english हिंदी తెలుగు മലയാളം தமிழ் ಕನ್ನಡ Contact us आमच्याशी संपर्क साधा स्पॉटिफाय वर ऐका स्पॉटिफाय वर ऐका Download on the App StoreIOS अँप डाउनलोड करा Get it on Google Play अँड्रॉइड अँप डाउनलोड करा
 
लॉग इन
ऑनलाइन देणगी
लॉग इन
  • होम
  • कार्यक्रम
  • थेट प्रसारण
  • टी.वी.
  • नोहाट्यूब
  • स्तुती
  • बातमी
  • डेली मन्ना
  • प्रार्थना
  • अंगीकार
  • स्वप्ने
  • ई पुस्तके
  • भाष्य
  • श्रद्धांजली
  • ओएसिस
  1. होम
  2. डेली मन्ना
  3. रहस्य स्वीकारणे
डेली मन्ना

रहस्य स्वीकारणे

Thursday, 6th of March 2025
22 16 239
Categories : परमेश्वराची उपस्थिती प्रार्थना
राज आणि प्रिया मोठ्या आर्थिक संकटाला तोंड देत होते. एका रात्री, जेव्हा त्यांची मुले झोपलेली होती, देवाचे साहाय्य मागण्यासाठी ते त्यांच्या सोफ्यावर बसले. अचानकपणे, त्यांनी हे म्हणताना ही वाणी ऐकली, “जर तुम्हांला मदत हवी असेल, तर ९-१-१” ला फोन करा.

 आश्चर्यचकितपणे, त्यांनी एकमेकांकडे पाहिले.
ती वाणी एका कोपऱ्यातून येताना दिसत होती जेथे त्यांच्या मुलाची खेळणी ठेवलेली होती. ते तेथे गेले, त्यांनी बत्ती लावली आणि त्यांच्या मुलाच्या खेळणीची रुग्णवाहिका रस्त्याच्या मध्ये पडलेल्यावाचून सर्वकाही सामान्य आहे असे पाहिले. जेव्हा त्याने त्यावरील बटन दाबले, ते म्हणाले, “जर तुम्हांला मदत हवी असेल, तर ९-१-१” ला फोन करा. ती खेळणी स्वतःहूनच कशी चालू लागली हे पाहून ते आश्चर्यात होते. “जर तुम्हांला मदत हवी असेल, तर ९-१-१-स्तोत्र. ९१:१” ला फोन करा असे पवित्र आत्मा राजला सांगत आहे असे वाटले. त्यांनी बायबलमधील वचन वाचले, “जो परात्पराच्या गुप्त स्थळी वसतो, तो सर्वसमर्थाच्या सावलीत राहील.”

राज आणि प्रियाला वाटले की हा देवाचा मार्ग होता जो त्यांना हे दाखवत होता की त्यांनी त्याच्याबरोबरच्या त्यांच्या सहभागीतेवर अधिक लक्ष केंद्रित करावे, “गुप्त स्थान” जेथे ते सर्वशक्तिमानच्या उपस्थितीत राहू शकतात. त्यांनी विश्वास ठेवला की देव त्यांच्या आर्थिक समस्यावर उपाय करण्यास त्यांना मार्गदर्शन करेल  जेव्हा त्यांनी त्यांच्या स्वतःला त्याच्याबरोबरच्या घनिष्ठ सहभागितेवर लक्ष केंद्रित केले.

मी खरेच विश्वास ठेवतो की जेव्हा आपण सर्वोच्च परमेश्वराच्या ‘गुप्त स्थानावर’ लक्ष केंद्रित करतो, तेव्हा पृथ्वीवर स्वर्गातून शक्तिशाली गोष्टी घडतात.

नरक आणि त्याची भूते आपल्याला देवाच्या घनिष्ठतेत असण्याच्या आनंदापासून गोंधळात टाकतात आणि अडथळा निर्माण करतात. आजचे जग अशा प्रकारे रचलेले आहे जे ‘गुप्त स्थानापासून’ आपला वेळ आणि शक्ती काढून घेते. नेहमी, चर्च त्याच्या संतांना कार्यक्रमांनी व्यस्त ठेवण्यासाठी बराच प्रयत्न करते. विश्वासणारा ज्याचे ‘गुप्त जीवन’ हे इतके प्रेरणादायक आहे आणि उत्साहवर्धक असे आहे की जे इतरांनाही असे करण्यास प्रोत्साहित करते.

पुष्कळ विश्वासणाऱ्यांना ठाऊक आहे की ‘गुप्त स्थानात” वेळ घालवणे हे ख्रिस्ती जीवनासाठी एक प्रमुख किल्ली आहे, परंतु दररोज तसे करण्यासाठी त्यांना अवघड वाटते. तुम्ही तुमच्या ख्रिस्ती जीवनात तुमच्या सामर्थ्याइतपत चालत नाहीत आणि सतत अडखळलेले दिसता असे वाटणे हे कशाप्रमाणे आहे हे मी समजतो.

 कधीकधी, जेव्हा आपण थकलेलो आहोत, तेव्हा आपण त्या गोष्टींकडे वळतो, जसे टेलीव्हिजन लावतो, रात्रीच्या क्लबला किंवा संगीत मैफिलीला जातो की बरे वाटावे. आपल्याला वाटते की अशी कृत्ये आपल्याला ताजेतवाने करतील, परंतु ते आपल्याला आपण पुन्हा रिकामी आहोत असेच सामान्यपणे आभास करवून देते. खोलवर, आपण हे जाणतो की, शांतपणे बसणे, देवाचे वचन ऐकणे आणि देवाच्या उपस्थितीत राहण्यापासून जी शक्ती आपल्याला मिळते ते ही अडथळे आपल्याला देऊ शकत नाहीत. हे येथेच खरी शक्ती आणि पूर्णता आढळते.

“३ त्याने दिवसाच्या सुमारे तिसऱ्या प्रहरी दृष्टांतात असे स्पष्टपणे पाहिले की, आपणाकडे देवाचा दूत येत असून ‘कर्नेल्या, अशी आपणास हाक मारत आहे. ४ तेव्हा तो त्याच्याकडे निरखून पाहून भयभीत होऊन म्हणाला, ‘काय महाराज?’ त्याने त्याला म्हटले, ‘तुझ्या प्रार्थना व तुझे दानधर्म देवासमोर स्मरणार्थ आले आहेत.” (प्रेषित. १०:३-४)

या भेटीनंतर कर्नेल्याच्या जीवनापासून जो फलदायीपणा उत्पन्न झाला तो आश्चर्यकारक होता. तो केवळ वैयक्तिक आशीर्वाद नव्हता; ती एक दैवी रणनीती होती, एक तरंग उमटण्याचा प्रभाव जो त्याच्या घराण्याव्यतिरिक्त जगभरातील राष्ट्रांपर्यंत पोहचेल. तसेच तुम्हांला देखील घडू शकते. ‘गुप्त स्थळी” वेळ घालवणे हे गुप्तच आहे!

Bible Reading: Deuteronomy 15-17
प्रार्थना
स्वर्गीय पित्या, मला तुझ्या हृदयाजवळ आकर्षित कर. मला तुझ्या गुप्त स्थळी निवास करू दे आणि येशूच्या नावाने तुझ्या संरक्षणात्मक सावलीखाली मला शांती प्राप्त करू दे. (स्तोत्र. ९१:१)

परमेश्वरा, माझ्या जीवनाच्या प्रत्येक पैलूंमध्ये, येशूच्या नावाने मी तुला माझा कायम आश्रय आणि अटळ किल्ला असे घोषित करतो. (स्तोत्र. ९१:२)

Join our WhatsApp Channel


Most Read
● शांती हा आपला वारसा आहे
● परमेश्वर पुरवठा कसा करतो # 3
● तुमच्या भविष्यासाठी देवाची कृपा आणि उद्देश स्वीकारणे
● दिवस २३ :४० दिवसांचा उपास आणि प्रार्थनेचे
● अडथळ्यांची भिंत
● कामाच्या ठिकाणी एक हिरो-१
● दिवस ०१: ४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
टिप्पण्या
संपर्क
फ़ोन: +91 8356956746
+91 9137395828
व्हाट्स एप: +91 8356956746
ईमेल: [email protected]
पता :
10/15, First Floor, Behind St. Roque Grotto, Kolivery Village, Kalina, Santacruz East, Mumbai, Maharashtra, 400098
आमच्या सामाजिक नेटवर्कवर सामील व्हा!
Download on the App Store
Get it on Google Play
मेलिंग यादीमध्ये सामील व्हा
अन्वेषण
कार्यक्रम
थेट प्रसारण
नोहाट्यूब
टी.वी.
देणगी
डेली मन्ना
स्तुती
अंगीकार
स्वप्ने
संपर्क
© 2025 Karuna Sadan, India.
➤
लॉग इन
कृपया या साईट वर टिपणी आणि कंमेंट करण्यासाठी आपल्या NOAH खात्यावर प्रवेश करा |
लॉग इन