डेली मन्ना
परिस्थितीच्या दयेखाली कधीही जाऊ नये
Wednesday, 14th of February 2024
34
24
1165
Categories :
प्रार्थना
याबेस हा आपल्या भाऊबंदांमध्ये फार प्रतिष्ठित होता; त्याच्या आईने त्याचे नांव याबेस असे ठेवून म्हटले की त्यास प्रसवताना मला फार क्लेश झाले. (१ इतिहास ४:९)
मोठे होण्यामध्ये याबेस साठी फार सोपे झाले नसेन.
त्याच्याकडे अनेक समस्या होत्या व त्यांनी पुन्हा पुन्हा त्याच्या नावाच्या कारणामुळे त्याचा अनेक वेळा उपहास केला असेन.
मला विश्वास आहे याबेस हा याकोब द्वारे प्रेरित झाला असेन.
त्याच्याआई-वडिलांनी सुद्धा त्याचे नांव याकोब ठेविले होते, त्याचा अर्थ "फसविणारा". त्याच्या संपूर्ण जीवनभर तोहे लांच्छन घेऊन जगला. परंतु एके दिवशी याकोबाने देवाबरोबर संपूर्ण रात्रभर प्रार्थने मध्ये संघर्ष केला, तेथे त्याच्या जीवनात एक वेगळेच वळण आले. परमेश्वराने स्वतः त्याचे नांव याकोब पासून इस्राएल असे बदलले, त्याचा अर्थ, "देवाबरोबर राजकुमार". त्यादिवसापासून याकोबाचे जीवन वेगळेच झाले. (उत्पत्ति ३२)
याबेस ला कदाचित प्रकटीकरण झाले असेन जर परमेश्वर हे याकोब साठी करू शकतो तर परमेश्वर हे त्याच्यासाठी सुद्धा करू शकतो. कारण परमेश्वर कोणाचा पक्षपात करीत नाही (ईयोब ३४:१९). तुम्हाला व मला हे सत्य आपल्या आत्म्याच्या गहनतेमध्ये आत्मसात करून घ्यायचे आहे.
एके दिवशी याबेस ने ठरविले की आता पुरेसे झाले आहे. एक गोष्ट त्यास स्पष्ट होती, जरत्यास त्याच्या जीवनात कधी काही बदल पाहावयाचा असेल, तर परमेश्वरच केवळ तो बदल घडवून आणू शकतो.
आणि म्हणून याबेस ने इस्राएल च्या परमेश्वराला हाक मारिली (१ इतिहास ४:१०)
- परमेश्वराला हाक मारणे ही प्रार्थना आहे.
- परमेश्वरा बरोबर संगती ही प्रार्थना आहे.
- परमेश्वराबरोबर भेट ही प्रार्थना आहे.
मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन व तुला ठाऊक नाहीत अशा मोठया व गहन गोष्टी तुला सांगेन. (यिर्मया ३३:३)
खरी प्रार्थना तुम्हाला महान व सामर्थ्यशाली गोष्टी प्रगट करेल; गोष्टी ज्याविषयी तुम्ही कधी कल्पना देखील केली नसेल.
याबेसत्याची नवीन वाट प्राप्त करण्यात प्रार्थनेचे महत्त्व समजला आणि म्हणून तुम्ही सुद्धा समजावे.
प्रार्थना ही मानवता व दैवता मधील भेटण्याचे स्थान आहे. जर येथे पुरुष किंवा स्त्री आहे की प्रार्थना करावी, तर मग तेथे परमेश्वर आहे त्याचे उत्तर दयावे. अनेक विजय हे युद्धामध्ये जिंकण्यापेक्षा गुडघ्यावर जिंकले जातात.
ह्यास्तव काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे, असे म्हणत चिंता करीत बसू नका. कारण ही सर्व मिळविण्याची धडपड परराष्ट्रीय लोक करीत असतात, तुम्हाला ह्या सर्वांची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे. तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळविण्यास झटा म्हणजे त्यांच्याबरोबर ह्याही सर्व गोष्टी तुम्हांला मिळतील. (मत्तय ६:३१-३३)
एक पुरुष किंवा एक स्त्री जे परमेश्वराला अति परिश्रमाने शोधतात ते कधीही परिस्थितीच्या दयेखाली असणार नाहीत.
टीप: तुम्ही इतरांना सांगा हे बटन वापरणार काय की जितक्या लोकांना हा दररोज चा मान्ना सांगता येईल तितक्या लोकांना सांगावे म्हणजे ते सुद्धा त्यांच्या जीवनाला नवीन वाट प्राप्त करतील?
प्रार्थना
१. पित्या, येशूच्या नांवात, मी सामर्थ्य प्राप्त करतो की माझ्या जीवनात दररोज तुझे वचन आत्मसात करावे.
२. मी तो आहे जे देवाचे वचन सांगते मी आहे. मी ह्या पृथ्वीवर प्रभु येशूची व्यक्त प्रतिमा आहे. प्रतिदिवशी मी परमेश्वराबरोबरच्या माझ्या संबंधांमध्ये वाढत आहे.
३. पित्या, येशूच्या नांवात, मी प्रार्थना करतो की मी कदाचित तुझ्या परिपूर्णते सह माझ्या सर्व अस्तित्वात भरून जावो. (इफिस ३:१९)
Join our WhatsApp Channel
Most Read
● चमत्कारिकतेमध्ये कार्य करणे: किल्ली #१● प्राचीन इस्राएलच्या घरांकडून शिकवणी
● २१ दिवस उपवासः दिवस १४
● कोणीही आवडता नाही परंतु घनिष्ठ
● तुमच्या सुटकेला कसे राखून ठेवावे
● पूल बनवणे, अडथळे नाहीत
● जीवनाचे पुस्तक
टिप्पण्या