आपण आपली शृंखला की वातावरण कसे निर्माण करावे जे चमत्कारा साठी उपयुक्त होईल यामध्ये पुढे जात आहोत-ज्यामध्ये पवित्र आत्म्याला स्वतंत्र अधिकार आहे.
देवाची महिमा हे स्वर्गाचे आध्यात्मिक वातावरण आहे ज्याप्रमाणे हवा ही पृथ्वीचे भौतिक वातावरण आहे. एदेन बागे मध्ये देवाने आदाम व हव्वे ला निर्माण केले की देवाच्या महिमेच्या वातावरणात राहावे. तथापि, जेव्हा आदाम व हव्वे ने देवाच्या आदेशाच्या विरोधात जाऊन बंड करण्याची निवड केली, वातावरण ज्यांत ते राहत होते ते पूर्णपणे प्रभावित झाले.
आदामास तो (परमेश्वर) म्हणाला, तूं आपल्या स्त्रीचे ऐकले आणि ज्या झाडाचे फळ खाऊ नको म्हणून मी तुला आज्ञा केली होती त्याचे फळ तूं खाल्ले; म्हणून तुझ्यामुळे भूमीला शाप आला आहे; तूं आयुष्यभर कष्ट करून तीचा उपज खाशील; ती तुला कांटे व कुसळे देईल; तूं शेतांतले पीक खाशील. (उत्पत्ति ३:१७-१८)
आदाम व हव्वा आता देवाच्या महिमेच्या वातावरणापासून वेगळे केले गेले होते (रोम ३:२३). हजारो वर्षानंतर, प्रेषित पौलाने लिहिले की हे त्यासारखे आहे की संपूर्ण सृष्टि आजपर्यंत कण्हत आहे, पापाच्या दास्यातून सोडविण्याची इच्छा करीत आहे, पुनर्स्थापित करण्याची वाट पाहत आहे (रोम ८:२२). आदाम व हव्वे च्या पापामुळे जे विनाशकारक परिणाम झाले आहेत त्याद्वारे संपूर्ण सृष्टि त्या ओझ्याखाली कष्ट भोगीत आहे.
परंतु मी परमेश्वराचा धन्यवाद करतो, की प्रभु येशू ख्रिस्त आपला पुनर्स्थापना करणारा याद्वारे, आपण पुन्हा एकदा महिमेच्या वातावरणात राहण्यास सुरुवात करतो.
१. "जो कोणी स्तुती करतो तो देवाची महिमा करतो." (स्तोत्र ५०:२३)
एक मार्ग की आपण आपल्या भोवती महिमेचे वातावरण निर्माण करू शकतो तो हा आहे की निरंतर परमेश्वराला स्तुती व उपासनेच्या वातावरणाची जीवनशैली ठेवावी. असे करून, आपण ते होऊ ज्यास बायबल म्हणते, "खरे उपासक" (योहान ४:२३). केवळ चांगले गायन करण्याद्वारे जे प्राप्त केले जाऊ शकते त्याहीपलीकडचे हे काहीतरी आहे. खरे उपासक हे ते आहेत ज्यांना प्रामाणिक उपासनेचे प्रकटीकरण झाले होते. आपल्या घरात वैयक्तिकपणे व कौटुंबिकपणे परमेश्वराची नियमित उपासना करा. त्याची स्तुती निरंतर तुमच्या मुखात व अंत:करणात राहो जेव्हा तुम्ही दिवसभराची कार्ये करीत असता.
व्यवहारिक बाबातीच्या बाजूने, मी तुम्हाला प्रोत्साहन देत आहे की तुमच्या घरात निरंतर उपासनेचे सौम्य संगीत चालू ठेवा. हे वातावरणात मग बदल आणेल व त्यामुळे प्रकटीकरण व साक्षीच्या आत्म्याला आमंत्रित करेल. जेव्हा तुम्ही असे सतत करता, तुम्ही लक्षणीय बदल पाहू लागाल.
प्रार्थना
पित्या, तूं कोण आहे याकारणामुळे मी तुझी स्तुति करतो. तूं चांगला व दयाळू पिता आहेस. माझ्या व माझ्या कुटुंबाच्या जीवनात अढळ विश्वासासाठी मी तुझी स्तुति करतो व धन्यवाद देतो
Join our WhatsApp Channel
Most Read
● विसरलेली आज्ञा● हेतुपुरस्सर शोध
● देवाच्या उद्धेशासाठी तुम्ही निश्चित केलेले आहात
● परमेश्वरा सोबत चालणे
● क्षमाहीनता
● पहारेकरी
● देवाच्या वाणीवर विश्वास ठेवण्याचे सामर्थ्य
टिप्पण्या