english हिंदी తెలుగు മലയാളം தமிழ் ಕನ್ನಡ Contact us आमच्याशी संपर्क साधा स्पॉटिफाय वर ऐका स्पॉटिफाय वर ऐका Download on the App StoreIOS अँप डाउनलोड करा Get it on Google Play अँड्रॉइड अँप डाउनलोड करा
 
लॉग इन
ऑनलाइन देणगी
लॉग इन
  • होम
  • कार्यक्रम
  • थेट प्रसारण
  • टी.वी.
  • नोहाट्यूब
  • स्तुती
  • बातमी
  • डेली मन्ना
  • प्रार्थना
  • अंगीकार
  • स्वप्ने
  • ई पुस्तके
  • भाष्य
  • श्रद्धांजली
  • ओएसिस
  1. होम
  2. डेली मन्ना
  3. जीवनाच्या वादळांमध्ये विश्वास ठेवणे
डेली मन्ना

जीवनाच्या वादळांमध्ये विश्वास ठेवणे

Thursday, 1st of May 2025
14 11 201
Categories : परीक्षा विश्वास
जीवनाच्या वादळांमध्ये, हे स्वाभाविकच आहे की आपल्या विश्वासाची परीक्षा होते. जेव्हा आव्हाहने उत्पन्न होतात, तेव्हा शिष्यांसारखे, आपण आपल्या स्वतःला प्रश्न विचारताना पाहू शकतो, "गुरुजी, आपण बुडत आहोत तरी आपणाला काहीच वाटत नाही काय?" (मरकूस ४:३८). हे या क्षणामध्ये असते की आपल्या विश्वासाची अंतिम परीक्षा घेतली जाते. या संघर्षामध्ये आपण केवळ एकटेच नाही; ते येशूच्या सामर्थ्याचे प्रथम साक्षीदार होते ते देखील त्याच्या काळजीमध्ये संशय धरणारे म्हणून ओळखले गेले.

१. लक्षात ठेवा की तुमच्या संघर्षामध्ये तुम्ही केवळ एकटेच नाही.
संपूर्ण बायबलमध्ये, येथे असंख्य व्यक्तींची उदाहरणे आहेत ज्यांनी अशा संकटाच्या समया दरम्यान त्यांच्यासाठी देवाच्या काळजीवर संशय केला होता. शिष्य जे वादळात अडकले होते, या कथेमध्ये, त्यांनी येशूच्या काळजीवर संशय घेतला, हे विचारात, "गुरुजी, आपण बुडत आहोत तरी आपणाला काहीच वाटत नाही काय?" (मरकूस ४:३८). त्याचप्रमाणे, मार्थाला तिच्या जबाबदारीमध्ये भारावून टाकलेले असे वाटले, आणि म्हणून येशूला विचारले, "प्रभुजी, माझ्या बहिणीने माझ्या एकटीवर कामाचा भार टाकला आहे, ह्याची आपल्याला पर्वा नाही काय?" (लूक १०:४०). ही उदाहरणे आपल्याला आठवण देतात की सर्वात विश्वासू देखील संकटाच्या वेळी संशयाचा सामना करू शकतो.

देवाची आपल्यासाठी काळजी यावर संशय घेण्याच्या स्थितीपर्यंत पोहचण्याचे गंभीर परिणाम प्राप्त होऊ शकतात. हे अशाच समयादरम्यान, आपण आपल्या आध्यात्मिक आचरणापासून दूर जाऊ शकतो. आपल्या प्रार्थना ह्या कमी होत जातात आणि त्यादरम्यान आपण बायबल वाचणे किंवा चर्चला जाणे किंवा प्रभूची सेवा करणे थांबवू शकतो. आपण आपल्या स्वतःला देवाच्या प्रीतीबद्दल प्रश्न विचारू लागू शकतो आणि हे मागू लागतो, "प्रभु, जर तू खरेच काळजी करतो, तर मग हे पहिल्या प्रथम असे का घडावे?

२.  देवाच्या आश्वासनांवर विसंबून राहा.
जेव्हा आपला विश्वास डळमळतो, तेव्हा हे महत्वाचे आहे की पवित्र शास्त्रात सापडणाऱ्या देवाच्या आश्वासनांकडे वळावे. बायबल हे त्या वचनांनी भरलेले आहे जे आपल्याला देवाची काळजी आणि आपल्या प्रती देवाचा विचार यांची आठवण देतात. असेच एक वचन हे, यशया ४१:१०, "तू भिऊ नकोस, कारण मी तुझ्याबरोबर आहे, घाबरू नकोस, कारण मी तुझा देव आहे, मी तुला शक्ती देतो, मी तुझे साहाय्यही करतो, मी आपल्या नीतिमत्तेच्या उजव्या हाताने तुला सावरतो." आपल्या स्वतःला देवाच्या वचनामध्ये भरून टाकण्याद्वारे, आपण अनिश्चिततेच्या समयामध्ये शक्ती आणि पुनःशास्वती प्राप्त करू शकतो. 

३. देवाच्या विश्वासूपणावर विचार करा
संशयाच्या क्षणी, हे साहाय्यकारी होईल की त्यावर विचार करावा ज्या असंख्य वेळी देवाने त्याचा विश्वासूपणा प्रदर्शित केला होता. संपूर्ण बायबलमध्ये, आपण देवाचे त्याच्या लोकांप्रती अटळ समर्पणाची उदाहरणे पाहतो. इस्राएली लोकांच्या कथेमध्ये, देवाने त्यांना रानातून मार्गदर्शन केले, आणि त्यांच्या गरजांसाठी पुरविले (निर्गम १६). नवीन करारात, प्रभु येशूने आजारी लोकांना बरे केले, मृतामधून जिवंत केले, आणि आशाहीन लोकांना आशा दिली (मत्तय ९). या कथांची आठवण करणे, हे आपल्यासाठी देवाच्या काळजीमध्ये विश्वास ठेवण्यास आपल्याला साहाय्य करू शकते.

४. प्रार्थना करा आणि सहकारी विश्वासणाऱ्यांकडून साहाय्य मागा.
प्रार्थना हा एक सामर्थ्यशाली मार्ग आहे की देवाबरोबर पुन्हा एकदा संबंध जुळवावे जेव्हा आपला विश्वास डळमळलेला आहे. फिलिप्पै ४:६-७ मध्ये, पौल आपल्याला प्रोत्साहन देत आहे की गरजेच्या वेळी देवाकडे वळावे, हे म्हणत, "कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. म्हणजे सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांति तुमची अंत:करणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील." सहकारी विश्वासणाऱ्यांकडून साहाय्य मागणे, हे आपल्या विश्वासामध्ये मजबूत होण्यास, आणि आपल्या जीवनात देवाच्या उपस्थितीचे स्मरण देखील करण्यास सहाय्यक होऊ शकते. जर तुम्ही करुणा सदन चर्चशी जुळलेले आहात, तर तुम्ही असे करण्याचा एक मार्ग हा जे-१२ पुढाऱ्याची आज्ञा पाळण्याद्वारे आहे.  

Bible Reading: 1 Kings 19-20
प्रार्थना
पित्या, संशय व कठीण परिस्थितीच्यावेळी, मला हे स्मरण करण्यास साहाय्य कर की माझा विश्वास हा परिस्थितीवर आधारित नाही, परंतु तुझी अतूट प्रीति व काळजीवर आहे. तुझ्या वचनाकडून ज्ञानामध्ये वाढण्यास मला साहाय्य कर. येशूच्या नावाने. आमेन!

Join our WhatsApp Channel


Most Read
● तुम्ही एक खरे उपासक आहां काय?
● चांगले युद्ध लढ
● प्रकाश हा वचना द्वारे येतो
● कटूपणाची पीडा
● तुम्ही मत्सरास कसे हाताळाल
● पित्याचे हृदय प्रकट केले गेले
● तुमच्या घरातील वातावरण बदलणे-१
टिप्पण्या
संपर्क
फ़ोन: +91 8356956746
+91 9137395828
व्हाट्स एप: +91 8356956746
ईमेल: [email protected]
पता :
10/15, First Floor, Behind St. Roque Grotto, Kolivery Village, Kalina, Santacruz East, Mumbai, Maharashtra, 400098
आमच्या सामाजिक नेटवर्कवर सामील व्हा!
Download on the App Store
Get it on Google Play
मेलिंग यादीमध्ये सामील व्हा
अन्वेषण
कार्यक्रम
थेट प्रसारण
नोहाट्यूब
टी.वी.
देणगी
डेली मन्ना
स्तुती
अंगीकार
स्वप्ने
संपर्क
© 2025 Karuna Sadan, India.
➤
लॉग इन
कृपया या साईट वर टिपणी आणि कंमेंट करण्यासाठी आपल्या NOAH खात्यावर प्रवेश करा |
लॉग इन