त्या दिवसांत शिष्यांची संख्या वाढत चालली असतां हेल्लेणी यहूद्यांची इब्री लोकांविरुद्ध कुरकुर सुरु झाली; कारण रोजच्या वाटणीत त्यांच्या विधवांची उपेक्षा होत असे. तेव्हा बारा प्रेषितांनी शिष्यगणाला बोलावून म्हटले, आम्ही देवाचे वचन सांगण्याचे सोडून पंक्तिसेवा करावी हे ठीक नाही. तर बंधुजनहो, तुम्ही आपल्यामधून पवित्र आत्म्याने व ज्ञानाने पूर्ण असे सात प्रतिष्ठित पुरुष शोधून काढा. त्यांना आम्ही ह्या कामावर नेमू; म्हणजे आम्ही स्वतः प्रार्थनेत व वचनाच्या सेवेत तत्पर राहू. (प्रेषित ६:१-४)
प्रारंभीची मंडळी फार वेगाने वाढत होती. जसे कोणत्याही वाढणाऱ्या संस्थेबरोबर, व्यवस्थापकीय समस्या ह्या सोडविण्याची गरज असते. ह्या प्रकरणात, विधवांकडे दुर्लक्ष केले जात होते. तसे, विधवांना अन्न पुरविणे ही चांगली गोष्ट आहे. म्हणून प्रेषित तेच काम करीत राहिले काय? नाही! त्यांना प्रत्यक्षात ठाऊक होते की त्यांना कशासाठी बोलाविले गेले आहे. त्यांना त्यांच्या जीवनातील उद्देश प्रत्यक्ष ठाऊक होता-शुभवर्तमान पसरविणे. त्यांनी त्यांचा वेळ उत्तम गोष्टीसाठी दिला –वचन व प्रार्थना व त्यांची जबाबदारी किंवा त्याऐवजी कोणाची तरी मदत घेतली की जे त्यांच्यासाठी ते करू शकतील.
ह्या निर्णयाचा परिणाम काय झाला? "मग देवाच्या वचनाचा प्रसार होत गेला; यरुशलेमेत शिष्यांची संख्या फार वाढत गेली; याजकवर्गातीलही पुष्कळ लोकांनी ह्या विश्वासाला मान्यता दिली." (प्रेषित ६:७). चांगल्या गोष्टी तुम्हाला उत्तम गोष्टींपासून दूर करीत आहेत काय? लक्षात ठेवा चांगल्या गोष्टी ह्या उत्तम गोष्टींचे शत्रू आहेत.
एका दिव्याच्या घराला प्रत्येक महिन्याला तेलाचा नवीन पुरवठा मिळत होता की दिव्याच्या घरात दिवा सतत पेटत ठेवावा. एके रात्री, एका गरीब स्त्रीने त्यास काही तेल मागितले. ह्या प्रकारात, कोणीतरी किंवा इतर तेलाची विनंती करीत आले. जरी सर्व विनंत्या चांगल्या, व कायदेशीर अशा दिसत होत्या, दिव्याच्या घरच्या रक्षकाने कोणालाही माघारी पाठवून दिले नाही व प्रत्येकाला तेल दिले.
एका संध्याकाळी तेथे फारच थोडे तेल शिल्लक उरले होते व रात्री ते पूर्णपणे संपून गेले होते. त्या रात्री अनेक जहाजे फुटली गेली व अनेक लोक मृत्युमुखी पडले होते. जेव्हा अधिकाऱ्यांनी त्या प्रकरणाचा शोध लावला तेव्हा त्या मनुष्याने क्षमा मागितली, परंतु हे बोलत राहिला, "मी त्या तेला बरोबर चांगले काम केले होते." मुख्य न्यायाधीश ने काय उत्तर दिले हे तुम्हांला ठाऊक आहे काय? तुला तेल हे एका उद्देशासाठी दिले गेले होते-तो प्रकाश सतत जळत ठेवावा. तू चुकला आहेस!
तुमचे पाचारण काय आहे? तुम्ही तुमचे पाचारण पूर्ण करीत आहात काय किंवा तुम्ही काहीतरी करीत आहात केवळ याकारणासाठी की तुम्हाला काहीतरी करावयाचे आहे? ह्या जीवनात तुमचा उद्देश काय आहे-केवळ जगणे? कुत्रे व मांजरी सुद्धा जगत आहेत. खात्रीने येथे मोठा उद्देश असला पाहिजे.
प्रभु येशूने म्हटले, "परंतु थोडक्याच गोष्टींचे, किंबहुना एकाच गोष्टीचे अगत्य आहे; मरीयेने चांगला वाटा निवडून घेतला आहे, तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही." (लूक १०:४२)
प्रार्थना
हे परमेश्वरा एकच गोष्टीची मी तुझ्याकडून इच्छा करतो, ते हे की तूं मला कृपा पुरीव की आयुष्यभर परमेश्वराच्या घरात माझी वस्ती व्हावी; म्हणजे मी परमेश्वराचे मनोहर रूप पाहत राहीन व त्याच्या मंदिरात ध्यान करीन. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● आशीर्वादाचे सामर्थ्य● ते खोटेपण उघड करा
● ख्रिस्ती लोक देवदूतांना आज्ञा देऊ शकतात का?
● दिवस १७ : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे
● वनातील मानसिकतेवर प्रभुत्व करणे
● एका उद्देशाने जन्म घेणे
● उपास कसा करावा?
टिप्पण्या