english हिंदी తెలుగు മലയാളം தமிழ் ಕನ್ನಡ Contact us आमच्याशी संपर्क साधा स्पॉटिफाय वर ऐका स्पॉटिफाय वर ऐका Download on the App StoreIOS अँप डाउनलोड करा Get it on Google Play अँड्रॉइड अँप डाउनलोड करा
 
लॉग इन
ऑनलाइन देणगी
लॉग इन
  • होम
  • कार्यक्रम
  • थेट प्रसारण
  • टी.वी.
  • नोहाट्यूब
  • स्तुती
  • बातमी
  • डेली मन्ना
  • प्रार्थना
  • अंगीकार
  • स्वप्ने
  • ई पुस्तके
  • भाष्य
  • श्रद्धांजली
  • ओएसिस
  1. होम
  2. डेली मन्ना
  3. ते लहान तारणारे आहेत
डेली मन्ना

ते लहान तारणारे आहेत

Wednesday, 12th of March 2025
13 15 229
Categories : एस्तेरचे रहस्य: मालिका पाल्य
"एसावाच्या पहाडाचा न्याय करावयाला उद्धारकर्ते सीयोन डोंगरावर येतील आणि राज्य परमेश्वराचे होईल." (ओबद्या १:२१)

बहुतेक लोक विचार करतात त्याप्रमाणे लेकरे ही अपघाती चूक नसतात. कदाचित त्यापैकी तुम्ही एक पाल्य असाल जे तुमच्या लेकराला चूक, अयोजित गरोदर होणे, असे समजतात, आणि म्हणून तुम्ही त्यांचे जीवन व त्यांच्या पालनपोषणवर गंभीरपणे विचार करीत नाहीत. माझ्याकडे तुमच्यासाठी सुवार्ता आहे; तुमचे लेकरू ही चूक नाही. तुमच्या लेकरासाठी देवाकडे एक निश्चित उद्देश आहे. तुमचे लेकरू देवाकडून पाठविलेला एक तारा आहे की पृथ्वीवर प्रकाश दयावा. दुर्दैवाने, अधिकतर पाल्यांपेक्षा सैतान आपल्या लेकरांची लोकप्रियता ओळखतो, म्हणून तो सर्व काही करतो की त्यांची भरभराट उधळून लावावी.

मार्क ९:२०-२३ मधील हे उदाहरण पाहू या. बायबल म्हणते, "त्यांनी त्याला त्याच्याकडे आणिले, तेव्हा त्या आत्म्याने येशूला पाहताच मुलाला पिळून टाकले आणि तो जमिनीवर पडून तोंडाला फेंस आणून लोळू लागला. तेव्हा त्याने त्याच्या बापाला विचारले, हयाला असे होऊन किती काळ लोटला? तो म्हणाला, बाळपणापासून. ह्याचा नाश करावा म्हणून त्याने ह्याला पुष्कळदा विस्तवात व पाण्यात टाकले; पण आपल्या हातून काहीं होणे शक्य असेल तर आम्हांवर दया करा व आम्हांला साहाय्य करा. येशू त्याला म्हणाला, शक्य असेल तर, असे कसे म्हणतोस? विश्वास बाळगणाऱ्याला सर्व कांही शक्य आहे."

ख्रिस्ताच्या सेवाकार्याच्या एका प्रसंगी, त्याने एका भूतग्रस्त मुलाला मुक्त केले होते ज्यास बाळपणापासून दुष्टाम्याने छळले होते (मार्क ९:२१). आणखी एका प्रसंगी, त्याने एका स्त्रीच्या तरुण मुलीला दुष्टात्म्यापासून मुक्त केले होते (मत्तय १५:२२).

ही दोन उदाहरणे दर्शवितात की काही निश्चित प्रकारचे आत्मे प्रयत्न करतील की अगदी लहानपणापासून लेकरांच्या जीवनात प्रवेश करावा. ह्या लेकरांना गौरवी नशीब आहे की पूर्ण करावे. ते जागतिक उपाय आहेत. कदाचित सैतानाने या ताऱ्यांना पाहिले असेन आणि निर्णय घेतला की त्यांच्या पाल्यांना त्यांच्याबद्दल चिंता करण्याचे कारण बनवावे.

तुम्ही कल्पना करू शकता की एका लहान मुलीने जीवनात काय केले होते की दुष्टात्म्याद्वारे ग्रस्त व्हावे. लेकराने कोणाचा अपमान केला, किंवा जीवनामध्ये ते कशामध्ये व्यस्त झाले होते? त्या तरुण मुलाला दुष्टाम्याद्वारे पछाडले जात होते असे त्याने काय केले होते? हे ते लोक आहेत जे मोठे होतात की अंधाराच्या साम्राज्याला छळावे, म्हणजे सैतान हा बाहेर येतो की त्यांच्या जीवनासाठी देवाची योजना उधळून लावावी. परंतु तो अपयशी ठरला आहे.

तुम्हांला देखील मुल आहे काय जो तुम्हांला खूप त्रास देतो? तुम्हांला मुल आहे काय जो सतत चुका करीत राहतो आणि तुम्हांला जास्त आनंद देण्यापेक्षा रडवतो? तुमचे मुल हे एका किंवा दुसऱ्या वाईट सवयीमध्ये पडले आहे काय? माझी इच्छा आहे की तुम्ही हे जाणावे की ती मुले ही तारणारी आहेत. होय, त्यास गौरवी आणि उज्वल नशीब आहे. जग ज्याची वाट पाहत आहे त्याचे तो उत्तर आहे. त्याच्या स्वतःमध्ये मोठा अविष्कार आहे जो गर्विष्ठाला नम्र करील. म्हणून धैर्य सोडू नका. जे सर्व काही तुम्ही अनुभवीत आहात ते केवळ सैतानाचे प्रदर्शन आहे की त्याला किंवा तिला त्या गौरवी नशिबापासून दूर करावे.

उदाहरणार्थ, मिसर देशाच्या फारोने मिसरी सुइणी नियुक्त केल्या होत्या, आणि नंतर सर्व मिसरी लोकांना की, प्रत्येक नवीन जन्मलेल्या इब्री मुलांना नील नदीमध्ये टाकून दयावे (निर्गम १:१६, २२). मुलांसाठी अशा प्रकारच्या मृत्यूच्या फर्मानाने मोशेच्या आईवर दबाव आणला की त्या नवजात बाळाला हाताने केलेल्या एका लहान टोकरीमध्ये नील नदीमध्ये लपवावे.

शतकांनंतर, हेरोदाने ऐकले की यहूद्यांचा राजा बेथलेहेममध्ये जन्मला आहे. भीतीमुळे, त्याने दोन वर्षे वयाच्या आतील सर्व मुलांची कत्तल करण्यास रोमी सैनिकांना आज्ञा दिली (मत्तय २:१६). परंतु देवाच्या संरक्षणाने, मोशे व येशू दोघेही मृत्युच्या या फर्मानापासून वाचले आणि त्यांच्या पिढीला तारण आणले-एकाने मिसर देशाला आणि दुसऱ्याने संपूर्ण जगाला.

म्हणून, तुमच्या लेकराला मारले जाण्यासाठी सोडू नका. देवाने त्याच्यामध्ये उद्देश ठेवला आहे आणि मोठे अविष्कार रचले आहेत. तुम्हांला केवळ एवढेच करावयाचे आहे की ते पाऊल उचलावे की मार्क अध्याय ९ मधील पिता किंवा मत्तय अध्याय १५ मधील आईने घेतले होते. तुमच्या लेकराखातर सर्व प्रयत्नांनी येशूकडे जा. कृपा करून त्याच्या किंवा तिच्यासाठी विचार करण्याचे सोडू नका कारण जग हे त्यांच्या प्रकाशाशिवाय अंधारात राहील. देवाने त्यांच्यात मोठा खजाना ठेवला आहे जे जगाला मुक्त करील. म्हणून, त्यांच्यासाठी प्रार्थना करा. प्रार्थनेमध्ये त्यांना तारणाऱ्याकडे न्या म्हणजे त्यांच्या जागतिक नियुक्तीला भक्कम आधार मिळू शकेन.

Bible Reading: Deuteronomy 31-32
प्रार्थना
पित्या, येशूच्या नावाने, या तरुण लेकरांच्या आशीर्वादासाठी मी तुझे आभार मानतो. आम्ही प्रार्थना करतो की तूं त्यांना अंधाराच्या सापळ्यातून मुक्त कर. आम्ही प्रार्थना करतो की त्यांची भरभराट होईल की नशिबामध्ये त्यांनी त्यांचे स्थान ग्रहण करावे. सैतान त्यांना तुझ्या उद्देशापासून हिरावून घेणार नाही. ते आपल्या पिढीला अधोगतीपासून वाचावितील. येशूच्या नावाने. आमेन!

Join our WhatsApp Channel


Most Read
● परमेश्वरा जवळ या
● परमेश्वर पुरवठा कसा करतो # 4
● तुम्ही किती मोठ्याने बोलू शकता?
● तुम्ही अजूनही का थांबून आहात?
● शोधण्याची आणि सापडण्याची कथा
● स्तुति वृद्धि करते
● कृपे द्वारे तारण पावलो
टिप्पण्या
संपर्क
फ़ोन: +91 8356956746
+91 9137395828
व्हाट्स एप: +91 8356956746
ईमेल: [email protected]
पता :
10/15, First Floor, Behind St. Roque Grotto, Kolivery Village, Kalina, Santacruz East, Mumbai, Maharashtra, 400098
आमच्या सामाजिक नेटवर्कवर सामील व्हा!
Download on the App Store
Get it on Google Play
मेलिंग यादीमध्ये सामील व्हा
अन्वेषण
कार्यक्रम
थेट प्रसारण
नोहाट्यूब
टी.वी.
देणगी
डेली मन्ना
स्तुती
अंगीकार
स्वप्ने
संपर्क
© 2025 Karuna Sadan, India.
➤
लॉग इन
कृपया या साईट वर टिपणी आणि कंमेंट करण्यासाठी आपल्या NOAH खात्यावर प्रवेश करा |
लॉग इन