डेली मन्ना
परमेश्वर पुरवठा कसा करतो # 4
Monday, 16th of September 2024
21
17
244
Categories :
पुरवठा
4. परमेश्वर तुमच्या शत्रूच्या द्वारे पुरवठा करतो
तेथे एक विधवा होती ती देवाकडे तिच्या मागणी मध्ये फार स्पष्ट होती. प्रतिदिवशी ती मोठयाने तिच्या गरजांसाठी देवाकडे प्रार्थना करीत असे. तथापि, हे सर्व तिच्या शेजाऱ्यासाठी योग्य झाले नाही जो पूर्णपणे नास्तिक होता. तो ह्या स्त्रीच्या मोठयाने प्रार्थना करण्याद्वारेअस्वस्थ होता.
एके दिवशी, ही स्त्री, नेहमीप्रमाणे, तिच्यागरजांसाठी मोठयाने प्रार्थना करीत होती. ह्या वेळेला, देव जसे नेहमी उत्तर देत होता तसे करण्यात दिसत नव्हता. म्हणून ती स्त्री तिच्या मागणी मध्ये अधिक तीव्र झाली. ह्यामुळे त्या नास्तिकला अधिकच राग आला आणि त्याने तिला धडा शिकविण्याचा विचार केला हे सिद्ध करण्याचाकी येथे देव नाही आहे.
तो सुपरमार्केट मध्ये गेला आणि त्याने जवळजवळ दोन पोती धान्य आणि इतर घरगुती सामान आणले. गुपचूप, तोघरामागील ठिकाणाहून वर चढला आणि त्याने स्वयंपाक घरात ते सामानाने भरलेले पोते टाकले.
आवाजाने स्त्री जागरूक झाली आणि तिने प्रार्थना करणे थांबविले हे पाहण्यात कि तिच्या प्रार्थनेचे उत्तर हे मिळाले आहे. परमेश्वराला ती मनापासून धन्यवाद देऊ लागली आणि मग दरवाजाची घंटी वाजली- हा तो नास्तिक होता. त्याने तिची निंदा करीत म्हटले, "येथे देव नाही आहे, ते मी केले आहे." स्त्री स्तब्ध झाली. तरीसुद्धा, तीपुन्हा प्रार्थनेसाठी गेली आणि नेहमीप्रमाणे तिने मोठयाने प्रार्थनेत म्हटले, "तुझ्या पुरवठयासाठी परमेश्वरा मी तुला धन्यवाद देते आणि तू सैतानाचा सुद्धा उपयोग केला की ते माझ्याकडे आणावे." ही घटना चेष्टा वाटू शकते परंतु त्यामध्ये काहीतरी सत्य आहे.
मनुष्याचे मार्ग परमेश्वराला आवडले म्हणजे तो त्याच्या शत्रूसही त्याच्याशी समेट करावयास लावितो. (नीतिसूत्रे 16:7)
मनुष्याचे मार्ग जेव्हा परमेश्वराला प्रसन्न करतात, तो त्यांच्या छळणाऱ्यास त्यांचे प्रशंसक करतो.
परमेश्वर त्याचा संदेष्टा एलीया ला हा आदेश देतो हे बोलत, " त्या ओहळाचे पाणी तुला प्यावयास मिळेल आणि मी कावळ्यास आज्ञा केली आहे, ते तुला अन्न पुरवितील.
परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे करून तो यार्देनेसमोरच्या करिंथओहळानजीक जाऊन राहिला. कावळे त्यास भाकरी व मांस सकाळसंध्याकाळ आणून देत, व त्या ओहळाचे पाणी तो पिई." (1 राजे 17:4-6)
मी जेव्हा लहान होतो, मला आठवते एक स्थानिक मासे विक्रेता आमच्या घराबाहेर येत असे. ज्या क्षणी तो मासा बाहेर काढत असे, त्याच्या सभोवती कावळे हे गोळा होत असे! थोडीसुद्धा संधी मिळाली, ते झडप मारीत आणि काही मासे पकडून उडून जात एक सुंदर भोजनासाठी!
हे अशा पक्षा द्वारे ज्याचा स्वभाव हा नेहमीच घेणे आणि चोरणे आहे ज्यास देवाने एलीया, त्याच्या संदेष्ट्याला पुरविले. जर देव एलीया संदेष्ट्यासाठी हे करू शकतो, तर मग देव तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी सुद्धा ते करू शकेल.
देव पक्षपाती नाही (प्रेषित 10:34). देव पक्षपात करीत नाही. (रोम 2:11) जे त्याने संदेष्टा एलीया साठी केले, तो ते तुमच्या आणि माझ्यासाठी सुद्धा करेल.
अंगीकार
येशूच्या नांवात माझ्या हाताचे काम हे संपन्न होईल आणि परमेश्वराला गौरव आणेल.
येशूच्या नांवात परमेश्वर माझ्या शत्रूंचा वापर करेल की मला आशीर्वादित करावे.
(आपणा सर्वांना नम्र विनंती आहे की कृपया हा दैनिक मन्ना जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. देवाचा संदेश पसरू द्या)
येशूच्या नांवात परमेश्वर माझ्या शत्रूंचा वापर करेल की मला आशीर्वादित करावे.
(आपणा सर्वांना नम्र विनंती आहे की कृपया हा दैनिक मन्ना जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. देवाचा संदेश पसरू द्या)
Join our WhatsApp Channel
Most Read
● तुमचा गुरु कोण आहे- II● स्वप्न पाहण्याचे धाडस करा
● लैंगिक परीक्षेवर वर्चस्व कसे मिळवावे
● येशूचे नांव
● येशू द्राक्षारस (आंब) प्याला
● धैर्यवान राहा
● भविष्यात्मक मध्यस्थी काय आहे?
टिप्पण्या