी मात करावी
● चांगल्या मार्गाचा चौकशी करा
टिप्पण्या