जर लोकांनी वर्णनकरावयाचे म्हटले की तुम्ही काय करता, ते कसे वर्णन करतील? (कृपा करून ह्या प्रश्नाला प्रामाणिकपणे उत्तर दया.)
१. साधारण किंवा सामान्य
२. उत्तम
कोणीतरी म्हटले, "उत्तमताहे अपघाताने नाही" याचा अर्थ काहीतरी उत्तम रीतीने करणे हे कधीही योगायोगाने होत नाही. हे अत्यंत वरील व कर्तव्याच्याही पलीकडे जाणे आहे. हे वैचारिक प्रयत्न करणे आहे.
आणि जो कोणी तुला वेठीस धरून एक कोस नेईल त्याच्याबरोबर दोन कोस जा. (मत्तय ५:४१)
असे होवो की तुमच्या जीवनाचे प्रत्येक कार्य (ते सर्व जे तुम्ही करता) आणि प्रत्येक शब्द जे तुमच्या तोंडावाटे बाहेर येते (ते सर्व जे तुम्ही बोलता), ते आपला प्रभु येशू, जो अभिषिक्त जन, त्याच्या सुंदरतेने भरलेले असावे. आणि तुमची निरंतरस्तुती देव जो पिता त्याच्याकडे आणा कारण ख्रिस्ताने जे तुमच्यासाठी केले आहे. (कलस्सै ३:१७)
लोक जे तुमच्याभोवती आहेत ते तुम्हाला पाहत आहेत. अगदी नेहमी, लोकांनी चार शुभवर्तमान (मत्तय, मार्क, लूक व योहान)वाचण्याअगोदर, ते पाचवे शुभवर्तमान वाचतील-आणि ते तुम्ही आहात (तुमचे जीवन).
यामुळेच बायबल आपल्याला विनंती करते की, "आणि जे काहीं तुम्ही करता ते माणसांसाठी म्हणून करू नका तर प्रभूसाठी म्हणून जिवेभावे करा. प्रभूपासून वतनरूप प्रतिफळ तुम्हांला मिळेल हे तुम्हांला माहीत आहे. प्रभु ख्रिस्ताची चाकरी करीत जा." (कलस्सै ३:२३-२४)
तुम्ही जे करीत आहात त्यामध्ये जेव्हा तुम्ही उत्तम आहात, ते परमेश्वराला गौरव व आदर आणेल. लोकांना हे जाणावयाचे असेल की असे उत्तम काम तुम्ही कसे करता. मग तुम्ही तुमची साक्ष सांगू शकता हे म्हणून की हे परमेश्वरामुळे होत आहे.
अशा वेळेस लोक ऐकतील की तुम्हाला काय बोलावयाचे आहे.
संदेष्टा दानीएल च्या जीवनाकडे पाहा. जरी तो त्याच्या घरापासून फार दूर होता; त्याच्याप्रियजनांपासून फार दूर, त्याने याची खात्री केली की त्यात उत्तम ते करावे जे करण्यासाठी त्याला बोलाविले गेले आहे.बायबल म्हणते, "दानीएल ने स्वतःला सर्व व्यवस्थापकांमध्ये वेगळे असे केले .....त्याच्या उत्तम गुणाच्या कारणामुळे"... इतकेकी"ते त्याच्या मध्ये काहीही भ्रष्टाचार शोधू शकत नव्हते कारण तो विश्वसनीय ना ही भ्रष्ट ना ही दुर्लक्ष करणारा होता" (दानीएल ६:३-४).
उत्तमता याचा आवश्यकपणे हा अर्थ नाही की चुकांची अनुपस्थिती आहे परंतु निश्चितच याचा अर्थ तुमच्या चुकांकडून शिकणे व त्या टाळणे होय.
कदाचित तुम्हाला उपासने मध्ये नेतृत्व करण्यास किंवा संदेश देण्यास बोलाविले असेन, चांगलेतयार करा. यास किंवा त्यास दोष देऊ नका. उत्तमते साठी समर्पण हे ना ही प्रसिद्ध ना ही सोपे आहे.
अनेक लोक मला लिहितात की त्यांच्यासाठी प्रार्थना करावी व शोधावे की त्यांचे पाचारण काय आहे. काहीसूक्ष्मसुचना सुद्धा देतात: "मी प्रेषित आहे काय किंवा संदेष्टा आहे काय किंवा ....."
अशा लोकांना मी म्हणेन, "जे काही तुमच्या हाती करण्यासाठी आहे, ते सर्व तुमच्या सामर्थ्याने करा" (उपदेशक ९:१०).
दुसऱ्या शब्दात,उत्तम ते कार्य त्यात करा जे काही तुम्हाला सोपविले आहे. गलथान राहू नका. तशा प्रकारे तुम्ही देवा प्रती व तुमच्या सभोवतालच्या लोकांप्रती तुमची विश्वसनीयता सिद्ध करता.
एका महान मनुष्याने एकदा म्हटले, "एक साधारण व्यक्ति त्यांची शक्ती व योग्यता २५ percent त्यांच्या कार्यात उपयोगात आणतो. जग त्यास सलाम करतात जे त्यांची ५० percent पेक्षा जास्त उपयोगात आणतात आणि त्या थोडया लोकांसाठी डोक्यावर उभे राहतात जे आत्म्या मध्ये कार्य करतात जे १०० percent उपयोगात आणतात.
प्रतिदिवशी, याची खात्री करा की परमेश्वराला विचारावे की तुम्हाला साहाय्य करावे की उत्तमतेमध्ये चालावे म्हणजे तुम्ही ख्रिस्ताचा सुगंध व्हाल जेथे कोठे तुम्ही जाल.
प्रार्थना
१. पित्या, येशूच्या नांवात, विश्वास, बोलणे व ज्ञाना मध्ये मला उत्तम असे होऊ दे. (२ करिंथ ८:७)
२. पित्या, येशूच्या नांवात, मी विचारतो मग मी खातो किंवा पितो, किंवा जे काही मी करू, मी ते सर्व काही तुझ्या गौरवाकरिता करावे हे परमेश्वरा. (१ करिंथ १०:३१)
Join our WhatsApp Channel
Most Read
● दिवस ३०:४० दिवसांचा उपवास आणि प्रार्थना● अत्यंत थकून गेल्याची व्याख्या करणे
● तुमची मनोवृत्ती तुमची उंची ठरवते
● अन्य येशू, निराळा आत्मा आणि निराळी सुवार्ता-२
● प्रारंभीच्या अवस्थेत परमेश्वराचीस्तुति करा
● सापडलेल्या मेंढराचा आनंद
● तुमचा संघर्ष तुमची ओळख होऊ देऊ नका -१
टिप्पण्या