इकडे अकरा शिष्य गालीलात जो डोंगर येशूने सांगून ठेविला होता त्यावर गेले; आणि त्यांनी त्याला तेथे पाहून नमन केले, तरी कित्येकांस संशय वाटला. तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे; तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा; त्यांस पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नांवाने बाप्तिस्मा दया; जे काही मी तुम्हांला आज्ञापिले ते सर्व त्यांस पाळावयास शिकवा; आणि पाहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे. (मत्तय 28:16-20)
मत्तयकृत शुभवर्तमान मध्ये येशूचा त्याच्या शिष्यांना त्याचा पृथ्वीवरील शेवटचा संदेश ही महान आज्ञा आहे. जेव्हा आपण परमेश्वराला आज सुद्धा त्याच्या मार्गदर्शनासाठी धन्यवाद देतो, हो तो मुख्य संदेश आहे जो त्यास पाहिजे की त्याच्या शिष्यानी आठवणीत ठेवावा जेव्हा तो जात असताना दिलेला आदेश आहे.
शिष्य म्हणजे काय?
एकव्यक्ति जो येशूच्या मागे चालण्यात शिस्तबद्ध आहे, येशू द्वारे बदलला आहे आणि तो येशूच्या वचनासाठी समर्पित आहे (मत्तय 4:19).
शिष्य-बनविणे म्हणजे काय?
शिष्य-बनविणे म्हणजे आध्यात्मिक संबंधात प्रवेश करणे की लोकांना साहाय्य करावेकी येशूवर विश्वास ठेवावा आणि त्याच्यामागे चालावे (मत्तय28:18-20). व्यक्तिगत लक्ष देणे आणि ख्रिस्ती मार्गदर्शन देण्याद्वारे मुख्यतः हे आध्यात्मिक पोषण करणे आहे. शिष्य-बनविणे म्हणजे लोकांबरोबर मिसळणे आहे. तुम्ही केवळ एक उपासनेला भेट देत नाहीत आणि उपासना संपल्याबरोबर गायब व्हावे. करुणा सदन येथे जे-12 पुढारीचाहा आधार आहे.
आज, चर्च मध्ये अनेक नवीन पुढाकार घेण्यात येतात आणि यात काहीही चूक नाही. तथापि, सत्य हे आहे की शिष्य बनविण्यात चूक करणे आणि शिष्य होण्यात चूक करणे हे पायाभूत स्तरावर अपयश आहे.
कारण# 1:
अधिकतर ख्रिस्ती लोक शिष्य का बनवीत नाहीत?
हे ह्या कारणासाठी की त्यांना स्वतःला कधी शिष्य असे बनविले गेले नाही.
कारण# 2:
अधिकतर ख्रिस्ती लोक शिष्य का बनवीत नाहीत?
हे ह्या कारणासाठी की शिष्य-बनविण्यासाठी तुमच्या आरामदायक क्षेत्रातून तुम्हाला निघायचे आहे; त्या मध्ये कार्य करावयाचे आहे.
देवाला पाहिजे की आपल्याला जीवनाच्या चांगल्या गोष्टी मिळाव्यात. तथापि, जेव्हा ख्रिस्ताच्या आदेशाबद्दल टाळाटाळ केली जाते, तेव्हा आराम हे मूर्ती होऊन जाते. जीवनाच्या आरामदायकपणाने ख्रिस्ती मिशन ला आळशी नाही केले पाहिजे.
जर कारण हे की ख्रिस्ती व्यक्ति शिष्य बनवीत नाही कारण ते इतर मिशन-व्यतिरिक्त कार्यांत इतके व्यस्त आहेत, तेव्हा मग प्रभूला तेसावकाश हा संदेश देत आहेत कीत्याच्या मिशन पेक्षा 'त्यांच्या गोष्टी' ह्या त्यांना अधिक महत्वाच्या आहेत.
चांगल्या शोमरोनी ची प्रीति त्यास त्या रस्त्याच्या कडेला जखमी अवस्थेत पडलेल्या मनुष्याला मदत करण्यास आणि ते कृतीत आणण्यास प्रेरित करते (लूक 10:33-34). जर तुम्ही प्रभूवरप्रीति करता तर तुम्ही त्याच्या लोकांवर प्रीति करालआणि हे तुम्हाला त्यांस देवाच्या मार्गात साहाय्य करण्यास व मार्गदर्शन करण्यात प्रेरित करेल.
मला तुम्हाला एका प्रश्नावर विचार करावयास लावायचा आहे.
तर मग काय होईल जर प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ति शिष्य बनविणे हे त्याचे बंधनकारक कर्तव्य आहे असे समजेल आणि मग काही लोकांना शिष्य बनवेल? मी तुम्हाला सांगतो,आठवड्याच्या आत तेथे एक संजीवन निर्माण होईल.
प्रार्थना
प्रभु येशू, मलातसे जीवन जगण्यास साहाय्य कर जे तुझ्या कृपेस प्रकट करते.
पित्या, मला तुझी कृपा आणि सामर्थ्य दे की शिष्य बनवावे. येशूच्या नांवात. आमेन.
पित्या, मला तुझी कृपा आणि सामर्थ्य दे की शिष्य बनवावे. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● दुर्मिळ गोष्ट जी आज मिळते● खोटे बोलणे सोडणे आणि सत्य स्वीकारणे
● सापडलेल्या मेंढराचा आनंद
● रागाची समस्या
● देवाने-दिलेले स्वप्न
● दिवस ३८ :४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● विश्वासाचे सामर्थ्य
टिप्पण्या