आपल्या ख्रिस्ती जीवनाच्या प्रवासात, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनावर अवलंबून असताना देवाने आपल्याला दिलेल्या कौशल्याचा वापर करण्याच्या जटील क्षेत्रातून मार्ग काढत असताना आपण नेहमी आपल्या स्वतःला पाहतो. १ करिंथ. १२:४-६ मध्ये प्रेषित पौल जसे आपल्याला स्मरण देतो, “कृपादानाचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी आत्मा एकच आहे; सेवा करण्याचे निरनिराळे प्रकार आहे, तरी प्रभू एकच आहे; आणि कार्याचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी सर्वात सर्व कार्य करणारा देव एकच आहे.”
आपल्या निर्माणकर्त्याने आपल्याला दिलेली कौशल्ये आणि क्षमतेची जोपासना करणे आणि त्यास लागू करणे महत्वाचे असताना, आपण केवळ याच वरदानांवर आपला विश्वास ठेवू नये यासाठी जागरूक असले पाहिजे. नीतिसूत्रे ३:५-६ आपल्याला उपदेश देते, “तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नकोस; तू आपल्या सर्व मार्गांत त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल.”
जेव्हा आपण आपआपल्या क्षेत्रांमध्ये प्रगती करतो आणि उत्कृष्टतेची पातळी गाठतो, तेव्हा आपले यश हे आपल्या स्वतःच्या प्रयत्नांचे परिणाम आहेत किंवा हे आपल्यातील पवित्र आत्म्याचे कार्य आहे हे जास्तकरून आव्हानात्मक होते. आपली कौशल्ये देवाच्या अधीन करण्याची महत्वाची भूमिका ही येथेच येते. ज्याप्रमाणे प्रमुख कुंभार मातीला आकार देतो, त्याप्रमाणेच आपण आपल्या स्वतःला देवाच्या हाताने घडवणे आणि मार्गदर्शन करू द्यावे, हे ओळखून की आपल्या क्षमता ह्या त्याच्या दैवी योजनेत केवळ संसाधने आहेत.
शास्ते ७ मधील गिदोनाची कथा महान कार्य पूर्ण करण्यासाठी कमी महत्वाच्या दिसणाऱ्या संसाधनांचा देव कसा वापर करू शकतो हे आपल्याला एक शक्तिशाली आठवण म्हणून कार्य करते. मिद्यानी लोकांना पराभूत करण्याच्या कठीण कामाचा सामना करत असताना, गिदोनाने सुरुवातीला ३२,००० लोकांची सेना एकवट केली. तथापि, देवाने त्याला ती संख्या केवळ ३०० पर्यंत कमी करण्यास सांगितले, याची खात्री करत की विजयाचे श्रेय मानवी शक्तीऐवजी दैवी मध्यस्थीला दिले जावे.
त्याचप्रमाणे आपण देवाची वाट पाहण्यास आणि कृती करण्यापूर्वी त्याच्या वाणीचे पालन करण्यास शिकले पाहिजे. जसे यशया ४०:३१ आश्वासन देते, “तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील; ते गरुडाप्रमाणे पंखांनी वर उडतील; ते धावतील तरी दमणार नाहीत, चालतील तर थकणार नाहीत.” संयम आणि सावधापणाचा पावित्रा जोपासून, देवाकडून निर्देश मिळवणे, आणि केवळ आपल्या स्वतःच्या समजेवर अवलंबून राहून पतन होण्यास टाळण्यासाठी आपण आपल्या स्वतःला योग्य स्थितीत आणतो.
याशिवाय, हे महत्वाचे आहे हे ओळखणे की आपली कौशल्ये आणि वरदाने ही व्यक्तिगत लाभ किंवा गौरवासाठी नाहीत परंतु त्याऐवजी ख्रिस्ताच्या शरीराच्या उन्नतीसाठी आणि देवाच्या राज्याच्या वाढीसाठी आहेत. जसे १ पेत्र. ४:१० आपल्याला स्मरण देते, “प्रत्येकाला जसे कृपादान मिळाले आहे तसे देवाच्या नानाविध कृपेच्या चांगल्या कारभाऱ्यांप्रमाणे ते एकमेकांच्या कारणी लावा.”
म्हणून, मग देवाच्या आत्म्यावर विसंबून राहणे आणि आपल्या कौशल्यांचा वापर करणे यांच्यामधील नाजूक संतुलन ठेवत मार्ग काढण्याची किल्ली ही नम्र आणि अधीन असलेले हृदय जोपासण्यात आहे. देवाच्या मार्गदर्शनाचा धावा सतत करत राहणे, त्याच्या निर्देशासाठी वाट पाहणे, आणि त्याच्या गौरवासाठी आपल्या क्षमतांचा वापर करण्याने, आपण आपल्या द्वारे देवाच्या अलौकिक सामर्थ्याला कार्य करताना अनुभवू शकतो. जेव्हा आपण असे करतो, तेव्हा आपण फिलिप्पै. ४:१३ला पूर्ण होताना पाहतो, जे घोषणा देते, “मला जो सामर्थ्य देतो त्या ख्रिस्ताकडून मी सर्वकाही करण्यास शक्तिमान आहे.”
प्रार्थना
पित्या, तुझ्या वाणीला ऐकण्यास मला शिकीव. माझा प्रत्येक निर्णय हा तुझ्या आत्म्या द्वारे मार्गदर्शित होवो. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● आदर्श होऊन पुढारीपण करा● चमत्कारीक कार्य करणे: मुख्य बाब #२
● उदारपणाचा सापळा
● आध्यात्मिकदृष्टया तुम्ही योग्य आहात काय?
● सापांना रोखणे
● तुमचा दिवस तुमची व्याख्या देतो
● कृपा दाखविण्याचे व्यवहारिक मार्ग
टिप्पण्या