1.आम्ही ओयासिस ठिकाणी येशूच्या बहुमुल्य रक्ताच्या आच्छादनासाठी विनंती करतो. तुझ्या दैवी संरक्षणास कोणत्याही वाईट शक्ती किंवा प्रभावासाठी ढाल होऊ दे. प्रत्येक पैलूमध्ये तुझ्या उपस्थितीचे वर्चस्व असू दे.
2.येशूच्या शक्तिमान नावाने, आम्ही ओयासिस ठिकाणाच्या सभोवतालची आणि विरोधातील प्रत्येक वाईट शक्ती उपटून टाकली जावो असा आदेश देत आहोत.
3.परमेश्वरा, आम्ही पास्टर मायकल यांच्यासाठी तुझ्याकडे प्रार्थना करीत आहोत. त्यांना शहाणपण आणि पारख करण्याचा आत्मा प्रदान कर जेव्हा ते ओयासिसच्या प्रकल्पासंबंधी निर्णय घेतात. येशूच्या नावाने त्यांच्या निवडी तुझ्या परिपूर्ण इच्छेशी एकरूप होवोत.
4.स्वर्गीय पित्या, आम्ही ओयासिस प्रकल्पाचे दस्तावेज तुझ्या हातात सोपवत विनंती करीत आहोत. पास्टर मायकल आणि जे सर्व त्यात सहभागी आहेत त्यांना शहाणपण आणि निपुणता प्रदान कर की सर्व दस्तावेज योग्य प्रकारे तयार करावीत, जी उत्कृष्टता आणि अचूकतेला प्रतिबिंबित करणारी असावीत.
5.पित्या, येशूच्या नावाने, आम्ही त्या प्रत्येकासाठी प्रार्थना करीत आहोत ज्यांनी ओयासिस मध्ये योगदान दिले आहे, त्यांना आणि जे सर्व त्यांचे आहे त्यास तुझ्या आत्म्याचा स्पर्श होऊ दे. त्यांची जमीन आणि मालमत्ता विपुल व्हावी. पदोन्नती आणि वाढ अधिक व्हावी. अडखळलेली वित्तीयता मोकळी व्हावी. दस्तावेज योग्य व्हावीत. येशूच्या नावाने त्यांच्यासाठी दैवी दरवाजे उघडी व्हावीत. त्यांनी जिवंतांच्या भूमीत तुझ्या चांगुलपणाची साक्ष द्यावी.
6.स्वर्गीय पित्या, येशूच्या नावाने, उदार देणगीदार निर्माण कर जे ओयासिस प्रकल्पाला निधी देतील. तू यहोवा पुरवठा करणारा आहेस, आमचा प्रभू जो विपुलपणे पुरवठा करतो. आम्ही तुझ्याकडे आशेने पाहत आहोत, प्रभू जेथून आम्हाला साहाय्य मिळते. आमचे साहाय्य परमेश्वराकडून येते, ज्याने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली.
7.आमचा परमेश्वर करूणा सदन सेवाकार्याची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठायी गौरवाच्या द्वारे पुरवील. (फिलिप्पै. ४:१९)
8.हे परमेश्वरा, आम्ही ओयासिस प्रकल्पासाठी तुझ्या कृपेचा धावा करीत आहोत. दारे उघड आणि अडथळे काढून टाक आणि प्रत्येक पैलूंवर तुझ्या कृपेचा वर्षाव होऊ दे, ज्यामुळे यश आणि समृद्धी यावी.
Join our WhatsApp Channel