हे ऐकून एलीया जीव घेऊन पळाला; तो यहूदांतील बैर-शेबा येथे आला व तेथे त्याने आपल्या चाकरांस ठेविले; तो स्वतः रानात एक दिवसांची मजल चालून जाऊन एका रतामाच्या झुडूपाखाली जाऊन बसला; आपला प्राण जाईल तर बरे असे वाटून तो म्हणाला, हे परमेश्वरा, आता पुरे झाले, माझा अंत कर; मी आपल्या वाडवडिलांहून काही चांगला नाही. तो रतामाच्या झुडूपाखाली पडून झोपी गेला; तेव्हा एका देवदूताने त्यास स्पर्श करून म्हटले, "ऊठ, हे खा." (१ राजे १९: ३-५)
जर तुम्ही विचार केला, की तुम्हीच केवळ एक व्यक्ति आहात की तुम्हालाच तुमच्या भावना नियंत्रित करण्यास कठीण जात आहे, तर येथे तुमच्यासाठी आशा आहे.
बायबल वर्णन करते की एलीया आपल्या सारख्या स्वभावाचा माणूस होता (याकोब ५: ७). एका क्षणी, त्याने स्वर्गातून अग्नी मागविला आणि बालाचे ४५० संदेष्ट्ये जिवंत मारले होते, आणि दुसऱ्याच क्षणी तो भीतीने पळत होता आणि मृत्यूची याचना करीत होता. त्याचे भावनात्मक जीवन एका चलबिचल जीवनास प्रतिनिधित करते.
सत्य हे आहे की आपण जसे आहोत तसेच परमेश्वर आपल्यावरप्रीति करतोपरंतु तो इतका प्रीति करतोकी आपण जसे आहोत तसेच राहू देत नाही.
परमेश्वराने दूत पाठविला, ज्याने एलीयास खा आणि पी असे म्हटले कारण प्रवासासाठी बळ पाप्त करावे. संजीवित झाल्यानंतर, एलीया रानामध्ये 40 दिवसांच्या प्रवासासाठी समर्थ झाला, जेथे देवाने त्यास एका 'हळुवार बोलण्याने' प्रोत्साहन दिले होते. (१ राजे १९: १२)
येथे काही व्यवहारिक मार्ग आहेत ज्याद्वारे आपण भावनांवर विजय मिळवू शकतो.
1. ताबडतोब प्रतिक्रिया देऊ नका
भावनात्मक विषयांवर ताबडतोब प्रतिक्रिया देणे ही शाश्वत चूक होऊ शकते ज्यासाठी तुम्हाला नंतर खेद होणार असतो.
2. आध्यात्मिक गोष्टींवर लक्ष लावा.
पवित्र शास्त्र आपल्याला सांगते की, 'वरील गोष्टीकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टींकडे लाऊ नका." (कलस्सै ३: २). जर तुमचे मन केवळ शारीरिक गोष्टींवर, तुमच्या गरजा, तुमच्या इच्छा आणि तुमचा कमकुवतपणा यावरच केवळ केंद्रित असेल, तर शत्रू तुमची परीक्षा घेऊ शकतो आणि बऱ्याच काळासाठी तुम्हांला भावनात्मक चंचल स्वभावात तुम्हाला बांधून ठेवू शकतो.
योहान ८: ३१-३२ मध्ये प्रभु येशूने म्हटले आहे, जेव्हा आपण त्याच्या वचनात राहतो, आपल्याला सत्य ठाऊक आहे, आणि सत्य आपल्याला मुक्त करते. जेव्हा आपण देवाच्या वचनाचा अभ्यास करणे आणि आपल्या जीवनाला लागू करण्यास थांबतो, आपण शत्रूच्या वाणी कडे अधिकलक्ष देण्यास सुरु करतो- त्याचा दोष, तिरस्कार आणि कधीही आपण चांगले नाही असे वाटू लागणे. ह्यामुळेच आपले भावनात्मक स्वास्थ्य खराब होऊ लागते.
सर्वात प्रथम प्राधान्य दया की प्रतिदिवशी देवाचे वचन वाचणे, आणि त्याविषयी विचार करण्यात अधिक वेळ दयाल, त्याच्या आश्वासनावर दावा कराल जेव्हा तुम्ही पवित्र आत्म्याला तुम्हांमध्ये कार्य करू दयाल. जेव्हातुम्ही असे करता, परमेश्वराचा आनंद तुमचे मन आणि आत्म्यावर पकड करू लागेल (नहेम्या ८: १०). हा आनंद तुम्हाला शक्तिशाली करेल आणि मग तो तुम्हाला भावनात्मकरित्या बहकवून जाऊ देणार नाही.
3. नियमितपणे चर्चला जा
संदेशा मधील केवळ एकच वचन तुम्हांला लाटांवर वर्चस्व मिळवून देईल.
मी तुम्हाला प्रोत्साहन देत आहे की असे नियमित करीत राहा. तुम्ही लगेच फरक पाहणार नाही परंतु तसे करीत राहा, आणि तुम्ही ते नक्कीच पाहाल.
अंगीकार
येशूच्या नांवात, जसे वचन बोलते मी प्रीति मध्ये प्रत्युत्तर देईन. मी त्यांना मला प्रभावित करू देणार नाही. परमेश्वर माझा साहाय्यक आहे.
Join our WhatsApp Channel
Most Read
● दिवस ३६:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना● तणावाला नियंत्रणात ठेवण्याचे ३ सामर्थ्यशाली मार्ग
● माझ्या दिव्याला पेटव परमेश्वरा
● येशूचे रक्त लावणे
● चांगले आर्थिक व्यवस्थापन
● संपन्नतेसाठी विसरलेली किल्ली
● देवाच्या चेतावणी कडे दुर्लक्ष करू नका
टिप्पण्या