डेली मन्ना
32
20
1071
परमेश्वराची सेवा करण्याचा अर्थ काय आहे-१
Tuesday, 19th of March 2024
Categories :
सेवा करणे
प्रभु येशूने म्हटले, "जर कोणी माझी सेवा करतो तर त्याने मला अनुसरावे म्हणजे जेथे मी आहे तेथे माझा सेवकही असेल; जर कोणी माझी सेवा करतो तर पिता त्याचा मान करील." (योहान १२:२६)
#१ ज्या कोणाला माझी (येशूची)सेवा करावयास पाहिजे"
कोणीही प्रभूची सेवा करू शकतो. याची पर्वा नाही की मग तुम्ही श्रीमंत किंवा गरीब, शिक्षित किंवा अशिक्षित आहात. अनेक वेळेला मला पत्रे किंवा ईमेल येतात हे म्हणत, "पास्टर मी इंग्रजी बोलू शकत नाही, त्यामुळे मी देवाची सेवा करीत नाही." याची पर्वा नाही. तुम्ही परमेश्वराची सेवा करू शकता जरी तुम्हीं इंग्रजी बोलता येत नाही.
जेथेकोठे मी जातो, तेथे मी आज एक समस्या पाहतो, लोकांना सेवा करू घ्यावयास पाहिजे परंतु त्यांना सेवा करावयास नाही पाहिजे.
तथापि, जेव्हा आपण येशूच्या जीवनाकडे पाहतो, यात काहीही शंका नाही की तो एक सेवक होता. त्याने स्वतः म्हटले, "मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्यावयास नाही, तर सेवा करावयास व पुष्कळांच्या खंडणीसाठी आपला प्राण अर्पण करण्यास आला आहे." (मत्तय २०:२८)
ज्या रात्री त्यास पकडण्यात येणार होते, प्रभु येशूने त्याच्या शिष्यांचे पाय धुतले, त्यांना एक शेवटची शिकवण दिली की एकमेकांची सेवा करावी: "जसे मी तुम्हाला केले तसे तुम्हीही करावे म्हणून मी तुम्हांला कित्ता घालून दिला आहे" (योहान १३:१२-१७ पाहा). तर मग, जर येशू हा सर्व काही सेवे विषयी आहे, आणि परमेश्वराला पाहिजे की आपल्याला त्याच्यासारखे करावे, तर मग हे अर्थातच उघड आहे की आपण सुद्धा सेवाकेली पाहिजे.
केवळ लोकांपैंकी काही थोडेसे लोक ते त्यांचे जीवन प्रभु व लोकांची सेवा करण्यात उपयोगात आणतात. प्रभु येशूने म्हटले, "कारण जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो तो त्याला मुकेल आणि जो कोणी माझ्याकरिता व सुवार्तेकरिता आपल्या जिवाला मुकेल तो त्याला वाचवील" (मार्क ८:३५).
#२ ज्या कोणाला माझी सेवा करावयास पाहिजे त्याने माझे अनुकरण केले पाहिजे
ते जे प्रभूच्या मागे चालण्याची वृत्ति ठेवतात त्यांनी येशूचे अनुकरण केले पाहिजे आणि केवळ येशूचे चाहते नाही असले पाहिजे. दुसऱ्या शब्दात, ते येशूचे शिष्य असले पाहिजे. मी लोकांना त्यांचे शिक्षण व ते कसे दिसतात, वगैरे, याआधारावरकधीही कामावर नेमत नाही (अर्थातच हे काही वाईट नाही.). मी नेहमीच पाहतो की तो व्यक्ति हा येशूचा अनुयायी आहे किंवा नाही.
तसेच, जर तुम्हाला खरेच प्रभूची सेवा करावयाची आहे, तर तुम्ही ते व्यक्ति असले पाहिजे जे नियमितपणे देवाचे वचन वाचीत आहेत व अध्ययन करीत आहेत. केवळ असेच लोक प्रभूची प्रभावीपणे सेवा करू शकतात.
प्रत्येक परमेश्वरप्रेरित शास्त्रलेख (देवाचे वचन) सद्बोध, दोष, दाखविणे, सुधारणूक, नीतिशिक्षण ह्यांकरीता उपयोगी आहे, ह्यासाठीकी, देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा. (२ तीमथ्यी ३:१६-१७)
प्रार्थना
पित्या, मला क्षमा कर जसे तुझी सेवा मी केली पाहिजे तशी मी करीत नाही. तुझ्या आत्म्याद्वारे मजमध्ये सेवा करण्याच्या योग्य आचरणास जन्म दे.
पित्या,तुझ्या वचनाने मलातयार कर. तुझे मार्ग मला शिकीव. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel

Most Read
● एक आदर्श व्हा● दिवस ३६:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● कृपे द्वारे तारण पावलो
● दानधर्म करण्याची कृपा-२
● बीज चे सामर्थ्य - २
● अडथळ्यांची भिंत
● धार्मिकतेचे वस्त्र
टिप्पण्या