डेली मन्ना
काही पुढाऱ्यांचे पतन होते याकारणामुळे आपण माघार घेतली पाहिजे काय?
Sunday, 9th of June 2024
17
16
511
Categories :
पुढारी
आणि चला आपण चांगले करण्याचा कंटाळा करू नये, कारण काही वेळानंतर, आपण आशीर्वादाचे पीक प्राप्त करू, जर आपण निराश होत नाही व खचत नाही." (गलती ६:९ टीएलबी)
परमेश्वराने प्रत्येक मनुष्यासमोर निवडीचे सामर्थ्य ठेवले आहे. तसेच, आपण सर्व जण ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर उभे राहणार आहोत व येथे पृथ्वीवर ज्या निवडी आपण केल्या आहेत त्याचा हिशोब शेवटल्या दिवशी देणार आहोत- काही बहाणे नाही, कोणावरही दोष लावणे नाही, प्रत्येक पुरुष व स्त्री त्यांच्या कृत्यांसाठी जबाबदार राहणार आहेत.
जर आपल्याला याची समज आहे, तर त्याकडून प्रभावित होण्यापासून आपण आपल्या स्वतःला वाचवू जेव्हा जो कोणी पदावर असताना त्याचे पतन होते. मत्तय २४:१२ मध्ये प्रभु येशू ख्रिस्ता कडून निश्चित भविष्यवाणी आहे, "आणि अनीति वाढल्यामुळे पुष्कळांची प्रीति थंडावेल."
खऱ्या भविष्यवाण्या जसे मत्तय २४:१२ मध्ये एक आहे याने आपल्याला भविष्यातील घटनांसाठी तयारी करण्यास व्यवस्थित व समर्थ करावे. येणाऱ्या गोष्टींसाठी त्या आपल्याला पूर्वसूचना देणाऱ्या आहेत. लक्षात घ्या, भविष्यवाणी म्हणते, "परमेश्वरा प्रति त्यांच्या प्रीति मध्ये अनेक जण उदासीन होतील. हे शेवटच्या समयाचे एक मुख्य चिन्ह आहे.
प्रीति थंडावण्याचे चिन्ह
१. देवाच्या गोष्टींकडे निष्क्रिय व्यवहार
२. चर्च ला जाण्यास किंवा ख्रिस्ती लोकांसोबत राहण्यास अनिच्छुक अंत:करण
३. तुम्हाला जसे वाटते तसे कार्य करण्याचे निष्काळजी आचरण
४. देवाच्या गोष्टींकडे शंका
५. प्रार्थना, उपास व देवाच्या वचनाचा अभ्यास करण्यास अत्यंत कमी आवेश
६. देवाच्या वचनाप्रती अवज्ञा
उदाहरणार्थ: दान देणे ही देवाकडून आज्ञा आहे (लूक ६:३८). जेव्हा परमेश्वरा प्रति प्रीति थंडावते, तेव्हा दान देण्यास व्यक्तीला कठीण होते. तसेच, एक कारण आहे, की दान देण्यास व्यक्तीला कठीण वाटते कारण इंटरनेट किंवा बातम्यांच्या माध्यमावर तो किंवा ती जे काही वाचतात.
जर तुम्ही दुसऱ्याच्या पापाला तुमच्या आज्ञाधारक होण्यास अडथळा करू देता, तर मग हे "अवज्ञे" कडे नेईल. सर्व गोष्टी ज्या तुम्ही व मी कधी केल्या आहेत त्या सर्व देवाच्या पुस्तकात लिहून ठेवल्या आहेत. त्या दिवशी, पुस्तके ही उघडली जातील, आणि आपली कृत्ये बोलतील व आपला पाठपुरावा करतील. ह्या दोनपैकी एक शब्द हे प्रत्येकाचे नशीब होईल; शब्द हे "निघून जा" किंवा "पुढे कार्यरत राहा".
चला आपण त्या अनेक जणांमध्ये असू नये जे परमेश्वरासाठी जगण्यामध्ये देवा प्रति त्यांचे प्रेम व देवा प्रति त्याच्या कार्यात थंडावले आहेत. लक्षात घ्या तुम्ही परमेश्वराच्या मागे चालत नाही कारण ती गोष्ट करणे हे सर्वात प्रसिद्ध कार्य आहे. तुम्ही ते करीत नाही कारण इतर कोणी ते करीत आहे. भीति किंवा दबावामुळे तुम्ही ती करीत नाही; प्रीति व समज मुळे तुम्ही ते करीत आहात.
अशी वेळ येते की जेव्हा गर्व हा आपल्यात शिरकाव करू शकतो की ज्या व्यक्तीचे पतन झाले आहे त्याच्या तुलनेत आपल्या स्वतःला आध्यात्मिकदृष्टया अधिक श्रेष्ठ मानावे. तथापि, एकच कारण की आपले पतन झाले नाही हे यासाठी नाही की ज्याचे पतन झाले आहे त्याच्यापेक्षा आपण उत्तम आहोत परंतु हे केवळ कृपे मुळे आहे ज्याने आपण स्थिर असे उभे आहोत. ज्यांचे पतन होते त्यांच्यासाठी कळकळीने प्रार्थना करा परंतु त्यांच्या पापामुळे देवा प्रति तुम्हांला उदासीन व कटुत्व मध्ये व त्याच्या नीतिमत्वाच्या कारणामुळे तसे होऊ देऊ नका. (इब्री १२:१५)
प्रार्थना
पित्या, मला कृपा पुरीव की परिश्रमिक व्हावे व तुझ्या कृपेच्या प्रकटीकरणास गमावू नये. माझ्या आत्मिक मनुष्यात्वात जर कोणत्याची कडवटपणाच्या बीज ला मी कार्य करू दिले असेन तर ते उपटून टाक. तुझ्या प्रीतीने मला समर्थ कर. येशूच्या नांवात.
Join our WhatsApp Channel
Most Read
● मार्गहीन प्रवास● रहस्य स्वीकारणे
● ख्रिस्ती लोक डॉक्टर कडे जाऊ शकतात काय?
● साधारण पात्रा द्वारे महान कार्य
● दिवस २६:४० दिवसांचा उपवास आणि प्रार्थना
● मोठया संकटात
● परमेश्वराची महती वर्णा व तुमच्या विश्वासाला प्रेरणा दया
टिप्पण्या